Friday, May 12, 2023

कराड रोटरी क्लबच्या अन्नछत्र सेवा उपक्रमाचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा ;

वेध माझा ऑनलाइन ; कराडच्या रोटरी क्लब ऑफ कराड चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ कराड यांच्या वतीने कोरोना काळात स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाना मोफत जेवण देत रोटरी अन्नछत्र सेवा राबवण्यात आली होती आजही ही सेवा कराड रोटरी क्लबच्या वतीने सुरू आहे  या उपक्रमास 2 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने आज कराड शहरातील बांधकाम व्यावसायिक दिलीपराव चव्हाण यांचे हस्ते केक कापून या उपक्रमाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला 

यावेळी उपस्थित गरजूंना दिलीपराव चव्हाण यांचे हस्ते अन्नदान करण्यात आले. तसेच हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता मोलाचा वाटा उचलणारी तेथील सर्व किचन टिम व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या सबंधित सर्व स्टाफचा यावेळी  सत्कार करण्यात आला. 

रोटरी क्लब ऑफ कराड चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ कराड, रोटरॅक्ट क्लब ऑफ कराड सिटी, इनरव्हील क्लब ऑफ कराड व इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम चे पदाधिकारी, तसेच स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ शेळके, डॉ सौ. जानकर आणि सर्व स्टाफ यावेळी उपस्थित होता.

No comments:

Post a Comment