वेध माझा ऑनलाइन । 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नव्हतं. त्यामुळे सत्ता स्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी घडवून आणला. हे सरकार फार काळ टिकलं नाही. मात्र या पहाटेच्या शपथविधीची आजही चर्चा होते. पहाटेच्या शपथविधीबाबत अनेक नेत्यांनी वेगवेगळं वक्तव्य केलं आहे. आता पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केल्यानं हे प्रकरण चर्चेत आलं आहे.
नेमकं काय म्हणाले मुनगंटीवार
पहाटेच्या शपथविधीबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठीच पहाटेचा शपथविधी करण्यात आला, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपला धोका देत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली, म्हणून त्यांना धडा शिकवायचा होता. अजित पवारही पाहटेच्या शपथविधीसाठी तयार झाले. त्यांनी कोणतीही अट घातली नव्हती, असा दावा मुनगंटीवार यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment