Friday, May 26, 2023

राहुल गांधींना दिलासा ; न्यायालयाने नवीन पासपोर्टसाठी दिली परवानगी ; काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन। खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधी यांनी आपला राजकीय कारणासाठी असलेला पासपोर्ट जमा केला होता. नवा पासपोर्ट मिळावा, यासाठी त्यांनी न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्यावर दिल्लीच्या न्यायालयाने त्यांना नवीन पासपोर्ट देण्याची परवानगी दिली आहे, याबाबतचा आदेश न्यायालयाने दिला आहे.हा पासपोर्ट तीन वर्षांसाठी असेल, असे न्यायालयानं म्हटलं आहे. दहा वर्षासाठी पासपोर्ट मिळाला अशी मागणी राहुल गांधींनी न्यायालयाकडे केली होती.

राज्यसभेचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधी यांच्या अर्जाला विरोध केला. दहा वर्षांसाठी पासपोर्ट देणे कुठल्याही कारणासाठी योग्य नसल्याने सुब्रमण्यम यांनी म्हटले होते.राहुल गांधी हे नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात आरोपी आहेत. त्यामुळे त्यांना फक्त एका वर्षासाठी पासपोर्ट देण्यात यावा, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात सांगितले. त्याला राहुल गांधी यांच्या वकिलाने विरोध केला. या प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी यांना २६ मे पर्यंत बाजू मांडण्यास सांगितले होते. त्यानंतर यावर आज सुनावणी झाली

No comments:

Post a Comment