Tuesday, April 5, 2022

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर ईडीच्या रडारवर ; ? काय आहे कारण?

वेध माझा ऑनलाइन - एकीकडे महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा कायम आहे. तर आता दुसरीकडे ईडीने आपला मोर्चा सामाजिक कार्यकर्त्यांकडे सुद्धा वळवला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आता ईडीच्या रडारवर आहे. 17 वर्षांपूर्वीच्या व्यवहारात काही संशयास्पद नोंदी सापडल्या आहेत. याबद्दल ईडी लवकरच मेधा पाटकर यांना चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे.

संजीवकुमार झा यांनी ईडी कडे तक्रार केली आहे. मेधा पाटकर प्रमुख विश्वस्त असलेल्या संस्थेच्या काही देणग्या संशयास्पद असल्याचा दावा करण्यात आला आहे. नर्मदा नवनिर्माण अभियान संस्था ही आहे. ही संस्था बृहन्मुंबई चॅरिटी कमिशनर यांच्याकडे नोंदणी असलेले एनजीओ आहे. यात मेधा पाटकर या मुख्य विश्वस्त आहेत.
वेगवेगळ्या 10 लोकांकडून 1 कोटी 19 लाखाच्या देणग्या मिळाल्या होत्या. 2021 ला माझगाव डॉककडून 62 लाखांची देणगी सुद्धा मिळाली होती. महसूल गुप्तचर संचलनालंय,आयकर विभागाही मेधा पाटकर यांच्या संस्थेच्या व्यवहारांची चौकशी करत आहे. काही व्यवहार संशयीत असल्याचा डीआयआरचा अहवाल आहे.डी आय आरसह  ईडीही चौकशी करणार आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कडून 62 लाख मेधा पाटकर यांच्या संस्थेला जानेवारी 20 ते मार्च 21 या काळात 6 वेळा देण्यात आले. या रकमेवर ईडीनं माझगाव डॉकला खुलासा मागितला आहे. सरकारी संस्थेनं एनजीओला पैसे देण्याचं कारण विचारलं आहे. हा खुलासा आल्यानंतर, मेधा पाटकर यांना ईडी चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment