वेध माझा ऑनलाइन - 100 कोटी वसुली प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने अखेर ताब्यात घेतलं आहे. आज सकाळी अनिल देशमुख यांची जेजे हॉस्पिटलमधून सुटका झाली. त्यानंतर आर्थर रोड जेल येथून अनिल देशमुख यांना ताब्यात घेतले असून कोर्टात हजर केले जाणार आहे.
100 कोटी वसुली प्रकरण आणि मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सीबीआयच्या पथकाने सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांचे सचिव संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांना अटक केली आहे. मात्र अनिल देशमुख जेजे रुग्णालयात भर्ती असल्याने त्यांची अटक टळली होती. आज सकाळीच अनिल देशमुख जेजे रुग्णालयातून आर्थर रोड कारागृहात आले होते. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने कारागृहात येऊन अनिल देशमुख यांना ताब्यात घेतले. अनिल देशमुख यांना थोड्याच वेळात विशेष सीबीआय कोर्टात हजर केले जाणार आहे.मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. तीन दिवसांपूर्वीच या प्रकरणाचा तपास पुन्हा एकदा सीबीआयकडे आला होता. त्यानंतर सचिन वाझे सह अटक सत्र सुरू झाले. सीबीआयने आता देशमुखांना ताब्यात घेतले आहे.
अनिल देशमुख आणि इतर भ्रष्टाचार प्रकरणात जवळपास 400 कोटींच्या घोटाळ्याची माहिती समोर आली आहे, अशी माहिती सीबीआय अधिकाऱ्यांची विशेष सीबीआय कोर्टात माहिती दिली होती. अनिल देशमुख यांच्या प्रकरणार राज्य सरकार सहकार्य करत नाही. अनिल देशमुखांची कास्टडीची परवानगी मिळाल्यानंतर आर्थर रोड जेल प्रशासनाने सोमावरी कास्टडी देण्याचा सांगितलं होतं. मात्र आज जेव्हा सीबीआय अधिकारी आर्थर रोड जेलमध्ये गेले तेव्हा सांगण्यात आलं की, देशमुखांना जेजे मध्ये भर्ती आहेत. अनिल देशमुख यांना जे जे मध्ये भरती करण्यात आले याबाबत सीबीआय अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर संशय व्यक्त केला होता.आरोपीना दिल्ली घेऊन जाऊन चौकशी करण्याचाही ही मागणी सीबीआयने केली होती. पण, हायकोर्टाने मुंबईतच चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
No comments:
Post a Comment