Monday, May 15, 2023

शिंदे सेनेच्या गुंडांकडून पत्रकारांना जबर मारहाण ; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या समोरच गुंडांची पत्रकारांना मारहाण ; संतापजनक प्रकार ;

वेध माझा ऑनलाइन । मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यासमोरच शिंदे सेनेच्या गुंडांची पत्रकारांना जबर मारहाण केल्याचा प्रकार चुनाभट्टी येथे घडला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाचा फ्लॉप शो झाला. त्यावेळी काही पत्रकारांनी रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढल्याने गुंडांनी त्यांना बेदम मारहाण केली. याबाबत चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला. विशेष म्हणजे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असलेला गृहमंत्री व्यासपीठावर असताना शिंदे सेनेच्या गुंडांनी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण केली. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे बारा वाजल्याचेच हे निदर्शक मानायला हवे.

चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात पालिकेच्या महिला-बाल कल्याण विभागाचा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंतत्री यांच्या हस्ते शहरातील 27 हजार गरजू महिलांना यंत्रसामुग्री वाटप केले जाणार होते. या कार्यक्रमात कोणतीही यंत्रासामुग्री मिळणार नाही, फक्त कूपन दिले जाणार असल्याची माहिती मिळताच अनेक महिलांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री व्यासपीठावर असतानाच महिला कार्यक्रमातून निघून जाऊ लागल्या. मैदानातील निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या. त्याचे वार्तांकन करणाऱ्या दोन पत्रकारांना शिंदे सेनेच्या गुंडांनी मारहाण केली.
शनिवारी घडलेला हा संतापजनक प्रकार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महिलांना यंत्रसामुग्री वाटप कार्यक्रमातील हा दुर्दैवी प्रकार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्यक्षात यंत्रसामुग्री न देता फक्त व्यासपीठावर उपस्थित राहतील. त्यांच्याकडून फक्त कूपन वाटप केले जात असल्याची माहिती कळताच अनेक महिला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येण्याच्या आधीच कार्यक्रमस्थळाहून निघून गेल्या होत्या. शिंदे-फडणवीस आल्यानंतरही, शिंदे सेना कार्यकर्त्यांनी रोखूनही महिलांनी निघून जाणे सुरूच ठेवले. त्यामुळे कार्यक्रमस्थळी रिकाम्या खुर्च्याच दिसत होत्या. निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या असल्याचे फोटो काढत असताना दोन पत्रकारांना शिंदे सेनेच्या काही गुंडांनी जबर मारहाण केली. या पत्रकारांना चुनाभट्टी पोलिसांनी जीवाची पर्वा न करता गुंडांच्या घोळक्यातून बाहेर काढले. हे गुंड पोलिसांवरही धावून जात होते. पोलिसांना न जुमानता त्यांची गुंडगिरी सुरू होती. जिगरबाज पोलिसांमुळे या पत्रकारांचा जीव बचावला. पोलिसांना न जुमानता गुंडांकडून पत्रकारांना मारहाण होत असताना राज्याचा गृहमंत्री कार्यक्रमस्थळी होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही पत्रकारांना गुंडांकडून मारहाण होत असताना व्यासपीठावरून पहात होते.

No comments:

Post a Comment