वेध माझा ऑनलाइन । अजितदादा पवार व शरद पवार यांचा राजकारणाचा फंडा राज्याला काही नवीन नाही... पुतण्याला वाटलं असावं की आपल्या हातात हे म्हतारं काय कारभार देत न्हाई...म्हणून पुतण्या खळखळ कर्तुया... मग म्हातारं...हातात घुंगराची काठी घेऊन वाजवत... वाजवत येतया...मग त्या काठीच्या घुंगराचा आवाज ऐकून बाकी काही जण म्हणत्यात... म्हाताऱ्याच सगळं ह्यो पुतण्या एकटाच हाणील ...अस सगळं त्यांचं राजकारण चाललया... अस म्हणत रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी ग्रामीण बाजमध्ये पवार काका-पुतण्यावर टीका केली... त्यावेळी त्याठिकाणी एकच हशा पिकला...
राज्यातील शेतकरी ऊस वाहतूकदार तसेच सरपंच परिषद यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्या 22 मे ला कराड ते सातारा पदयात्रा काढण्यात येणार आहे त्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ... त्यावेळी विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि शरद पवार यांच्या भाजप बद्दलच्या मधल्या काळातल्या भिन्न- भिन्न दिसणाऱ्या भूमिकेविषयी पत्रकारांनी सदाभाऊंना विचारले असता सदभाऊनी आपल्या खास शैलीत काका- पुतण्यावर खरमरीत टीका करत उत्तर दिले...
दरम्यान, काढण्यात येणाऱ्या पडयात्रेविषयी माहिती देताना सदाभाऊ म्हणाले... शेतकरी सध्या खूप अडचणीत आहे त्याच्या व्यथा सरकारने समजून घेतल्या पाहिजेत यासाठी आमचा हा प्रयत्न आहे या पदयात्रेमध्ये ऊस उत्पादक काजू उत्पादक द्राक्ष उत्पादक तसेच प्रत्येक वंचीत घटक सामील होणार आहे...कराड येथील यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन व कृष्णामाईचा आशीर्वाद घेऊन या पदयात्रेची सुरुवात होणार आहे... साताऱ्यात ही पदयात्रा पोचल्यानन्तर वाहनांने आम्ही पुढे मुंबईत सरकार दरबारी शेतकरीवर्गाच्या व्यथा मांडण्यासाठी पोचणार आहोत... हजारोंच्या संख्येने शतकरी वर्ग पोराबाळांसहित या यात्रेत भर उन्हातून सहभागी होणार आहे... असेही त्यांनी सांगितले...
No comments:
Post a Comment