वेध माझा ऑनलाइन। कोल्हापूरमध्ये आगीची मोठी घटना घडली आहे. शहरातील शिवाजी रोड परिसरातील दुकानाला भीषण आग लागली आहे. एका दुकानाला आग लागल्यानंतर शेजारी असलेले आणखी दुकानं आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरातील शिवाजी रोड परिसरातील आज दुपारी दुकानांना आग लागली. एका दुकानाला आग लागली आणि बघता बघता शेजारी असलेल्या इतर दुकानांमध्येही आग पसरत गेली.
No comments:
Post a Comment