Saturday, May 27, 2023

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार नवीन संसद भवनाचे उद्घाटन : ऐतिहासिक राजदंड सभापतींच्या आसनाजवळ केला जाणार स्थापित : कसा आहे हा राजदण्ड ? काय आहे त्याचा इतिहास ?

वेध माझा ऑनलाइन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (आज) अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. याबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, नवीन संसद भवन प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं आहे. शुक्रवारी त्यांनी नवीन कॅम्पसचा व्हिडिओही शेअर केला होता. आज सकाळी सूर्योदयानंतर नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू होईल.

पंतप्रधान मोदी सकाळी 7:15 वाजता येथे पोहोचतील, त्यानंतर सकाळी 7:30 वाजता हवन पूजन सुरू होईल, जे सुमारे एक तास चालेल. त्यानंतर सर्व मान्यवर लोकसभेच्या चेंबरकडे जातील, जिथे ऐतिहासिक राजदंड सेंगोल सभापतींच्या आसनाजवळ स्थापित केला जाईल. 

तामिळनाडूशी संबंधित चांदी आणि सोन्याचा मुलामा असलेला हा औपचारिक राजदंड ऑगस्ट 1947 मध्ये पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून देण्यात आला होता. जो नंतर अलाहाबाद संग्रहालयाच्या नेहरू गॅलरीत ठेवण्यात आला होता.

No comments:

Post a Comment