वेध माझा ऑनलाइन । कराड शहर मनसेच्या वतीने आज सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना कराडात सुरू असलेल्या अन्यायकारक पाणीपट्टी बिलाच्या वसूली विरोधात निवेदन देण्यात आले सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी कराडातील 24 तास पाणी योजनेच्या नावाखाली होणाऱ्या या बिलाच्या वसूलीसाठी स्थगिती देऊन देखील कराड पालिका या बिलाची वसुली करत असल्याने कराड शहर मनसे आक्रमक झाली असून ताबडतोब या पाणीबिलाची वसुली बंद करावी अन्यथा कराडात मनसेच्या वतीने आंदोलन केले जाईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे
निवेदनात म्हटले आहे की, कराडात दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो तरीही मीटर बसवून 24 तास पाणी देण्याच्या नावाखाली कराड पालिकेची लोकांकडून पैसे वसुली सुरू आहे हे मीटर हवेमुळे आपोआप फिरत आहेत त्यामुळे बिले भरमसाठ येत आहेत या 24 तास पाणी योजनेसाठी पालिकेने पैशाची भरमसाठ उधळण केली आहे तरीही ही योजना शहरात सुरू नाही असे असताना देखील ही बिल वसुली अन्यायकारक आहे या पाणीबिलाच्या विरोधात काही महिन्यांपूर्वी मनसेने कराडात आवाज उठवला होता अनेक राजकीय सामाजिक संघटनांनी देखील या विषयाला विरोध केला होता सातारा जिल्हाधिकारी यांनी त्यावेळी कराडातील या पाणीबिलाच्या वसुलीला स्थगिती दिली हाती तरीही सध्या पालिकेकडून ही अवाजवी व अन्यायकारक वसुली होताना दिसत आहे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा हा अपमान आहे लवकरात लवकर ही वसुली थांबवण्यात यावी अन्यथा कराड शहरात मनसेच्या वतीने आंदोलन छेडेले जाईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष ऍड विकास पवार शहर अध्यक्ष सागर बर्गे तसेच पैलवान सतीश यादव नितीन महाडिक आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते
No comments:
Post a Comment