Tuesday, May 23, 2023

कृष्णा कारखान्यात ऊसतोडणी वाहतूक करारास प्रारंभ...

वेध माझा ऑनलाइन । यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 या गळीत हंगामाकरिता ऊसतोडणी वाहतूक करारांचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी संचालक जितेंद्र पाटील, बाजीराव निकम, दीपक पाटील, जे.डी. मोरे, बाबासो शिंदे, वसंतराव शिंदे, विलास भंडारे, अविनाश खरात, एझिक्युटिव्ह डायरेक्टर सी.एन देशपांडे,  कार्यकारी संचालक राम पाटील, वैभव जाखले, सेक्रेटरी मुकेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी चेअरमन डॉ.सुरेश भोसले म्हणाले, गेल्या सात ते आठ गळीत हंगामात सर्व ऊसतोडणी वाहतूकदार, कंत्राटदार यांच्या सहकार्यामुळे हंगाम यशस्वी पार पाडू शकलो. तसेच ऊसतोडणी वाहतूक यंत्रणेची येणेबाकी शून्य रुपये आहे.  कृष्णा कारखान्याने साखर कारखानदारीत हा एक आदर्श निर्माण केला आहे. ऊस वाहतुकदारांना चांगली दरवाढ देण्यात येणार आहे.

कारखान्याच्या शेती आणि उसविकास विभागांचे काम उत्कृष्टपणे सुरू आहे. साखर कारखान्याच्या कामकाजात ऊस उत्पादक, ऊस पुरवठा करणारे वाहतूकदार व कामगार हे तीन महत्वाचे घटक असतात. हे घटक चांगले चालले तरच साखर कारखाना चांगला चालतो. ऊस वाहतूकदारांनी चांगला व्यवसाय करून कारखान्याच्या कामकाजात मदत करावी असे आवाहन डॉ.भोसले यांनी केले. यावेळी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी.एन देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.


प्रारंभी कार्यकारी संचालक राम पाटील यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सेक्रेटरी मुकेश पवार यांनी केले. यावेळी मुख्य शेती अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, कार्यालयीन अधिक्षक निलेश देशमुख, लेबर अँड वेल्फेअर ऑफिसर अरुण पाटील, सहाय्यक शेती अधिकारी अजय दुपटे, सहाय्यक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर, केनयार्ड सुपरवायझर विजय मोहिते आदीसह ऊसतोडणी वाहतूकदार व कंत्राटदार, गट अधिकारी, शेतकी कर्मचारी उपस्थित होते. संचालक जितेंद्र पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment