Saturday, May 6, 2023

संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार ; नितेश राणेंचा गौप्यस्फोट ;राज्याच्या राजकारणात खळबळ ;

वेध माझा ऑनलाइन - भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांबाबत खळबळजनक दावा केला आहे. राजकारणात आणखी एक भूकंप होणार आहे. येत्या आठवड्यात हा भूकंप होऊ शकतो. उद्धव ठाकरे यांचा पक्ष राहिला नसल्यानं आता संजय राऊत हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या पवारांसोबत अनेक बैठका झाल्याचा दावाही नितेश राणे यांनी केला आहे.

राज्यात पुढच्या आठवड्यात आणखी एक राजकीय भूकंप होणार आहे. संजय राऊत यांच्या शरद पवारांसोबत अनेक बैठका झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता राहिला नसल्यानं संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत यांची भूमिका पहा ते कायम अजित पवारांवर टीका करत आले आहेत. संजय राऊत यांची अशी अट आहे की, ज्या दिवशी अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडतील त्यादिवशी ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं राणे यांनी म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment