वेध माझा ऑनलाइन । महाराष्ट्र काँग्रेस मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसने विदर्भातील माजी आमदार आशिष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसने त्यांना ६ वर्षांसाठी निलंबन केलं आहे. पक्षाची शिस्त मोडल्याचा ठपका ठेवून आशिष देशमुख यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
आशिष देशमुख यांनी यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधातील विधाने केली होती. त्याच पार्श्वभूमीवर ५ एप्रिल रोजी काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने त्यांना एक नोटीस पाठवली होती. यानंतर देशमुख यांनी ९ एप्रिल रोजी उत्तर दिलं. पण हे उत्तर समाधानकारक नसल्याने त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांचे याबाबतचे पत्र समोर आलं आहे.
No comments:
Post a Comment