Wednesday, May 10, 2023

वेध माझा ऑनलाइन ; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल यायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. गुरूवारी सकाळी निकालाच्या सुनावणीला सुरूवात होणार आहे. 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार, यावर महाराष्ट्राचं राजकारण ठरणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांचं मत मांडलं आहे. ठाकरे गटाकडून सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप केला जात आहे, पण या आरोपांची हवाही अजितदादांनी काढली आह

'145 आमदारांचं पाठबळ जोपर्यंत त्यांच्याकडे आहे, तोपर्यंत सरकारला धोका आहे, असं म्हणण्यात अर्थ नाही. सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, त्यांना निर्णय देण्याचा पूर्ण अधिकार आहे. 16 आमदारांचा मुद्दा ते विधानसभा अध्यक्षांकडे पाठवतील, असं मला वाटतं. विधिमंडळातील ही बाब आहे, त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडेच हे जाईल, अशी शक्यता नाकारता येत नाही', असं अजित पवार म्हणाले.

आत्याबाईला मिशा असत्या तर, याला काय अर्थ आहे? 145 चं बहुमत त्यांच्याकडे आहे. खूप जणांनी वेगवेगळी वक्तव्य केली. घटनाबाह्य सरकार, अमूक सरकार तमूक सरकार. जरी म्हणायला तसं असलं तरी अर्थसंकल्प त्यांनी सादर केला. ते सरकार चालवत आहेत, निर्णय घेत आहेत. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला जे अधिकार आहेत, त्याचा ते पुरेपूर वापर करत आहेत, हे आपण मागचे 11 महिने पाहत आलो आहोत', अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.


No comments:

Post a Comment