वेध माझा ऑनलाईन । आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं. मात्र त्यापूर्वी उद्घाटनावरून चांगलंच नाराजीनाट्य रंगल्याचं पहायला मिळालं होतं. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. नवीन संसद भवन उभारताना विरोधकांना विचारात घेतलं नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होतं. आता त्यांच्या या टीकेला भाजप नेते राम शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले राम शिंदे?
भाजप आमदार राम शिंदे यांनी शरद पवारांवर जोरदार पलटवार केला आहे. शरद पवार यांना संसदीय कामकाजाचा साठ वर्षांचा अनुभव आहे. या साठ वर्षांमध्ये त्यांनी अनेकदा सत्ता भोगली आहे. सत्तेत असताना विरोधी पक्षाची काय भूमिका असते आणि सत्ताधाऱ्यांची काय भूमिका असते हे पवारसाहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं जाणून आहेत. त्यामुळे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होणं गरजेचं होतं मात्र इतर पक्षाच्या दबावामुळे ते सहभागी झाले नाहीत. अन्यथा पवारसाहेब नक्की या कार्यक्रमात सहभागी झाले असते असा राम शिंदे यांनी गौप्यस्फोट केला आहे.
No comments:
Post a Comment