Friday, May 12, 2023

कर्नाटक विधानसभा निवडणुक निकाल ; काँग्रेसचा विजय होईल आणि बहुमत मिळेल? तर भाजप पिछाडीवर गेल्याचे सध्याचे चित्र ; वाचा बातमी ;

वेध माझा ऑनलाइन ; कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल आता हाती यायला लागले आहेत. राज्याक काँग्रेसचा विजय होईल आणि बहुमत मिळेल असे सध्याच्या परिस्थितीवरुन दिसत आहे. काँग्रेसच्या जागा वाढताना दिसत आहेत तर भाजप पिछाडीवर गेल्याचे चित्र आहे. 

सकाळी ९ वाजताची आकडेवारी
भाजप - ७४काँग्रेस - ११५जेडीएस - २४इतर - ११

गेल्या निवडणुकीतील निकालांची तुलना करता यावेळी भाजपला ६६ जागा कमी मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेस २६ आणि जेडीएसला २२ जागा कमी लागत असल्याचे दिसत आहे. आघाडीचा विचार केला तर भाजप फक्त २२ जागांनी वाढताना दिसत आहे तर काँग्रेस तब्बल ६९ जागांनी वाढताना दिसत आहे. जेडीएस १४ तर इतर ११ ठिकाणी वाढताना दिसत आहेत.
 मतदान यंत्रात सुरक्षित असलेल्या राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होईल. राज्य आणि देशाचे लक्ष लागलेल्या या मतमोजणीसाठी राज्यव्यापी निवडणूक आयोगाने सर्व तयारी केली आहे. या निवडणुकीत एकूण 2,615 उमेदवार रिंगणात होते. यापैकी 2,430 पुरुष उमेदवार आणि 184 महिला उमेदवार आहेत. 
भाजपने 224 उमेदवार उभे केले. काँग्रेसने 223 उमेदवार उभे केले आहेत. जेडीएस पक्षाकडून एकूण 209 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. आम आदमी पक्षाकडून २०९ उमेदवार निवडणूक लढले. बसपाकडून 133 उमेदवार निवडणूक लढले आहेत. कर्नाटक राष्ट्र समितीमधून १९५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. इतर नोंदणीकृत राजकीय पक्षांचे 254 उमेदवार रिंगणात आहेत. तर 918 अपक्ष उमेदवार रिंगणात असून त्यांच्या भवितव्याचा निर्णय आज दुपारपर्यंत जाहीर होणार आहे. 

No comments:

Post a Comment