वेध माझा ऑनलाइन । कराडच्या प्रीतिसंगम घाट परिसरातील स्वामींच्या बागेत अश्लील चाळे करणाऱ्या प्रेम वीरांना आज पोलिसांनी हलका फुलका चोप देवून त्यांची चौकशी करून समज देत त्यांना सोडून दिले पोलिसांनी संपूर्ण बाग परिसरात शंका येईल त्या युगलांची चौकशी केली त्यामुळे आज प्रीतिसंगम घाट येथे अश्लील चाळे करणाऱ्यांची चांगलीच धावपळ झाल्याचे पहायला मिळाले
येथील स्वामींची बाग परिसरात बाहेर गावाहून तसेच कराड तालुक्यातुन अनेक प्रेमी युगल फिरण्यासाठी तसेच गुलुगलु करण्यासाठी रोजच येत असतात... त्यांचे अश्लील चाळे हा नेहमीच चर्चेचा विषय असतो... व्हॅलेंटाईन डे दिवशी या आंबट शौकिनाना न मागता चोप मिळतो... या ठिकाणी अनेक तरुण तरुणी वाढदिवस साजरा करण्यासाठी तसेच फिरण्याचे कारण काढून येत असतात... कॉलेज किंवा शाळा बुडवून येथे येणाऱ्या मुला मुलींची संख्या देखील याठिकाणी जास्त आहे... या मुलांमुलींबद्दल अनेक तक्रारी नेहमीच येत असतात... त्यांपैकी काही प्रेमी युगल धडधडीत सगळ्यांसमोर अश्लील चाळे करत बसतात... बघणारे लाजतील असे हे चाळे बघून अनेकांनी वारंवार याविषयी तक्रारीही केल्या आहेत... घाटावर पोलीस स्टेशन झाले आहे... मात्र तिथे कधीतरी पोलीस असतात... असे तिथले लोक सांगतात...आज मात्र घाटावर विथाऊट युनिफॉर्म पोलीस हजर असलेले पहायला मिळाले...दुपारच्या सुमारास घाट परिसरात बाहेर गावातील प्रेमी युगल अश्लील चाळे करताना तेथे पोलिसांना दिसून आले त्यांनी त्या युगलांची चौकशी केली असता ते तालुक्याच्या ठिकाणाहून आल्याचे समजले... त्यांना हलका फुलका चोप देऊन त्यांची चौकशी करून त्यांना समज देत सोडून दिले... ते पाहून तेथील इतर बाकीचे आंबट शौकीन "कपल' त्याठिकान्हून हळूच दबक्या पायांनी निघून गेल्याचे दिसले
No comments:
Post a Comment