वेध माझा ऑनलाइन ; पंतप्रधान नरेंद्र मोदी 2000 रुपयांची नोट चलनात आणण्याच्या बाजूने नव्हते, परंतु ते त्यांच्या टीमच्या सल्ल्यानुसार गेले', असा गौप्यस्फोट पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी केला आहे. मिश्रा यांनी 2016 मध्ये नोटाबंदीचे निरीक्षण केले होते.
नृपेंद्र मिश्रा यांनी एका चॅनेल शी बोलताना सांगितले की, 'ही नोटाबंदी नाही तर 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेणे आहे. नोटाबंदीच्या वेळी 2000 रुपयांची नोट चलनात आणण्याची सूचना करण्यात आली होती, जी पंतप्रधानांना आवडली नाही. मात्र, कर्णधार म्हणून आपल्या टीमच्या सल्ल्याने त्यांनी या नोटांना परवानगी दिली. तेव्हा ते अगदी स्पष्ट होते आणि आम्हीही होतो की ही एक अल्पकालीन व्यवस्था असेल.'
यासोबतच ते म्हणाले, 'गरीब आणि मध्यमवर्गीय लोक 2000 रुपयांच्या नोटा वापरत नाहीत, ते 500 आणि 100 रुपयांच्या छोट्या नोटा वापरतात आणि पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, गरीबांना याचा फटका बसू नये अशी त्यांची इच्छा आहे. '
No comments:
Post a Comment