Wednesday, May 31, 2023

राजकारणात येणार का...या प्रश्नावर गौतमी पाटीलने केला मोठा खुलासा ; काय म्हणाली?

वेध माझा ऑनलाईन। रील स्टार गौतमी पाटील राजकारणात येणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. मात्र आता याबाबत खुद्द गौतमी पाटीलनेच मोठा खुलासा केला आहे. राजकारणात मला इंटरेस्ट नाही, राजकारणात मी जाणार नाही, मी एक कलाकार आहे, यापुढेही कलाच सादर करणार असल्याचं गौतमी पाटीलने म्हटलं आहे. त्यामुळे आता गौतमी पाटील राजकारणात जाणार असल्याच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.  पुण्यातील खेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमीचा कार्यक्रम मंगळवारी रात्री खेडला आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ती बोलत होती.

 संभाजीराजेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया  
दरम्यान दोन दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी कलाकारांना सुरक्षा द्यायला हवी असं मत व्यक्त केलं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून युटरर्न घेत ट्विट केलं. महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्यांना सुरक्षा देण्याची गरज नसल्याचं राजेंनी म्हटलं. याबाबत गौतमीला विचारलं असता तीने यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे.  याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं तीनं म्हटलं आहे. दरम्यान पाटील आडनाव लावू नकोस अशी काही संघटनांकडून मगणी करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना तीने चांगलंच सुनावलं आहे.

No comments:

Post a Comment