वेध माझा ऑनलाइन । कराड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी नियुक्त झालेले श्री. अमोल ठाकूर यांनी व आधीचे डि.वाय.एस.पीं. डॉ रणजित पाटील या दोघांनीही आज कराड दक्षिणचे आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी नवनियुक्त डि.वाय.एस.पीं.चे स्वागत केले. तसेच मावळते डि.वाय.एस.पीं. डॉ रणजित पाटील यांनी कराड विभागात आजपर्यंत केलेल्या कामाचे कौतुक करीत त्यांना धन्यवाद दिले
आजी माजी डि.वाय.एस.पीं.यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन कराड तालुक्यातील परिस्थिती बाबत चर्चा केली. यावेळी नवीन डि.वाय.एस.पीं.ना सहकार्य कायमच राहील असे आ. चव्हाण यांनी आश्वासित केले.
No comments:
Post a Comment