Tuesday, May 23, 2023

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली ; रुग्णालयात दाखल ;

वेध माझा ऑनलाइन । राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह रुग्णालयात पोहोचले आहेत.

मनोहर जोशी यांना सोमवारी रात्री अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत.
मनोहर जोशी यांचं वय 86 वर्षे इतकं असून शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मुंबईचे महापौरपदही त्यांनी 1976 ते 1977 या काळात भूषवलं होतं. तर शिवसेना भाजप युतीच्या सरकारमध्ये ते मुख्यमंत्री बनले होते.


No comments:

Post a Comment