वेध माझा ऑनलाइन । कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला पकडल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले होते. याच प्रकरणात आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडेंनी २५ कोटींची खंडणी शाहरुख खानकडे मागितली होती असा आरोप आहे. त्याच संदर्भात त्यांची सीबीआय चौकशी सुरु झाली आहे. सीबीआय चौकशीचा आजचा दुसरा दिवस होता. शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस पाच तास त्यांची चौकशी करण्यात आली.
समीर वानखेडेंनी उच्चारले फक्त दोन शब्द
सीबीआयची आजची चौकशी संपल्यानंतर समीर वानखेडे प्रतिक्रिया देतील अशी आशा माध्यमांना होती. मात्र समीर वानखेडे बाहेर आले. मीडियाने त्यांना प्रश्न विचारले त्यावर सत्यमेव जयते! एवढेच दोन शब्द उच्चारत समीर वानखेडे तिथून निघून गेले.
No comments:
Post a Comment