Thursday, May 25, 2023

पुस्तकांच्या बागेत सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेचे आयोजन ; माजी नगरसेवक सौरभ पाटील यांची माहिती ;


वेध माझा ऑनलाइन । मुलांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी कराडच्या यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये पुस्तकांची बाग हा उपक्रम स्वर्गीय यशवंतराव चव्हाण वाचन चळवळीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून येत्या शनिवार 27 व रविवार 28 रोजी सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती माजी नगरसेवक सौरभ पाटील यांनी दिली आहे

उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत मुलांसाठी यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनच्या एका कोपऱयात पुस्तकांची बाग सुरू करण्यात आली आहे. मुलामुलींनी सकाळी 8 ते 10 यावेळेत येऊन ग्रंथालयात ओळखपत्र जमा करावे. तेथून पुस्तक घ्यावे आणि बागेत वाचावे, अशी या उपक्रमाची संकल्पना आहे. या उपक्रमास मुलामुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत शनिवार 27 व रविवार 28 मे रोजी सकाळी 8.30 ते 10 यावेळेत मोफत सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. अक्षरगुरू राहुल पुरोहित हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेसाठी येताना रायटींग पॅड, जेल पेन, चार रेघी वही, एक रेघी वही आणावी, असे आवाहन सौरभ पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment