Monday, May 15, 2023

मातृदिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कराड व संजीवन मेडिकल सेंटर, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन ; महिलांचा उस्फुर्त सहभाग ;

वेध माझा ऑनलाईन ।  मातृदिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कराड व संजीवन मेडिकल सेंटर, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने संजीवन मेडिकल सेंटर येथे गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरासाठी कराड शहरील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ अनिल लाहोटी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या शिबिराचे उद्घाटन संजीवन मेडिकल सेंटर, कराड च्या संचालिका सौ शालन राजाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

डॉ अनिल लाहोटी यांनी गर्भावस्थेत महिलांनी प्रसूतीपूर्व व प्रसुतीनंतर करावयाची देखभाल व माता-गर्भस्थ शिशु यांचा संवाद याबाबत मार्गदर्शन केले. रो डॉ भाग्यश्री पाटील यांनीदेखील यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. आणि गरोदर महिलांसाठी वेळोवेळी आयोजित करण्यात येत असलेल्या शिबिरांची यावेळी माहितीही दिली. डॉ सिद्धी पाटील यांनी  स्लाईडशोद्वारे महिलांना मार्गदर्शन केले. 

यावेळी रोटरी क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष रो प्रबोध पुरोहित व संजीवन मेडिकल सेंटर, कराड चे संचालक प्रा. आर. एन. पाटील उपस्थित होते. यावेळी डॉ मीनल देसाई यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ दिलीप सोलंकी यांनी सूत्रसंचालन केले डॉ योगिता पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment