Saturday, May 13, 2023

"अ' अमेरिकेचा या यु ट्युब चॅनेलच्या संचालिका सौ गौरी सागावकर देशमुख यांनी दिली पुस्तकाच्या बागेला भेट ; माजी नगरसेवक सौरभ पाटील यांनी केले स्वागत ; सौ गौरी सागावकर यांचा बालमित्रांशी संवाद ;

वेध माझा ऑनलाइन । माजी नगरसेवक सौरभ पाटील(तात्या) यांच्या संकल्पनेतुन "पुस्तकांची बाग' हा अभिनव उपक्रम कराडच्या टाऊन हॉल येथे सुरू आहे याठिकाणी  अमेरिकेत स्थायिक असलेल्या मात्र मूळच्या कराडच्या असलेल्या सौ गौरी सागांवकर देशमुख यांनी नुकतीच भेट दिली स्व यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेलं सह्याद्रीचे वारे हे पुस्तक देऊन  त्याचे यावेळी स्वागत करण्यात आले 
यावेळी राहुल पुरोहित(सर), सतीश भोंगाळे, मंगेश वास्के, गणेश कांबळे, अजय सूर्यवंशी,  सुधाकर गायकवाड, गनेश हिंगमीरे आदी उपस्थित होते.
 
सौ गौरी सागांवकर देशमुख यांचे "अ अमेरिकेचा" हे युट्युब चॅनेल सर्व जगभर प्रसिद्ध आहे त्या कराडच्या नगरवाचनालयाच्या माजी सभासद देखील आहेत. युट्युबच्या माध्यमातून भारत व अमेरिका देशांमधील विविध सण, उत्सव, तसेंच त्या ठिकाणची संस्कृती,कुटुंबीक जीवनपद्धती, खाद्यसंस्कृती याविषयी माहिती देण्याचा सातत्याने त्या प्रयत्न करत असतात त्यांच्या यु ट्यूब चॅनेलचे देश परदेशात लाखो फॉलोअर्स आहेत 
 सुट्टीनिमित सध्या त्या भारतात आल्या आहेत त्यांना "पुस्तकांची बाग" या कराडात सुरू असलेल्या उपक्रमा विषयी माहिती मिळताच त्यांनी याठिकाणी भेट देऊन तेथील उपस्थित बालमित्रांशी सवांद साधला. आमिरेकेतील शिक्षण पद्धती, उत्सव संस्कृती याची माहितीही  त्यांनी यावेळी दिली जीवनात वाचन संस्कृतीचे असणारे अनन्यसाधारण महत्व देखील त्यांनी यावेळी समजावून सांगितले
  

No comments:

Post a Comment