वेध माझा ऑनलाइन। मी बॉम्बस्फोट करणार आहे... मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा निनावी धमकी मिळाली आहे. पण यंदा फोन किंवा ईमेलवरुन नाहीतर थेट ट्विटरवरुन धमकी मिळाली आहे. पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी तपास सुरू केला आहे. तसेच, अधिक चौकशीही सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पुन्हा एकदा दहशत माजवण्याची धमकी पोलिसांना मिळाली आहे. आतापर्यंत जिथे पोलिसांना फोन आणि ई-मेलच्या माध्यमातून धमक्या मिळत होत्या, तिथे आता एका व्यक्तीनं ट्विटरच्या माध्यमातून मुंबईत दहशत माजवण्याची धमकी दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी (22 मे) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवर "मी लवकरच मुंबईत स्फोट घडवणार आहे" असा मेसेज पाठवला होता. हा मेसेज इंग्रजी भाषेत पाठवण्यात आला होता. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीनं मेसेजमध्ये लिहिलं होतं की, "I M Gonna Blast The Mumbai Very Soon." हा मेसेज गांभीर्यानं घेत मुंबई पोलिसांनी संबंधित खात्याची चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment