Wednesday, April 6, 2022

डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कलामहोत्सवाला रसिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद...


वेध माझा ऑनलाइन - 
वाठार (ता. कराड) येथील कृष्णा फौंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णा कला महाविद्यालयाच्यावतीने कृष्णा कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कलामहोत्सवाला रसिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे.

कृष्णा फौंडेशनच्यावतीने वाठार येथे कृष्णा कला महाविद्यालय चालविले जाते. याठिकाणी फौंडेशन कोर्स, आर्ट टिचर डिप्लोमा, जी. डी. आर्ट, ए. एम. असे कलाविषयक पदवी व पदविका अभ्यासक्रम शिकविले जातात. या अभ्यासक्रमांना शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कलाप्रदर्शन ‘कृष्णा कलामहोत्सव’ या नावाने कराड येथील टाऊन हॉल येथे भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, डॉ. अतुलबाबा भोसले, कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, कृष्णा विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, कृष्णा फौंडेशनचे कार्यकारी संचालक डॉ. विनोद बाबर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 

सर्वच मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध कलाकृती, रेखाचित्रे, पेंटींग्ज पाहून विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी तुषार शिर्के, ॠषिकेश कुलकर्णी, विकास यादव व अपूर्वा पाटील यांना उत्कृष्ट कलाकृती पुरस्काराने मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले. 

दरम्यान, या कला प्रदर्शनात सांगली येथील कलाविश्व महाविद्यालयातील सहाय्यक अधिव्याख्याता व प्रख्यात चित्रकार मधुकर कराळे यांनी व्यक्तिचित्रण प्रात्यक्षिक आणि सांगली येथील चित्रकार मंगेश पाटील यांनी स्थिरचित्रण प्रात्यक्षिक सादर केले. हे कलाप्रदर्शन ७ एप्रिलअखेर सायंकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांना पाहण्यास खुले असणार आहे. यावेळी कला महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अर्पिता पवार, प्रा. योगश पवार, सचिन पवार, उमेश शिंदे यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी व कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृष्णा कला गौरव पुरस्कार प्रदान

कलाक्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या कलाकारांना कृष्णा कला महाविद्यालयाच्यावतीने दरवर्षी कला गौरव पुरस्कार प्रदान केला जातो. यंदाचा कृष्णा कला गौरव पुरस्कार डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते कराड येथील द. शि. एरम मूकबधिर विद्यालयाचे कला विभागप्रमुख चंद्रकांत भिसे व कलाशिक्षक विजयकुमार घाडगे यांना प्रदान करण्यात आला. 

मूकबधिर विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना विशेष दाद

या कलाप्रदर्शनात मूकबधिर विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींचेही प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्यांच्या या कलाकृतींना रसिकांची विशेष दाद लाभत आहे. या कलाकृती साकारणाऱ्या सुवर्णा भोसले, प्रियांका दुबळे, सागर यादव, अनिकेत सपकाळ, प्रियांका पाटील या विद्यार्थ्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.



No comments:

Post a Comment