वेध माझा ऑनलाइन । पक्षाने आदेश दिला तर मी माढा मतदारसंघातून लोकसभा लढण्यास तयार आहे अशी घोषणा रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे रामराजेंनी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना याद्वारे आव्हानच दिले आहे.काही दिवसांपूर्वी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त फलटण येथील कार्यक्रमात जयंत पाटील यांनी रामराजेंना आपल्याला दिल्लीला पाठवायला हवं असे सांगून मी मुंबईला जाणार आहे असं जयंत पाटील यांनी म्हंटल होत. अखेर पक्षाने आदेश दिल्यास आपण माढ्यातून लढण्यास तयार आहे असं रामराजेंनी माध्यमांशी बोलताना म्हंटल आहे.
No comments:
Post a Comment