Thursday, June 30, 2022

सत्ताबदल झाला ; शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांची माहिती...

वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सत्ताबदल झाला आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रामध्ये हा शपथविधी झाल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितलं आहे.

2004, 2009, 2014 आणि 2020 च्या निवडणूक शपथपत्राबद्दल आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे, सत्ताबदलानंतर आलेली ही नोटीस हा फक्त योगायोग आहे का आणखी काही? असं ट्वीट महेश तपासे यांनी केलं आहे

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री ; आज सायंकाळी 7 30 ला होणार शपथविधी...

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेनेच्या आमदारांची कुचम्बना होत होती उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या कामांना प्राधान्य देताना दिसले ही खंत शिवसैनिकांनी अनेकदा बोलून दाखवली असे सांगत ज्यांच्याशी आतापर्यंत बाळासाहेब ठाकरे लढले इथून पुढे पण त्यांच्याच विरोधात लढायचं आहे 
अशा सोबत मांडीला मांडी लावून बसणे राज्यातील लोकांना आवडले नाही सत्तेदरम्यान भ्रष्टाचार पहायला मिळाला मंत्री जेलमध्ये गेले हे सगळं पाहून लोक नाराज होते  निवडणूकीचा कौल जनतेने वेगळा दिला होता आणि राज्य चालवताना वेगळंच चित्र निर्माण केलं गेलं त्यामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे असेही फडणवीस म्हणाले
दरम्यान, यावेळी होणाऱ्या नव्या मंत्रीमंडळाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आता यापुढे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल  मी मंत्रिमंडळात असणार नाही असे आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले ते मुंबई येथे जाहीर पत्रकार परिषदेत बोलत होते 

भाजप चे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी चर्चा व भाकिते व्यक्त केली जात असतानाच भाजपच्या वतीने स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील असे पत्रकार परिषदेत जाहीर केल्याने अनेक विश्लेषण करणाऱ्याच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत भाजपच्या या नव्या खेळीने भविष्यात आणखी काय राजकारण राज्यात घडून येणार आहे याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे

दरम्यान, आज सायंकाळी 7 30 वाजता नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शपथ घेतली असेही फडणवीस यावेळी म्हणाले

फडणवीसांसोबत आणखी 5 जण घेणार शपथ ! ; कोण आहेत ते पाच जण? ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. आता फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले आहे. फडणवीस आणि एकनाथ शिंदे आजच राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. त्यानंतर आज किंवा उद्या फडणवीस यांच्यासह ५ जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहे.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईत दाखल झाले आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दुपारी ३ः३० वाजेच्या सुमारास राजभवनावर जाणार आहे. यावेळी फडणवीस आणि शिंदे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर फडणवीस सरकारचा आज संध्याकाळी किंवा उद्या शुक्रवारी शपथविधी होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे शपथ घेतील. त्यांच्यासोबत इतर आणखी ५ नेते हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण हे चार नेते भाजपकडून शपथ घेणार आहे. तर एकनाथ शिंदे सुद्धा शपथ घेण्याची शक्यता आहे.

शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेत बंड होणार असल्याची माहिती 4 वेळा दिली होती!; गृहमंत्र्यांनी देखील केलं होतं सावध! ; गुप्तचर यंत्रणेकडून माहिती आली समोर... ;

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी तब्बल ३९ आमदारांना घेऊन शिवसेनेमध्ये बंड पुकारला. एवढ्या मोठ्या संख्येनं आमदारांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना याची माहिती कशी नव्हती? असे सवालही उपस्थितीत झाले होते. पण, उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ४ वेळा बंडखोरी होणार असं सांगितलं असल्याचे समोर आले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळले आहे. एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घेऊन आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीमध्ये मुक्काम ठोकला होता. मध्यंतरी हे बंड शिवसेनेकडूनच प्रायोजित असल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. मात्र, खुद्द शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना याबद्दल माहिती होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच ४ वेळा शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे हे बंडखोरी करणार आहे, अशी माहिती दिली होती, अशी माहिती मिळत आहे. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून सहा वेळा पक्षात बंडखोरी होणार असल्याची माहिती दिली होती, अशीही माहिती आहे. गुप्तचर यंत्रणेनं दिलेल्या माहितीच्या आधारे ही माहिती समोर आली आहे.

देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी कदाचित आजच होणार !

वेध माझा ऑनलाइन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. आता फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरकार स्थापन होणार आहे. त्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. फडणवीस आणि एकनाथ शिंदे आजच राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे, त्यानंतर आज किंवा उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईकडे निघाले आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दुपारी ३ः३० वाजता राजभवनावर जाणार आहे. यावेळी फडणवीस आणि शिंदे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर फडणवीस सरकारचा आज संध्याकाळी किंवा उद्या शुक्रवारी शपथविधी होऊ शकतो, अशी माहिती मिळत आहे. त्यांच्यासोबत आणखी इतर 5 मंत्री शपथ घेतील अशीही माहिती मिळत आहे

विरोधी पक्ष नेतेपदी अजित पवार !! ; दादांचा दबदबा कायम राहणार !

वेध माझा ऑनलाइन - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ३९ आमदारांना सोबत घेऊन ऐतिहासिक बंड केल्यामुळे ठाकरे सरकार कोसळण्याची नामुष्की ओढावली. आता राज्यात भाजपाशासित सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. यात राज्याचं नेतृत्व पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलं जाईल. याची फक्त औपचारिकता आता बाकी आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं विरोधात बसण्याची तयारी देखील केली आहे. राज्याच्या विधानसभेचा विरोधी पक्षनेता खरंतर 'शॅडो मुख्यमंत्री' म्हणून ओळखला जातो. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधातील सर्वात मोठा पक्ष ठरतो. कारण राष्ट्रवादीचे काँग्रेसचे विधानसभेत ५३ आमदार आहेत. तर शिवसेनेचे ५५ आमदार असले तरी बंडखोरीमुळे ३९ आमदारांनी वेगळा मार्ग स्वीकारला आहे. शिंदे गटाकडून त्यांचा गटच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. अशात विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकतं आणि अजित पवार या भूमिकेत दिसू शकतात. 

महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांचा दबदबा होता. उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद अशी दोन्ही महत्वाची पदं अजित पवार यांच्याकडे होती. अजित पवारांचा हाच दबदबा कायम ठेवत ते राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या भूमिकेत पाहायला मिळू शकतील. 


एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून निवड ; उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याचा आपल्याला आनंद नाही ; गोव्यात दिली प्रतिक्रिया...

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून निवड केली आहे. एकनाथ शिंदे यांनीच गोवा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे मुंबईसाठी रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे मुंबईत येऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. याआधी गोवा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याचा आपल्याला आनंद नाही असंही सांगितलं.

गोव्यात बंडखोर आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीसंबंधी विचारलं असता एकनाथ शिंदे यांनी बैठकीत शिवसेना पक्षाचा गटनेता म्हणून माझी निवड झाली असल्याचं सांगितलं. “सरकार स्थापनेसंदर्भातील पुढील प्रक्रियेसाठी सर्व ५० आमदारांनी मला अधिकार दिले आहेत. मुंबईत गेल्यानंतर पुढील रणनीती ठरवणार आहे. मी परत गोव्याला येणार आहे,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्याचा आम्हाला आनंद नाही. जी परिस्थिती उद्भवली होती त्यात सर्व ५० आमदारांची एकच मागणी होती. आमदारांना मतदारसंघात काही प्रश्न, अडचणी होत्या. वाईट अनुभव येत होते. तेव्हा आपण बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाऊयात अशी सर्व ५० आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी होती. वेळीच निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. आम्हाला कोणालाही आनंद नाही. उद्धव ठाकरेंबद्दल आमच्या मनात कालही आदर होता आणि आजही आहे”.

Wednesday, June 29, 2022

इकडे सरकार कोसळलं अन् तिकडे बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी क्लीन चिट!!

वेध माझा ऑनलाइन - उद्धव ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदारांने केलेल्या बंडखोरीमुळे सरकार अल्पमतात आले होते. या बंडखोर आमदारांमध्ये बच्चू कडू यांचाही सहभाग होता. इकडे सरकार कोसळलं अन् तिकडे बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी क्लीन चिट मिळाली आहे. 

अकोल्याचे मावळते पालकमंत्री बच्चू कडूंना तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणातून क्लीनचीट मिळाली आहे.. अस्तित्वात नसलेल्या तीन रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी 95 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप त्यांच्यावर होता. वंचित बहूजन आघाडीच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर आरोप झाले होते.  हे प्रकरण कोर्टात दाखल होतं. सिटी कोतवाली पोलिसांत बच्चू कडूंवर फसवणूकीचे गुन्हे दाखल झालेले होते. संपुर्ण प्रकरणात पुरावे नसल्यानं प्रकरणच तथ्यहिन असल्याचं पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या प्रकरणाची फाईल पोलिसांनी बंद केली आहे.  
 
वंचित बहुजन आघाडीनं अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर आर्थिक अपहाराचे गंभीर आरोप केले होते. पालकमंत्री बच्चू कडूंनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर निधी वळता करीत 1 कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा आरोप वंचितनं केला होता. याची ठिणगी तीन रस्त्यांच्या कथित कामांवरून पडली. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शिफारस केलेली रस्त्यांची कामं पालकमंत्री कडूंनी डावलल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेला डावलत आपल्या मर्जीतील रस्त्यांची कामं नियमबाह्यपणे करवून घेतल्याचा आरोप वंचितनं केला. यातील दोन रस्ते अस्तित्वातच नसल्याचे पुरावे त्यांनी सादर केले होते. या तीन रस्त्यांच्या कामांत बच्चू कडूंनी एक कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा आरोप वंचितनं केला होता. यात जिल्हा परिषदेच्या अधिकारावर पालकमंत्र्यांनी अतिक्रमण केल्याचं वंचितनं म्हटलं होतं. यात रस्त्यांचे 'ग्रामा (ग्रामीण मार्ग) क्रमांक' नसतांना कामांना प्रशासकीय मान्यता कशी मिळू शकते, असा सवाल वंचितनं केला होता. दरम्यान, वंचितच्या तक्रारीनंतर अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरांनी या तीन रस्त्यांसह 25 कामांना दिली स्थगिती दिली होती. 


जाता-जाता अजितदादांचा कामाचा धडाका ; 1690 कोटींची कामे मंजूर ;

वेध माझा ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. अखेर उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनामा दिला आहे. परंतु, राजीनामा देण्याआधी महाविकास आघाडी सरकारने धडाधड निर्णय घेतले आहे. मावळते अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांमध्ये 1690 कोटींची कामं मंजूर केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आम्हाला निधी देत नाही, असा आरोप करून एकनाथ शिंदे आणि ३९ आमदारांनी बंड पुकारले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अखेरीस कोसळले आहे. पण अजित पवारांवर निधी न देण्याचा आरोप होत असला तरी मागील दोन दिवसांमध्ये त्यांनी धडाधड निर्णय जाहीर केले आहे. महाविकास आघाडी सरकारवर अस्थिरतेचे ढग निर्माण झाले होते, त्या दोन दिवसांमध्ये अजित पवार यांनी १२९६ कोटी निधी वाटपाला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, एकट्या पुण्यात १,६९० कोटींच्या कामांची मंजुरी दिली आहे, असं वृत्त दिव्य मराठीने दिलंय
मागील काही दिवसांपासून सरकार राहणार की जाणार अशी चर्चा रंगली असतानाही अजित पवार हे आपल्या कामात व्यस्त होते. नियमितपणे अजित पवार बैठका घेऊन निर्णय घेत होते. विशेष म्हणजे, अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते सध्या क्वारंटाईन आहे. पण, तसं असलं तरीही अजित पवार यांनी शेवटच्या दिवसापर्यंत काम केलं. मागील दोन दिवसामध्ये पुणे जिल्ह्यासाठी अजितदादांनी भरघोस निधी दिला आहे. पुणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या विकासकामांसाठी निधी मंजूर केला आहे.
१६०९ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहेत. पुणे जिल्ह्यासाठी एकूण १२९३ कोटींची मंजुरी दिली आहे. यामध्ये जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकासासाठी ३४९ कोटी, संभाजी महाराज समाधी स्थळ विकासासाठी २६९ कोटी आणि नगरपालिका, परिषदा, पंचायतींसाठी ६७५ कोटींचा निधी देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, राज्य सरकारनेही मागील काही दिवसांमध्ये १६० पेक्षा जास्त जीआर काढले आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना पत्र लिहून याबद्दल तक्रार केली आहे. त्यानंतर राज्यपालांनी याबद्दल खुलासा मागवला आहे.

मुख्यमंत्री आज रात्रीच राजीनामा देण्याची शक्यता ; फ्लोर टेस्टला सामोरे जाणार नाहीत. ; खात्रीलायक माहिती...

वेध माझा ऑनलाइन - राज्याच्या राजकारणातील आज सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. राज्यपालांनी उद्या फ्लोर टेस्टचे आदेश दिले आहेत. पण मुख्यमंत्री या फ्लोर टेस्टला सामोर जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आज रात्रीच राजीनामा देण्याची शक्यता असल्याची खात्रीलायक माहिती आहे

आपल्याच लोकांनी आपल्याला दगा दिला म्हणून मुख्यमंत्री व्यथित झाले आहेत. त्यामुळे ते फ्लोर टेस्टला सामोरे जाणार  नाहीत. त्याऐवजी ते आजच राजीनामा देतील, अशी माहिती मिळाली आहे. माझीच माणसं माझ्याविरोधात मतदान करताना पाहायचं नाहीय, असं उद्धव ठाकरे आपल्या निकटवर्तीयांसोबत चर्चा करताना म्हणाल्याची माहिती मिळाली आहे.

औरंगाबादच नामकरण संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचं धाराशीव नामकरणास मान्यता ; ठाकरे सरकारचा कॅबिनेटमध्ये निर्णय...

वेध माझा ऑनलाइन - राज्य मंत्रिमंडळात आज खूप मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. औरंगाबाद शहराचा नामकरणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. भाजप आणि मनसेकडून नामकरणाच्या मुद्द्यावरुन अनेकदा महाविकास आघाडी सरकारला घेण्यात आलं आहे. त्यामुळे अखेर महाविकास आघाडी सरकारकडून याबाबतचा आज निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या 50 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे हे सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने औरंगाबाद नामकरणाचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे फक्त औरंगाबादच नाही तर उस्मानाबाद शहराचं देखील धाराशीव नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. तसेच नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाकरे सरकारचे महाराष्ट्राच्या इतिहासातील हे सर्वात मोठे निर्णय मानले जातील.

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून भावनिक विधान केलं. "तुम्ही जे सहकार्य केले त्यासाठी धन्यवाद! आता जी कायदेशिर प्रक्रिया त्याला सामोरे जाऊ. मला माझ्याच लोकांनी धोका दिला म्हणून सध्याची परिस्थिती निर्माण झाली. या अडीच वर्षात तुम्ही सहकार्य केलं. माझ्याकडून कुणाचा अपमान झाला असेल, किंवा कुणी दुखावले असतील तर मी माफी मागतो", असं मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांना कॅबिनेट बैठकीत म्हणाले.

मुंबईत सीआरपीएफचे २ हजार जवान विशेष विमानांनी मुंबईत दाखल ; बंडखोर आमदार उद्या गोव्याहून मुंबईत दाखल होणार ;

वेध माझा ऑनलाइन - बंडखोर आमदार उद्या गोव्याहून मुंबईत दाखल होणार आहेत. उद्या बहुमत चाचणी होणार असून बंडखोर आमदार सुद्धा उद्या मुंबईत येणार असून सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईत सीआरपीएफचे २ हजार जवान दाखल झाले आहेत. तीन विशेष विमानांनी जवान मुंबईत दाखल झाले आहेत. तर बंडखोर आमदारांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे.

बंडखोर आमदार मुंबईत दाखल झाल्यानंतर मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचू नये म्हणून मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस तयारीला लागले होते. तरीदेखील केंद्र सरकारने सीआरपीएफचे जवान मुंबईत पाठवून बंडखोर आमदारांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याआधी बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरवली होती. शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या विरोधात महाराष्ट्रात झालेल्या परिस्थिती आढावा घेता केंद्राने सीआरपीएफ जवानांच्या तुकड्या मुंबईत पाठवल्या आहेत. विशेष तीन विमानाने मुंबईत २ हजार जवान दाखल झाले आहेत. 

उद्या बहुमत चाचणी होणार असून बंडखोर आमदार देखील या चाचणीत आपलं मत देणार आहेत. त्यासाठी सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षा कवचामध्ये बंडखोर आमदारांना बसने विधानभवनपर्यंत घेऊन जाण्यात येणार आहे. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी बाळगली जाणार आहे. तसेच भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. कोणतीही प्रक्षोभक वक्तव्य करून नये आणि कोणतीही बॅनरबाजी करू नये अशा प्रकारच्या नोटीस देण्यात आली आहे.

Tuesday, June 28, 2022

उद्याच बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना आदेश...

वेध माझा ऑनलाइन -  मंगळवारी रात्री भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा नववा दिवस आहे. मंगळवारी, भाजपच्या गोटातून मोठ्या घडामोडी घडल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली भाजप श्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर रात्री मुंबईत राज्यपालांची त्यांनी भेट घेतली. सरकारने बहुमत गमावले असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यपालांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यपालांना एक ई-मेलच्या माध्यमातून बंडखोर आमदारांनी पत्र दिलं आहे. शिवसेनेचे 39 आमदारांनी बंडखोरी केली असून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत रहायचं नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावं अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व निकालांचा अभ्यास करुन राज्यपाल त्यांना योग्य ते निर्देश देतील अशी आशा आम्हाला आहे." 


आम्ही उद्या मुंबईत येतोय...एकनाथ शिंदेंनी स्वतः दिली माहिती...

वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत बहुमत चाचणीसाठी येणार असल्याची शिंदेंनी स्वतः माहिती दिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला उद्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागेल. राज्यापालांची एक प्रत राज्यपालांकडे देण्यात आली आहे. 30 जूनला बहुमत सिद्ध होणार आहे. राज्यपालांचे बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आणखी गडद होत चालला आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह केलेल्या बंडामुळं राज्यात राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. सध्या एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार आसाममधील गुवाहाटी येथे वास्तव्याला आहेत. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांना वारंवार परत येण्याचं आवाहन केलं जात आहे. 

 : 

सरकारच काऊंटडाऊन सुरू! देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपालांकडे मोठी मागणी ;

वेध माझा ऑनलाइन - आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी दिल्ली येथे जे पी नड्डा आणि अमित शहा यांनी भेट घेतली. यानंतर काही वेळापूर्वी ते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर आल्याचं समोर आलं आहे. यावेळी भाजपकडून बहुमत चाचणीसाठी पत्र देणार असल्याचं समोर आलं आहे. फडणवीसांच्या दिल्लीवारीनंतर राजकिय घडामोडींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांसोबत चर्चा केली आहे.
दरम्यान सरकार अल्पमतात असल्याने निर्णयात हस्तक्षेप करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपालांकडे करण्यात आली आहे. 

30 तारखेला ठाकरे सरकारची बहुमत चाचणी...
सरकार अल्पमतात असल्याने निर्णयात हस्तक्षेप करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपालांकडे करण्यात आली आहे. याशिवाय बहुमत चाचणीची मागणी करण्यात आली आहे. बंडखोर आमदारांच्या याचिकेची प्रत राज्यपालांकडे देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. राज्यपालांनी 30 तारखेला सकाळी 11 वाजता विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्यात आली आहे, अशीही चर्चा आहे. यावेळीच बहुमत चाचणी घेतली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
राज्यपालांना आज इमेलद्वारे आणि प्रत्यक्ष भाजपकडून पत्र दिलं आहे. आणि या पत्रात राज्याच्या आताच्या परिस्थितीचा उल्लेख केला आहे. शिवसेनेचे 39 आमदार बाहेर आहेत. त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगावं, असं विनंती करणारं पत्र राज्यपालांना देण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लेख केला आहे. यावर राज्यपाल उचित निर्णय घेतील. अशी आम्हाला अपेक्षा आहे.

उद्याच एकनाथ शिंदे गट सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत! सरकार अल्पमतात येणार ; वेगाने हालचाली सुरु...

वेध माझा ऑनलाइन - बंडखोर आमदारांनी त्यांच्या सह्या असलेले पत्र जर राज्यपालांना दिलं तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येणार आहे. असं जर झालं तर राज्यपाल हे पुढील 24 तासात किंवा 48 तासांमध्ये राज्य सरकारला त्यांची बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगू शकतात. त्यानंतर मग विधानसभेमध्ये फ्लोअर टेस्ट होईल. या संबंधी एकनाथ शिंदे गटाकडून सल्लामसलत करण्यात येत असल्याची माहिती आहे. हे पत्र तयार असून उद्या सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास हे पत्र राज्यपालांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे. पण हे पत्र प्रत्यक्षात येऊन देण्यापेक्षा ई- मेलच्या माध्यमातून देण्यात येण्याची जास्त शक्यता आहे.  

दरम्यान, एकीकडे एकनाथ शिंदे गटाकडून राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत असून दुसरीकडे देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन आले आहेत. राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर देंवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती आहे. तसेच दिल्लीवरून जाऊन आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील प्रमुख भाजप नेत्यांशी चर्चा केली आहे. 


येत्या ३० तारखेला सरकारला विश्वासदर्शक ठराव मांडायला सांगा ; भाजपा नेते करणार मागणी...अचानक भाजपा नेते सागर बंगल्यावरून थेट राजभवनाकडे गेल्याने मोठी खळबळ ; दिल्लीतून हिरवा सिग्नल मिळाल्याचे झाले स्पष्ट...

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे आमदार उद्या मुंबईत येण्याची चर्चा असताना काही वेळापूर्वीच अचानक भाजपा नेते सागर बंगल्यावरून थेट राजभवनाकडे गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी या नेत्यांची बैठक झाली. यानंतर हे नेते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत. शिंदे गटात सहभागी झालेले बच्चू कडू आणि १० आमदार उद्या मुंबईत येणार होते. ते राज्यपालांची भेट घेणार होते. दुसरीकडे शिंदे यांनी स्वत: आजचा एक दिवस उद्धव ठाकरेंना निर्णय घेण्यासाठी दिला होता. असे असताना गेल्या आठ दिवसांपासून चिडीचूप असलेले भाजपा नेते थेट राजभवनावर गेल्याने मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. येत्या ३० तारखेला सरकारला विश्वासदर्शक ठराव मांडायला सांगा, अशी मागणी हे भाजपा नेते करणार आहेत. 

यामध्ये फडणवीस यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार आदी नेते आहेत.  थोड्याच वेळात भाजपा नेते राज्यपालांना भेटून बहुमत चाचणी घेण्यासाठीचे पत्र देऊन बाहेर येतील. 

भाजपाने हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याने आपण त्यावर वेट अँड वॉचची भुमिका घेत असल्याचे जाहीर करत यापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला होता. परंतू पडद्यामागे देवेंद्र फडणवीस तीनवेळा दिल्लीला जाऊन आले होते. शिंदेंनी बंड केले त्या दिवशी, नंतर एकदा आणि आज एकदा फडणवीस दिल्लीला गेले होते. यानंतर मुंबईत येताच भाजपाचे नेते फडणवीसांच्या निवासस्थानी जमले होते. तिथून हे नेते थेट राजभवनाकडे गेल्याने दिल्लीतून हिरवा सिग्नल आल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी आता आणखी एक गेम...भाजपकडून सूचक मौन ; प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू दाखल करणार अविश्वास ठराव...

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी विरोधकांनी आता आक्रमक चाली खेळण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील मोठा विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सूचक मौन बाळगले जात असताना दुसरीकडे लहान पक्ष अधिक सक्रिय झाल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात अविश्वास मत ठराव मांडण्यात येणार आहे. मात्र, हा ठराव भाजप मांडणार नसून प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू दाखल करणार आहेत. 

बच्चू कडू हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांचे विधानसभेत त्यांच्यासह दोन सदस्य आहेत. येत्या दोन दिवसांत बच्चू कडू हे राज्यपालांची भेट घेऊन अविश्वास मत ठराव दाखल करण्याची शक्यता आहे. बच्चू कडू हे राज्यपालांची भेट घेऊन पाठिंबा काढल्याचे पत्र सादर करणार असल्याची माहिती आहे. या पत्रानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात. सुप्रीम कोटातील सुनावणीनंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत भाजप नेत्यांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

आमचे कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत, त्यांची नावे सांगा ; एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेला आव्हान...

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे. आमचे कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत, त्यांची नावे सांगावीत असे थेट आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिले. शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर हे तुम्हाला आमच्या निर्णयाची माहिती देतील असेही त्यांनी म्हटले. आज हॉटेल रॅडिसनच्या प्रवेशद्वाराजवळ येत एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

मागील आठवड्यांपासून शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन मध्ये वास्तव्यास आहेत. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या केंद्रस्थानी असलेले एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये पहिल्यांदाच माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, इथं आलेले 50 आमदारा स्वखुशीने आले आहेत. आम्ही अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक असल्याच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. आम्ही या ठिकाणी एक भूमिका घेऊन आलो आहोत. यामध्ये कोणताही स्वार्थ नसल्याचा दावा यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला.

आज शेवटचा दिवस ; सत्तेच्या महानाट्यावर पडदा पडणार? बंडखोर आमदारांनी दिला उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम!

वेध माझा ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तेच्या महानाट्यावर आज पडदा पडणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनीच यासंदर्भातले सूतोवाच केले असून त्यामध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. दीपक केसरकर यांनी टीव्ही ९ शी बोलताना उद्धव ठाकरेंना निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे. आजही आम्ही परत यायला तयार आहोत, उद्धव ठाकरेंनी निर्णय घ्यावा, असं केसरकर म्हणाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी तोडून भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची अट बंडखोर आमदारांनी घातली आहे
बंडखोरी केल्यामुळे एकनाथ शिंदे गटातील अनेक आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. काही ठिकाणी या आमदारांचा ‘गद्दार’ म्हणून देखील उल्लेख केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “आम्हाला गद्दार म्हणण्याचा एकाही शिवसैनिकाला अधिकार नाही. आम्ही हे वारंवार सांगितलं आहे. मी आजही सांगतो की अजूनही निर्णय द्या, आमची परत यायची तयारी आहे. २०-२१ आमदार आमच्या संपर्कात आहेत असं उगाच सांगू नका. एक-दोन लोकांची नावं सांगा, त्यांनाही मुंबईत आणून पोहोचवतो. आम्ही मांडलेली भूमिका शिवसेनेच्या हिताची आहे. किती वेळा हात जोडायचे यालाही मर्यादा आहेत”, असं केसरकर म्हणाले.
 अल्टिमेटम!
दरम्यान, यावेळी बोलताना दीपक केसरकरांनी अप्रत्यक्षपणे या सगळ्या गोंधळाचा आज शेवटचा दिवस असल्याचा अल्टिमेटम उद्धव ठाकरेंना दिला आहे. “आज माझ्या दृष्टीने शेवटचा दिवस आहे. आमच्या पक्षप्रमुखांचं आज जे स्थान आहे, त्यांचा मान राखून राज्यात काहीतरी चांगलं घडलं पाहिजे अशी इच्छा होती. पण ते आपल्या विचारांशी ठाम आहेत. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच जायचं आहे. त्यामुळे आजचा हा कदाचित शेवटचा दिवस असेल जेव्हा मी हे आवाहन करू शकेन”, असं केसरकर म्हणाले.


उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना फोन केला होता ! फडणवीस यांनी उचलला नाही! ; बातमी काय आहे?

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेवर मोठे संकट आले आहे. महाविकास आघाडी सरकारवर अस्थिरतेचे संकट आले आहे. ज्या दिवशी एकनाथ शिंदे सुरतला मुक्कामी होते, त्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे समोर आले आहे. पण, फडणवीस यांनी फोन उचलला नाही.

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांसह 21 जून रोजी सुरतला दाखल झाले होते. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली होती. शिवसेनेनं शिंदेंना परत बोलावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. एवढच नाहीतर मिलिंद नार्वेकर यांनाही सुरतमध्ये पाठवले होते. पण, एकनाथ शिंदेंनी काही ऐकलं नाही. शिंदेंनी फक्त महाविकास आघाडीतून बाहेर पडा, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवरून याच्या पाठीमागे भाजप असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे २१ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती समोर आली. पण फडणवीस यांनी फोन उचलला नाही. उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा फोन केला पण तरीही फडणवीस यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मुख्यमत्र्यांनी त्यांना मेसेज केला पण त्यात मजकूर काय हे मात्र कळू शकले नाही

विशेष म्हणजे, असाच प्रकार २०१९ झाला होता. भाजपकडे १०६ आमदारांचे संख्याबळ होते. पण उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन कऱण्यास नकार दिला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधण्यासाठी बरेचदा फोन केले होते. पण त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी फोन उचलले नव्हते. आता तीच वेळ उद्धव ठाकरेंवर आली आहे. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांशी फोनवर संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार होते, पण शरद पवार यांनी त्यांना थांबवलं ; इंडिया टुडेने दिले वृत्त ...

वेध माझा ऑनलाइन - इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार होते. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे सोमवारी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ इच्छित होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यापासून थांबवलं.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांनी याआधी उद्धव ठाकरेंना एकदा नाही तर दोनदा राजीनामा देण्यापासून रोखलं आहे. एकनाथ शिंदे आणि २१ आमदार सूरतमध्ये गेले होते त्याच दिवशी उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत होते. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उद्धव ठाकरे राजीनामा देत याची घोषणा करणार होते. पण शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना रोखलं अशी सूत्रांची माहिती आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राजीनामा देण्याचा विचार करत होते. उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांची बैठकही बोलावली होती. पण पुन्हा एकदा शरद पवारांनी मध्यस्थी केली.

उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राजीनाम्याची घोषणा करण्याआधी शरद पवारांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. यामुळेच उद्धव ठाकरेंचं फेसबुक लाईव्ह अर्धा तास उशिरा सुरु झालं असं कळत आहे. यानंतर उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हमध्ये मी मुख्यमंत्री नको असल्यास समोर येऊ सांगावं, पद सोडेन असं आव्हान दिलं होतं. तसंच त्याच रात्री उद्धव ठाकरेंनी कुटुंबासोबत मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान ‘वर्षा’ बंगला सोडला आणि मातोश्रीवर राहण्यास गेले. आपण मुख्यमंत्रीपदाचा मोह सोडला आहे, पण जिद्द नाही असा इशाराही त्यांनी शिंदे गटाला दिला आहे.

मुख्यमंत्री म्हणून फडणवीसच विठ्ठलाची पूजा करणार” ! ; हालचाली प्रचंड वाढल्या ...!! काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेतील बंडाळीनंतर आत्तापर्यंत वेट अँड वॉचच्या भूमिकेत असणाऱ्या भाजपाच्या गोटात हालचालींना वेग आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वोच्च न्यायालयाने काल १२ जुलैपर्यंत बंडखोर आमदारांना अभय दिल्यानंतर आज तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताकारणाच्या घडामोडी दिल्लीत घडणार का? असा तर्क आता लावला जात आहे. तर दुसरीकडे भाजपा खासदारांकडून येत्या आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये विठ्ठलाची शासकीय पूजा देवेंद्र फडणवीसच करणार, असा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. त्यामुळे पडद्यामागे नेमक्या काय राजकीय घडामोडी घडत आहेत? याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

देवेंद्र फडणवीस आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले असून तिथे भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करणार असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे दुपारी गुवाहाटीमध्ये बंडखोर आमदारांच्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या निर्देशांनुसार १२ जुलैपर्यंत बंडखोर आमदारांना अपात्रतेपासून अभय देण्यात आलं आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

“मुख्यमंत्री म्हणून फडणवीसच विठ्ठलाची पूजा करणार”
दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मोठा दावा केला आहे. “येत्या दोन-तीन दिवसांत भाजपाचे सरकार येईल. तसेच आषाढी एकादशीची महापूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल” असा गौप्यस्फोट भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे. तर सेनेचे १० ते १२ खासदारही तेव्हा सोबत येतील असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या दाव्यानंतर पुन्हा एकदा तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.


Monday, June 27, 2022

एकनाथ शिंदे माझे मित्र आहेत ; संजय राऊत यांची भाषा नरमली...

वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे हे अजूनही शिवसेनेच्या कार्यकारणीमध्ये आहे. उद्धव ठाकरे यांनीच त्यांना पक्षाचे गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. ते आमचे मित्र आहे, सहकारी आहे. अयोध्येला ते माझ्यासोबत होते. त्यांच्याविषयी माझ्या मनात अजिबात व्यक्तिगत राग नाही' असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मवाळ भूमिका घेतली आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांवर कारवाई करण्यास 11 जुलैपर्यंत वेळ दिला आहे. पण आता कालपर्यंत एकनाथ शिंदे गटावर टीका करणारे संजय राऊत आता मवाळ झाले आहे.
'गुवाहाटीमध्ये आमदार बसले आहे. त्या आमदारांना आता 11 जुलैपर्यंत मुक्काम वाढवावा लागेल. त्यांना झाडी, डोंगराचा आनंद घ्यावा लागेल. कोर्टाचा महत्त्वाचा आदेश आहे.  उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आहेत, आम्ही अजूनही त्यांना बंडखोर म्हणायला मानत नाही. त्यातील अनेक जण संपर्कात आहे. त्यांचे कुटुंबीय आमच्याशी संपर्क करत आहे. त्या लोकांना ज्या परिस्थितीत ठेवलं आहे, ती परत येतील असा आम्हाला विश्वास आहे' असं राऊत म्हणाले.

दीपक केसरकर म्हणतात......तर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना भेटायला जातील...काय आहे बातमी...?

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेतील फुटीर गटातील १६ आमदारांना महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिलेल्या अपात्रता नोटिशीला उत्तर देण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाने १२ जुलैपर्यंत वाढवून दिली आहे. या नोटीसविरोधात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी येत्या ११ जुलैला होणार असल्याने महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचे ढग इतक्यात विरणार नसल्याचे हे सोमवारी स्पष्ट झाले. भाजप आणि शिवसेना हे अनेक वर्षांचे मित्र आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेनं चर्चा करावी. या चर्चेतून काही सकारात्मक निघालं आणि उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना बोलावलं तर तेही उद्धव ठाकरे यांना भेटायला जातील असही दीपक केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून काय उत्तर येणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. जर ५१ आमदार गुवाहाटीला निघून आले असतील त्याचा अर्थ हे सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे सन्मानपूर्वक राजीनामा दिला पाहिजे, अशी थेट मागणी त्यांनी केली. तसेच उद्धव ठाकरे यांनी त्यांचा जुना मित्रपक्ष असलेल्या भाजपसोबत चर्चा केली पाहिजे. ते कुठे दुखावले गेले असतील तर त्याची कारणे जाणून घेतली पाहिजेत आणि भाजपनेही त्याचा विचार केला पाहिजे, असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे. 

दरम्यान, झिरवाळ यांच्यावर ३४ आमदारांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाबद्दल अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत अपात्रता नोटीसची अंमलबजावणी करू नये, असे निर्बंध उपाध्यक्षांवर घालावेत, असा युक्तिवाद बंडखोर आमदारांच्या वतीने करण्यात आला. यासंदर्भात विधानसभा सचिवालयाने येत्या ५ दिवसांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश कोर्टाने दिले. उपाध्यक्षांचे वकील राजीव धवन यांनी ११ जुलैपर्यंत सदस्यांच्या अपात्रतेबद्दल कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

आज एकनाथ शिंदे मु्ंबईत येणार? ; राज्यपालांना सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र देणार!

वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे गटाच्या बंडानंतर महाराष्ट्रात निर्माण झालेला सत्तासंघर्ष आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 12 जुलैपर्यंत बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार नसल्याचं स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे गटाकडून महाविकास आघाडीला धक्का देण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे हे स्वत: मु्ंबईत येण्याची शक्यता असून राज्यपालांना सरकारला पाठिंबा काढला असल्याचे पत्र दिले जाणार आहे. त्यामुळे 12 जुलैपर्यंतच्या होऊ शकणाऱ्या संभाव्य घडामोडी लक्षात घेता महाविकास आघाडीसमोर सरकार वाचवण्याचं आव्हान असणार आहे. 

शिंदे गटाकडून अविश्वास प्रस्ताव मांडला गेल्यास महाविकास आघाडीसाठीची ती अग्निपरीक्षा असणार आहे. या संभाव्य राजकीय संकटाला तोंड देण्यासाठी महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकांचं सत्र सुरु झाले आहे. सोमवारी काँग्रेस नेत्यांनी मातोश्री गाठत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्याशिवाय, महााविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार कोणती पावले उचलणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 


नामधारी राज्यमंत्री म्हणून काम करत होतो,” ना शंभुराजेंच व्हीडिओ ट्विट व्हायरल...

वेध माझा ऑनलाइन  - शिवसेनेविरोधात बंड पुकारणारे नेते एकनाथ शिंदे सध्या ट्विटरच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या भावना मांडत आहे शिवसेनेमधील नेते, आमदारांवर कशाप्रकारे महाविकास आघाडीत अन्याय झाला हे सांगण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करत आहेत. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यामधील पाटणचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.नामधारी राज्यमंत्री म्हणून करत होतो,” असं शंभुराजेंनी यामध्ये म्हटलं आहे.

“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पाच विभागांचा राज्यमंत्री म्हणून महाविकास आघाडी सरकारमध्ये मी काम करत आहे. पाच खाती राज्यमंत्री म्हणून आमच्याकडे आहेत. खाती आमच्याकडे दिली पण राज्यमंत्र्याला किती अधिकार होते हेदेखील निमित्ताने माहिती होणं गरजेचं आहे. सामान्य शिवसैनिकांना, आमदारांना राज्यमंत्र्यांकडे गेलं की लगेच काम झालं असं वाटतं. पण राज्यमंत्र्यांकडे केवळ आमदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिकांची आलेली कामं यावर शिफारस करुन कॅबिनेट मंत्र्यांकडे देणं इतकंच काम होतं. विधानसभेच्या अधिवेशन काळात सभागृहात सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं आणि कामकाज हाताळणं इतक्यापुरतंच नामधारी राज्यमंत्री म्हणून आम्ही करत होतो,” असं शंभुराजेंनी म्हटलं आहे.
“माझ्यासोबत अनेक राज्यमंत्री सहकाऱ्यांनी अनेकदा मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. राज्यमंत्र्यांचे अधिकार वाढवून दिले पाहिजेत अशी मागणी केली. पण अडीच वर्षात अधिकार मिळाले नाहीत,” असं त्यांनी सांगितलं.
“राज्यमंत्री असूनदेखील आम्हाला आमच्या मतदारसंघात निधी मिळत नाही. याउलट आम्ही पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना उपमुख्यमंत्री अजित पवार ताकद देतात. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे यासंदर्भात वारंवार तक्रार करूनसुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही,” असा दावा शंभुराजे देसाईंनी केला आहे.



भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू ; वाखान परिसरातील घटना ...

वेध माझा ऑनलाइन - येथील वाखाण परिसरात आज मोकाट कुत्र्यांने एका चिमुकल्यावर अचानक हल्ला केल्याने त्या चिमुकल्याचा  मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजवीर ओव्हाळ (वय वर्षे 3) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे 

मिळालेल्या माहितीनुसार मृत मुलाचे आई वडील मोलमजुरी करतात व ते वाखाण परिसरात राहतात दरम्यान राजवीर हा दुपारच्या सुमारास त्याठिकाणी खेळत असता तेथील मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला करून त्याला जखमि केले या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला 
दरम्यान शहरातील या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा म्हणुन उद्या 11:00 वाजता नगरपालिकेत मुख्याधिकारी डाके याना जाब विचारायला शहरांतील अनेक सामाजिक कार्यकर्ते जाणार आहेत व या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढा अन्यथा
रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग  स्वीकारावा लागेल याची कल्पनाही देणार आहेत असे समजते 

आता राज्याच्या घडामोडीत भाजपची एन्ट्री ; ठाकरे सरकारवर भाजपकडून येणार लवकरच अविश्वास ठराव ; फडणवीस यांच्या बंगल्यावरील बैठक संपली...आता घडामोडी फास्ट ...

वेध माझा ऑनलाइन - विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. शिंदे यांच्यासह मविआच्या ५० आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढत असल्याचं याचिकेत म्हणत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी शिवसेनेने नोटीस पाठवली. याविरोधात शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले दरम्यान आघाडीविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची भाजपाची तयारी असल्याची माहिती समोर येत आहे.

आज सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाकडून शिवसेना पक्षप्रमुख, राज्य सरकार, विधिमंडळ सचिवालय, केंद्र सरकार यांना ५ दिवसात उत्तर देण्यासाठी नोटीस जारी करण्यात आलेली आहे. जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत १६ आमदारांना आपले उत्तर दाखल करण्याची मुभा सुप्रीम कोर्टाने दिली. ११ जुलैला पुढील सुनावणी होतपर्यंत शिंदे गटातील आमदारांवर कोणतीही कारवाई करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. ११ जुलै ५.३० पर्यंत १६ आमदारांना आपले म्हणणे मांडण्याची मुभा देण्यात आली आहे. 

कोर्टाच्या या निर्णयानंतर भाजपाने आता मैदानात उतरण्यास सुरुवात केली आहे. कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर भाजपाकडून कायदेशीर चाचपणी सुरु करण्यात आली आहे. आज सायंकाळी ५ वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या निवासस्थानी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली. महाविकास आघाडीविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची भाजपाची तयारी असल्याची माहिती समोर येत आहे.


सुप्रीम कोर्टाची बंडखोर आमदारांना नोटीस ;

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा आता नवीन अंक सुरू झाला आहे. शिवसनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाला फटकाले आहे.  न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाला मुंबई उच्च न्यायालयात  का गेला नाही, अशी विचारणा केली आहे. तसंच, उपाध्यक्षांवर प्रश्न कसे उपस्थितीत करू शकता, असा सवालही केला आहे. सुप्रीम कोर्टाने उपाध्यक्ष यांना नोटीस बजावली असून यामध्ये सहाही पक्षांना नोटीस दिली आहे. केंद्र सरकारला सुद्धा नोटीस दिली आहे. बंडखोर 16 आमदारांना सुद्धा नोटीस दिली आहे. या प्रकरणाची  सुनावणी पूर्ण होत नाही. तोपर्यंत त्यांनी आपल्या उत्तरांची तयारी करावी, अशी सूचना कोर्टाने दिली. पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. तसंच पुढील पाच दिवसांमध्ये बंडखोर आमदारांना आपले प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहे.

एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला आव्हान देत थेट सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे.  शिंदे गटाच्यावतीने 15 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेत दोन गोष्टींचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. एक तर आमदारांनी उपाध्यक्षांना बेकायदेशीर ठरवून आमदारांना अपात्र ठरविण्याच्या नोटिशीला आव्हान दिले आहे आणि दुसरे म्हणजे त्यांनी स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला न्यायालयाकडून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून कौल यांनी युक्तिवाद केला आहे.
वेध माझा ऑनलाइन -  धावरवाडी येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याला ‘साऊथ आफ्रिकन फार्मर्स डेव्हलपमेंट असोसिएशन’चे कार्यकारी अध्यक्ष डॉ. सियाबोंगा मदलाला यांच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेतील ८ जणांच्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट दिली. या भेटीत त्यांनी जयवंत शुगर्समधील विविध उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांना भेट देऊन, शेतकऱ्यांशी चर्चा केली.

महाराष्ट्राप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेतही वर्षातून केवळ ५ ते ६ महिनेच ऊस गाळप हंगाम सुरू असतो. पण तिथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच भिन्न स्वरूपाची आहे. तेथील  शेतकऱ्यांकडे प्रत्येकी १ ते २ हेक्टर इतके शेतीक्षेत्र असून, साखर कारखानेही १०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढून, पुरेसे उत्पन्न मिळत नाही. दक्षिण आफ्रिकेतील जवळपास २०,००० शेतकऱ्यांनी एकत्र येत, ‘साऊथ आफ्रिकन फार्मर्स डेव्हलपमेंट असोसिएशन’ची स्थापना केली आहे. ऊसाचे उत्पादन वाढविण्याबरोबरच साखरेसह अन्य कोणकोणत्या उपपदार्थांचे उत्पादन घेता येईल आणि हे उपपदार्थ निर्मिती प्रकल्प कसे साकारता येतील, याचा अभ्यास करण्यासाठी या संघटनेचे सदस्य असलेल्या ८ जणांच्या शिष्टमंडळाने जयवंत शुगर्सला भेट दिली. 

जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे यांनी या शेतकऱ्यांचे स्वागत करून, संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंत शुगर्समध्ये सुरू असलेल्या उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती दिली. साखरेच्या हंगामाशिवाय इतरवेळी वर्षभर इथेनॉल उत्पादनासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या ‘बायोसिरप’ या नव्या शाश्वत तंत्रज्ञानाची निर्मिती जयवंत शुगर्सने नुकतीच केली आहे. या प्रकल्पालाही शिष्टमंडळाने भेट दिली. तसेच ऊसभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी सौरभ कोकीळ (धामणेर), चंद्रकांत यादव (सासपडे), अनिल गायकवाड (इंदोली), राजेंद्र मोहिते (रेठरे बुद्रुक), संभाजी भोसले (खोडशी) यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी पुणे येथील प्राज इंडस्ट्रीजचे मकरंद जोशी, जयवंत शुगर्सचे सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


मंत्र्याकडील खातेवाटपात बदल : मुख्यमंत्री ठाकरे यांचा निर्णय;

वेध माझा ऑनलाइन - जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी  होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा  निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम 6-अ मध्ये 6-अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांस आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येईल. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणेशक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निदेश देता येईल अशी तरतूद आहे त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्र्याकडील खातेवाटपात  बदल :
एकनाथ शिंदे  यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे

 राज्य मंत्र्याकडील खातेवाटपात  बदल:
शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील खाती (कंसात) संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज उर्फ बंटी डी. पाटील, (रा.उ.शु.),

राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग),सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन),आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य)

अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य)

ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती(कंसात)  आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण)

संजय राऊत यांना ईडी चे समन्स ; चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश

वेध माझा ऑनलाइन - संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. 28 जूनला चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. यापूर्वी ईडीने त्यांच्या काही मालमत्ता जप्त केल्या होत्या.

 

Sunday, June 26, 2022

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आले अल्पमतात ; सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचं एकनाथ शिंदे गटानं केलं जाहीर...

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतामध्ये आलंय. या सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचं एकनाथ शिंदे गटानं जाहीर केलंय. शिंदे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यावेळी  38 आमदारांच्या गटानं सरकारचा पाठिंबा काढला असल्याचं शिंदे गटानं स्पष्ट केलं आहे. शिवसेनेचे विधानसभेत 55 आमदार आहे. शिंदे गटाच्या या दाव्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडं 115 आमदाराच उरले आहेत.त्यामुळे विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 144 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे

शिवसेनेनं शिंदे गटाच्या 16 आमदारांना नोटीस दिली आहे.या आमदारांनी 48 तासात नोटीशीला उत्तर दिलं नाही, तर त्यांना अपात्र ठरवलं जाईल असं शिवसेनेकडून स्पष्ट केलंय. या नोटीशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं असून त्याची सुनावणी सुरू आहे.

उद्धव ठाकरेंनी आता पक्षाचं नाव "शिल्लक सेना" करून घ्यावं' ; मनसे ने डिवचले...अमेय खोपकरांचे ट्विट... ;

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे अनेक आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. यानंतर आता शिवसेनेच मोजकेच मंत्री आणि आमदार उरले आहेत. यादरम्यान राज्यातील या राजकीय परिस्थितीवरुन अनेकांनी निरनिराळे ट्विट करत राजकारण्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमेय खोपकर यांनीही शिवसेनेवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, 'शेवटच्या आमदाराला सुद्धा ऑफर दिली होती. पण, "बाबा ओरडतील" म्हणून नाही आला.' अमेय खोपकर यांच्या या ट्विटचा रोख हा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या दिशेनं आहे. याशिवाय आणखी एक ट्विट करत खोपकर यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. 'एकनाथ शिंदेंसोबत इतके आमदार निघून गेले आहेत की, उद्धव ठाकरेंनी आता पक्षाचं नाव शिवसेनाऐवजी "शिल्लक सेना" करून घ्यावं' असा खोचक सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.

बंडखोरांचा आज फैसला ; ...अन्यथा... एकनाथ शिंदेंचा गट मनसेमध्ये विलीन होणार?

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीतील घडामोडींवा वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकार आपल्या पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल की ते बरखास्त होईल, याबाबतचा उलगडा पुढच्या 12 तासांमध्ये होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने दिल्लीत सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर सकाळी साडेदहा वाजता सुनावणी सुरु होणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दिल्लीत घडामोडींना वेग
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीतील घडामोडींवा वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकार आपल्या पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल की ते बरखास्त होईल, याबाबतचा उलगडा पुढच्या 12 तासांमध्ये होण्याची शक्यता आहे. 

...तर एकनाथ शिंदेंचा गट मनसेमध्ये विलीन होणार?
एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना फोन केल्याचीही माहिती आता समोर येत आहे. राज ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचं वृत्त आहे.

एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला ; दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ फोनवर चर्चा झाल्याचे वृत्त ; शिंदे गट मनसेत विलीन होणार?

वेध माझा ऑनलाइन - महाविकास आघाडी सरकारवर संकट कोसळलेलं असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेते बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांना फोन केला आहे. याबाबतचं वृत्त 'आजतक'ने दिलं आहे. राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्या हिप बोनची शस्त्रक्रिया नुकतीच करण्यात आली. ते दोन दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमधून घरी परतले आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ फोनवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेला मोठा झटका दिला आहे. शिंदे यांच्या पाठिमागे शिवसेनेच्या भल्यामोठ्या आमदारांची संख्या आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा खिंडार पाडण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या सगळ्या घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांची तब्येत बरी नसल्याने त्यांनी कुठेही वाच्यता केलेली नव्हती. ते आता घरी आल्याने काही बोलणार का? शिवसेना आज धोक्यात असल्याने त्यांच्या मदतीला राज ठाकरे जाणार का यावर जोरदार चर्चा सुरु होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन केल्याची बातमी समोर आली आहे.

शिंदे गट मनसेत विलीन होणार?
एकनाथ शिंदे यांना जवळपास 38 आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या गटाने भाजपला पाठिंबा दिला तर महाविकास आघाडीचं सरकार कोसळू शकतं. शिंदे गटाकडून आपण शिवसेनेतच असल्याचा दावा केला जातोय. शिंदे गटाकडून आपल्याकडे एक तृतीयांश आमदारांची संख्या असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आपला पक्ष हा शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचाच पक्ष आहे, असं सांगितलं जात आहे. पण शिवसेनेकडून शिंदे गटाविरोधात कायदेशीर लढाई लढली गेली आणि त्यांचा पराभव झाला तर शिंदे गटाला दुसऱ्या पक्षात विलीन झाल्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी चर्चा सध्या सुरु आहे. याशिवाय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील शिंदे गटाच्या आमदारांना भाजप किंवा प्रहार पक्षात विलिन होण्याशिवाय पर्याय नाही, असं म्हटलं आहे. शिंदे या दोन्ही पक्षात विलीन झाले नाहीत आणि त्यांना विलीन होण्याची वेळ आली तर त्यांच्यासमोर मनसेचा देखील एक पर्याय खुला आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेची जवळीक वाढल्याचं देखील चित्र आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये तशा घडामोडी घडल्या तर आगामी काळातील महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये अभूतपूर्व असा बदला झालेला दिसण्याची शक्यता आहे.

पक्षात बंडखोरी केल्यानंतर दोन तृतीयांश आमदार पाठीशी असल्याने कोणत्याही प्रकारचा स्वतंत्र गट स्थापन करता येत नाही. या गटाला एखाद्या राजकीय पक्षात विलीन व्हावे लागणार असल्याचेही अॅड. कामत यांनी सांगितले. त्या दरम्यानच्या काळात या बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणे शक्य आहे. वर्ष 2003 पासूनची ही तरतूद करण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याआधी देशभरात झालेल्या काही प्रकरणांनुसार महाराष्ट्रातही बंडखोर आमदारांवर कारवाई करता येणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभेच्या उपाध्यक्षांविरोधात आलेला प्रस्ताव हा एका अज्ञात व्यक्तींकडून कुरिअरच्या माध्यमातून आला होता. त्यामुळे उपाध्यक्षांनी हा प्रस्ताव रद्द केला असल्याचे अॅड. कामत यांनी म्हटले.

शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले की, मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे काही आमदार गुवाहाटी थांबले आहेत. दररोज वेगवेगळ्या क्लिप, बातम्या समोर येत आहेत. त्याशिवाय, शिंदे गटाकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. आमच्याकडून आमदारांवरील कारवाईबाबत कायदेशीर बाबींचा अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. बंडखोरांविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचेही सूतोवाच त्यांनी केले. शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्यासाठी कोर्टात धाव घेण्याची तयारी शिंदे गटाने केली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या आमदारांना 27 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आमदार अपात्र ठरल्यास शिंदे गटाला मोठा धक्का बसणार आहे.

शिंदे गटात सहभागी होण्यासाठी 50 कोटींची ऑफर ; शिवसेना आमदारांचा गौप्यस्फोट...

वेध माझा ऑनलाइन - शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यायामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. आता शिंदे गटात सहभागी होण्यासाठी 50  कोटींहून अधिकची ऑफर मिळाल्याचा गौप्यस्फोट शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांनी केला आहे. राजपूत यांच्या या माहितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सर्व पक्ष अधिक सावध झाले आहेत.

एवढंच नाही तर दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचं फुटेजही असल्याचा दावा उदयसिंग राजपूत यांनी केला आहे.100  कोटी दिले तरीही गद्दारी करणार नाही,  असंही उदयसिंग राजपूत म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झाले आहे.
उदयसिंग राजपूत हे औरंगाबादच्या कन्नडचे आमदार आहेत. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता शिवसेनेतल्या बंडाला एक नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. आमदार फोडण्यासाठी 50  कोटींची ऑफर देण्यात आली आहे. एका शिवसेना कार्यकर्त्यासह बोलतानाची त्यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे.. त्यात ते ऑफर स्वीकारली नाही. कारण  मी तत्त्व आणि निष्ठेला महत्त्व देणारा आहे. शिंदे मला मंत्रीही करू शकतील, पण मला पदाचा हव्यास नाही. मी शिवसेनेतच राहणार आहे.

बंडखोर शिवसेना आमदारांना थेट मोदी सरकारने दिली सुरक्षा ...कटकारस्थानात भाजप असल्याचं स्पष्ट झालं- शिवसेनेची टीका


वेध माझा ऑनलाइन - 
 बंडखोर आमदारांच्या विरोधात मुंबई, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह पोस्टर्सला काळं फासण्याच्या घटना समोर आल्या आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर शिवसेना आमदारांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बरीच खलबतं झाल्यानंतर आता या आमदारांना थेट केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेट्स लावण्यात आलं आहे. 

काल शिंदे गटातील 15 आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव  आणि राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. काल झालेल्या तोडफोडीच्या आणि हिंसक घटनेनंतर केंद्र सरकारची शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. 

आज संध्याकाळपर्यंत 15 आमदार यांच्या घरी सीआरपीएफचे जवान तैनात होणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. सध्या आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. आता बाकीचे आमदार कोण आहेत याची माहिती देखील लवकरच मिळणार आहे. दादर भागात राहणाऱ्या आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेट्स लावण्यात आलं आहे. 

कटकारस्थानात भाजप असल्याचं स्पष्ट झालं- शिवसेनेची टीका
आमदारांना केंद्राची सुरक्षा मिळाल्यानंतर शिवसेनेकडून भाजपवर टीका करण्यात आली आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे की, आता या कारस्थानामागे भाजप असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर मुद्दाम अविश्वास दाखवला जात आहे. आता केंद्राची ढवळाढवळ महाराष्ट्राला कळली आहे, असंही अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. 
राजकीय आकसाने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आमदारांचे संरक्षण काढून घेतले असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता.मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून अशाच प्रकारे खच्चीकरण करण्यात आल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. कोणत्याही बंडखोर आमदार आणि मंत्र्यांची सुरक्षा काढण्यात आलेली नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडून जाणीवपूर्वक चुकीचे माहिती पसरवली जात आहे, असा दावा गृहखात्याने केला होता.


Saturday, June 25, 2022

एकनाथ शिंदे हे नेमके कोण आहेत ? याची उत्सुकता पाकिस्तान, सौदी, थायलंडमध्येही... एकनाथ शिंदे याना सध्या मोदी, बायडेन पुतीन पेक्षाही जास्त प्रसिद्धी...

वेध माझा ऑनलाइन - सध्या अवघ्या जगाचे लक्ष हे महाराष्ट्राकडे आहे. आणि याचे कारण आहे एकनाथ शिंदे...  शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेले नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाला सध्या जगभरातून सर्च केले जात आहे. एकनाथ शिंदे हे नेमके कोण आहे? याची उत्सुकता जगभरातील नागरिकांमध्ये आहे. विशेष म्हणजे विकिपीडियावर एकनाथ शिंदे हे सध्या मोदी, बायडेन तसेच पुतीन पेक्षा जास्त प्रसिद्ध आहे.  

जगातील कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया हा आता परवलीचा शब्द निर्माण झाला आहे. विकिपीडिया हा जगात सर्वात जास्त वापरला जाणारा विश्वकोश आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचे पडसाद हे गूगल नंतर विकिपीडियावर देखील  दिसत आहेत. जो बायडन यांच्या बद्दलचा विकिपीडियाचा लेख हा  1,27,104  लोकांकडून वाचला गेला तर एकनाथ शिंदे यांचा लेख  3,35, 060 लोकांनी वाचला. विकिपीडियाच्या अभिषेक सूर्यवंशी यांनी या माहितीस दुजोरा दिला व एकनाथ शिंदे यांचे विकिपीडिया आर्टिकल सध्या राजकीय क्षेत्रात सर्वात जास्त वाचले जात आहे असे सांगितले.

विकिपीडिया ही साईट म्हणजे फ्री सोर्सच आहे. महाराष्ट्राच्या राजकाराणाला हदरवून सोडणारे एकनाथ शिंदे नेमके कोण आहेत? याची उत्सुकता जगभरातील नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून जगभरातील नागरिक एकनाथ शिंदेंबाबत विकिपीडियावरून  माहिती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.   विकिपीडियावर सध्या एकनाथ शिंदे हे अव्वल स्थानी आहे. एकनाथ शिंदेनंतर अनुक्रमे जो बायडन, पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा क्रमाक लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लेख 67,848 लोकांनी वाचला आहे. 

 पाकिस्तान, सौदी, थायलंडमध्येही एकनाथ शिंदेंच्या चर्चा
महाराष्ट्रातील राजकीय गरमागरमीची चर्चा ही केवळ राज्यात देशातच नाही तर जगभरात देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.  33 देशांमध्ये तीन दिवसांत पाच नेत्यांविषयी माहिती सर्वाधिक सर्च करण्यात आली. त्यात एकनाथ शिंदे सर्वात पुढे हाते. शिंदेंविषयी माहिती सर्च करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानात 54 टक्के, सौदी अरेबियात 57 टक्के, मलेशिया 61 टक्के, नेपाळ 51 टक्के, बांगलादेश 42 टक्के, थायलंड 54 टक्के, जपान 59 टक्के, कॅनडात 55 टक्के लोकांनी सर्च केले. दरम्यान भारतात एकनाथ शिंदे यांची जात कोणती आहे? याबाबत देखील खूप जास्त प्रमाणात सर्च केलं जात आहे.  

 


काल रात्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची बडोद्यात भेट ! ; वाचा...सर्वात मोठी बातमी

वेध माझा ऑनलाइन - सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोठींमधील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. काल रात्री देवेंद्र फडणवीस हे इंदूरमार्गे बडोद्याला रवाना झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हेदेखील काल गुवाहाटीवरुन बडोद्याल्या गेल्याचं समोर आलं आहे.येथे त्यांची भेट झाल्याची चर्चा रंगली आहे. यावेळी त्यांनी पुढील प्लान रचल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या भेटीबाबत कोणतीही पुष्टी मिळाली नसली तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच कारणासाठी दोघे बडोद्याला जाण्याची शक्यता दाट आहे.

देवेंद्र फडणवीस इंदूरहून बडोद्याला रवाना...
पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांबद्दलची गुप्त माहिती समोर आली आहे. परतीच्यावेळेसही ते आधी इंदूरला आले आणि येथून मुंबईल परतले. महाराष्ट्रातील एअरपोर्ट शिवसेनेच्या ताब्यात असल्या कारणाने फडणवीसांना आपली यात्रा गोपनीय ठेवली आणि इंदूरला येऊन गुजरातला गेले. त्यांच्या या प्रवासादरम्यान दोन्हीही वेळेस कोणी विमानातून उतरलं नाही आणि चढलंदेखील नाही. विमानात केवळ इंधन भरण्यात आलं.

मुंबईपासून वडोदरा अवघ्या 400 किलोमीटरवर आहे. आणि मुंबईहून इंदूर 600 किलोमीरट. अशात मुंबईहून थेट वडोदरा जाण्याऐवजी फडणवीस इंदूरच्या मार्गाने येथे का गेले? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून आपली गुजरात दौरा लपवण्यासाठी ते व्हाया इंदूरहून गेले.

काल 24 जून रोजी सायंकाळी त्यांच्या दौऱ्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांना वाटलं की, फडणवीसांसोबत इंदूरहून कोणी जाईल किंवा परत येईल. मात्र दोन्ही वेळेस विमानात दुसरं कोणीच चढलं वा उतरलं नाही. अधिकाऱ्यांनाही कळालं नाही की, जर त्यांना वडोदऱ्याला जायचं होतं, तर इंदूरला का आले. कारण मुंबई ते वडोदरा हवाई मार्गाने सरळ आहे. तर इंदूर दुसऱ्या दिशेला आहे.

मुंबईत रजेवर गेलेल्या पोलिसांना तातडीने हजर राहण्याचे आदेश ; मुंबईत पोलीसांची ड्यूटी 8 तासांवरून 12 तासांवर ; मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी झाला निर्णय...

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसैनिकांनी गुवाहाटीत गेलेल्या आमदारांच्या कार्यलयाची तोडफोड केली आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. राजकीय खळबळ आणि आंदोलन पाहता मुंबई पोलिसांनी रजेवर गेलेल्या पोलिस उपायुक्त आणि सहायक पोलिस आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कर्तव्यावर रुजू होण्यास सांगितले आहे. शहराच्या  सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.  

शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आणि संबंध महाराष्ट्र हादरला. यानंतर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. सध्या शहरात  कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी पोलीस अंमलदार व हवालदारांची ड्यूटी आठ  तासांवरून 12 तासांवर करण्यात आली आहे.  सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हजर राहणार असून रविवारी साप्ताहिक सुटी घेणार नाही. त्यांना  आवश्यकतेनुसार साप्ताहिक सुट्टी दिली जाईल, असे देखील सांगण्यात आले आहे. 
एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर दगडफेक केली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांची कार्यालयासमोर घोषणाबाजी आणि दगडफेक केली आहे. संजय राऊतांनी मोठ्या विरोध प्रदर्शनाचा इशारा दिला आहे.

मुंबईमध्ये जमावबंदी लागू ; सोशल मीडियावर पोलिस विशेष लक्ष ठेवणार ; हिंसक बॅंनर पोस्टर तात्काळ काढण्याचे दिले आदेश...

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना फोडून शिवसेनेला धक्का दिला आहे. त्यामुळे आता शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात सुरुवात झाली आहे. याचीच खबरदारी घेत मुंबईमध्ये आता जमावबंदी लागू कऱण्यात आली आहे.

राज्यात अभुतपूर्व असा राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. शिवसेनेतील आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाल्यामुळे शिवसैनिक कमालीचे संतापले आहे. ठिकठिकाणी आमदारांचे कार्यालय टार्गेट केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट झाली आहे. मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयांना सुरक्षा दिली जाणार आहे. एवढंच नाहीतर सोशल मीडियावर सुद्धा पोलिसांचे विशेष टीम लक्ष ठेवणार आहे. हिंसक बॅंनर पोस्टर तात्काळ काढण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे. राज्यात सध्या राजकीय परिस्थिती आहे त्यानुसार हे आदेश जारी केले आहे. त्याचबरोबर सर्व पक्षांना आणि कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी शांततेचे आवाहन केलं आहे.

एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय शिवसैनिकांनी फोडले...

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना फोडून शिवसेनेला धक्का दिला आहे. त्यामुळे आता शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात सुरुवात झाली आहे. आता एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालय शिवसैनिकांनी फोडले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसैनिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून बंडखोर आमदारांना गद्दार म्हणून निदर्शनं करत आहे तर कुठे पुतळे जाळत आहे. आता या शिवसैनिकांच्या उद्रेकाचा फटका एकनाथ शिंदे यांच्या मुलाला बसला आहे.

शिंदे गटाच्या आता शिवसेनेचं पक्ष चिन्ह 'धनुष्यबाण' ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू!

वेध माझा ऑनलाइन - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या कथित बंडखोरीमुळे राज्यातील सरकार धोक्यात आलं आहे. दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांची ताकद वाढताना दिसत आहे. आता तर शिवसेना पक्षच ताब्यात घेतला जाण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यावर आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेण्यात आली आहे. यामध्ये सर्व अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले असून बैठकीत 3 मोठे ठराव मंजूर करण्यात आले आहे दरम्यान
शिंदे गटाने आता शिवसेनेचं पक्ष चिन्ह 'धनुष्यबाण' ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता ठाकरे देखील सावध झाले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी उपसभापती आणि राज्यपालांना पत्र पाठवले आहे. त्यात शिवसेनेच्या 37 आमदारांच्या पाठिंब्याने त्यांनी स्वतःची विधीमंडळ पक्षनेतेपदी वर्णी लावली आहे. शिंदे गटात सहभागी होण्यासाठी शिवसेनेचे आणखी तीन आमदार गुवाहाटीला पोहोचले आहेत. शिंदे गटाने आता शिवसेनेचं पक्ष चिन्ह 'धनुष्यबाण' ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता ठाकरे देखील सावध झाले आहेत.

शिवसेनेच्या बैठकीत 3 मोठे ठराव मंजूर
महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मुंबईत सुरू आहे. शिवसेनेच्या या बैठकीत आज तीन मोठे ठराव मंजूर करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, 
शिवसेनेतील सर्व प्रकारचे निर्णय घेणारे सर्व अधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील, असे पहिल्या ठरावात म्हटले आहे.

दुसरा प्रस्ताव - 
बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कोणालाही वापरता येणार नाही.

तिसरा प्रस्ताव- पक्षातील गद्दारांवर कारवाई करण्याचे अधिकार पक्षप्रमुखांनाही असतील. आतापर्यंत हे सर्व प्रस्ताव सर्वानुमते मान्य करण्यात आले आहेत.

Friday, June 24, 2022

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई ; खोतकर यांचा जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची 200 एकर जागा, कारखान्याची इमारत आणि कारखान्यात असलेली यंत्रसामग्री जप्त;

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी अर्जुन खोतकर यांच्या कारखान्यावर धाड टाकली होती. याशिवाय खोतकर यांच्याशी संबंधित काही मालमत्तांवर देखील धाड टाकण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता ईडीने खूप मोठी कारवाई केली आहे. ईडीने खोतकर यांचा जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची 200 एकर जागा, कारखान्याची इमारत आणि कारखान्यात असलेली यंत्रसामग्री जप्त केली आहे. शिवसेनेसाठी हा खूप मोठा फटका आहे. कारखान्याच्या जमीनीचा जो व्यवहार झाला आहे त्यामध्ये अनियमितता आढळल्याचा आरोप आहे. याच आरोपांप्रकरणी संबंधित कारवाई करण्यात आली आहे.

राज्यात एकीकडे राजकीय भूकंप सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेच्या आणखीन एका नेत्यावर ईडीने कारवाईचा बडगा उचलत खळबळ उडवून दिली. शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालना सहकारी साखर कारखान्यावर ED कडून  जप्तीची कारवाई करण्यात आलीय. सदर कारखाना खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आलीय. या कारवाई अंतर्गत कारखान्याची जमीन आणि तेथील यंत्रसामुग्री ED ने जप्त केलीय.

एकनाथ शिंदे अचानकपणे दिल्लीला रवाना ! ; हालचालीना वेग

वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे काही वेळापूर्वी पोलीस बंदोबस्तात दोन-तीन आमदारांसोबत हॉटेल रेडिसनमधून बाहेर पडले होते. मात्र, आता एक तास उलटूनही एकनाथ शिंदे हॉटेलमध्ये परतलेले नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित होत होता. शिंदे यांचे नवे लोकेशन उघड झाले आहे. शिंदे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे  सकाळपासून राजकीय नेत्यांच्या संपर्कात होते. सुरुवातीला असं सांगितलं गेली की गुवाहाटीमध्येच काहीतरी कामासाठी गेले आहेत, पण ते गुवाहाटीला नसून दिल्लीला रवाना झाल्याचं उघड झालं आहे.

आतापर्यंत हॉटेलमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक आमदाराच्या स्वागतासाठी एकनाथ शिंदे स्वतः हजर राहायचे. मात्र, नुकतंच दिलीप लांडे यांनी हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे इथे उपस्थित नव्हते. त्याचवेळी शिंदे गुवाहाटीमध्ये आहेत की अन्य ठिकाणी रवाना झालेत असा प्रश्न विचारला जात होता.



विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अचानक नॉट रीचेबल ; आमदारांवर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू

वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे यांच्या गटात हळूहळू आमदारांची सख्या 50 च्या आसपास पोहोचली आहे. शिवसेनेचे कट्टर मानले जाणारे दिलीप लांडेही गुवाहाटी येते शिंदे गटाला मिळाले आहेत. दरम्यान शिवसेनेकडून काही आमदारांवर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या सगळ्या प्रक्रियेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ  यांची भूमिका महत्वाची आहे. परंतु मागच्या काही काळापासून नरहरी झिरवळच नॉट रिचेबल लागत आहे. ते कुठे गेलेत? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवार यांची रणनीती ठरली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना कालच्या बैठकीत शरद पवार यांनी काही सूचना केल्या आहेत. सभागृहात शिवसेनेच्या आमदारांचं सभासदत्व रद्द झाल्यावर फ्लोअर टेस्टच्या संख्याबळाचं गणित बदलणार आहे. हे गणित सतत बदलत ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होणार आहे. एकनाथ शिंदे यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द झालं तर राजकीय चित्र पलटवलं जाऊ शकतं

राज्याच्या राजकारणाला नवे वळण ; विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळच नॉट रिचेबल...

 वेध माझा ऑनलाइन - आमदारांवर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या सगळ्या प्रक्रियेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भूमिका महत्वाची आहे
आमदारांवर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या सगळ्या प्रक्रियेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भूमिका महत्वाची आहे
आमदारांवर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या सगळ्या प्रक्रियेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भूमिका महत्वाची आहे





Thursday, June 23, 2022

हॅलो... मी एकनाथ शिंदे बोलतोय... अचानक डोंबवलीत खणाणला एकनाथ शिंदेंचा फोन...काय आहे कारण ?...वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडतांना दिसतायेत. सा सर्वाचं मुख्य कारण म्हणजे सेनेचे प्रमुख नेते तथा ठाणे जिल्ह्यात ज्यांचा दबदबा आहेत असे एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड पुकारलयं. त्यामुळे ठाणे ,कल्याण डोंबिवलीसह इतर जिल्ह्यातील इतर शिवसैनिक अस्वस्थ झाला आहे. एकीकडे शिंदे यांच्याविरोधात काही शिवसैनिक आक्रमक झालेले असताना दुसरीकडे मात्र ठाणे जिल्हा मात्र शांत होता. शिवसैनिकांच्या मनाची घालमेल सुरू असतानाच अचानक गुरुवारी दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे यांचा फोन डोंबिवलीत खणाणला आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले. याला कारणही तसं भावनिक आहे. 
       
''हॅलो  डॉक्टर..मी एकनाथ शिंदे बोलतोय.. आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत आहे.त्यांची काळजी घ्या, काही लागलं तर सांगा... माझा कार्यकर्ता जगला पाहिजे ही विंनती...'', हे संभाषण होतं एकनाथ शिंदे यांचं! शिंदे यांनी डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात फोन लावला होता. कारण ज्येष्ठ शिवसैनिक तथा डोंबिवलीतील उपशहरप्रमुख राम मिराशी यांची २१ जूनला अचानक तब्येत बिघडल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात मिराशी यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती शिंदे यांना मिळाली. मग क्षणाचाही विलंब न करता गुरुवारी संध्याकाळी साडे पाच वाजता थेट रुग्णालयातील डॉक्टरांना फोन लावला. 
"आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याची काळजी घ्या", असं शिंदे म्हणाले. एकीकडे मोठया प्रमाणावर राजकीय उलथापालथ सुरू असतानाचा  शिंदे यांनी फोन करून कार्यकर्त्याच्या तब्येतीची चौकशी केल्याने शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले आणि शिंदे यांचे वर्षानुवर्षे जुने कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर का गेले नाहीत... याचे उत्तरदेखील लोकांना यानिमित्ताने मिळाले

एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांशी संवाद साधतानाचा व्हिडीओ व्हायरल ; त्यानंतर पवारांची प्रतिक्रिया ; पवार म्हणाले ... याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील...

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावेच लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यानंतर मला वाटत नाही की त्यांना आसाम आणि गुजरातचे नेते इथे येऊन मार्गदर्शन करतील. तसेच तिथे गेलेल्या आमदारांनी घेतलेला निकाल पक्षांतर बंदी कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्याशिवाय त्यांच्या मतदारसंघात देखील त्याची प्रतिक्रिया उमटेल, त्यामुळेच आपल्या मतदारसंघातील लोकांना काहीतरी सांगावे, यासाठी निधी मिळत नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत, असंही शरद पवार यांनी सांगितलं.माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी हे भाष्य केलं

एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांशी संवाद साधतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. नॅशनल पार्टी, महाशक्ती. त्यांनी मला सांगितलंय, तुम्ही जो हा निर्णय घेतला आहे, हा देशातला ऐतिहासिक निर्णय आहे. तुमच्यामागे आमची पूर्ण शक्ती आहे. कुठेही काही लागलं तर कधीही कमी पडणार नाही, याची प्रचिती आपल्याला जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा येईल असं सांगत एकनाथ शिंदे यांनी  अप्रत्यक्षपणे भाजपचा पाठिंबा असल्याचं सूतोवाच केलं होतं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आसाममध्ये व्यवस्था करणं म्हणजे तेथील राज्य सरकार अॅक्टिव्ह आहे. राज्य भाजपच्या हाती आहे. वस्तूस्थिती काय आहे हे स्पष्ट होतंय. तिथे कोण आहे, नाही नावं घेण्याची गरज नाही. तिथे जे दिसतंय ते कोण आहेत हे तुम्हाला समजेल, असंही ते म्हणाले. आता मी एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ पाहिला. आम्हाला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठींबा असल्याचं ते म्हणाले. माझ्याकडे यादी आहे, त्यात राष्ट्रीय पक्ष कोण भाजप, बसपा, कम्युनिस्ट पार्टी सीपीआय, सीपीएम, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केलेली यादी आहे. यात बसपा, कम्युनिस्ट पार्टी सीपीआय, सीपीएम, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा हात आहे का? आणि नसेल तर कोणाचा हात आहे हे सांगण्याची गरज नसल्याचंही ते म्हणाले.
“महाविकास आघाडीचा प्रयोग फसला असं नाही. अडीच वर्षे महाविकास आघाडीनं उत्तम काम केलं आहे. अनेक महत्त्वाचे निर्णयही घेतले. कोरोना काळातही उत्तम काम झालं आहे अशात प्रयोग फसला असं म्हटलं जातं हे राजकीय अज्ञान आहे,” असंही त्यांनी सांगितलं. सरकार अल्पमतात आहे का नाही, हे ठरवण्याचा अधिकार हा विधानसभेला आहे. विधानसभेत हे सरकार बहुमतात आहे का नाही, हे स्पष्ट होईल, असंही पवार म्हणाले.

...

बाहेर गेलेल्या आमदारांना परत यावंच लागेल ; आताच्या परिस्थितीवर मात करुन हे सरकार कायम राहिल ; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास...

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील तयार झालेल्या राजकीय परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी आता शरद पवारांनी एन्ट्री केली आहे आज या सर्व घडामोडीबाबत मत व्यक्त करताना पवारांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत 

राज्यातील तयार झालेल्या राजकीय परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी आता शरद पवारांनी एन्ट्री केली आहे आज या सर्व घडामोडीबाबत मत व्यक्त करताना पवारांनी काही सवाल केले आहेत काँग्रेस राष्ट्रवादी सेनेबरोबर असल्याने बाहेर गेलेल्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे मग या अगोदर का नाही बोलले हे आमदार ? अगोदर का नाही याना हिंदुत्व आठवलं ?अचानक का? असे सवाल करत या सर्वांना इकडे यावच लागेल असे पवार म्हणाले आहेत यापूर्वी मी अनेकदा अशी परिस्थिती पहिली आहे असेही सांगायला ते विसरले नाहीत
आज शरद पवार म्हणाले की, "बाहेर गेलेले आमदार राज्यात परतल्यानंतर शिवसेनेसोबत असतील असा विश्वास वाटतोय. विधानसभेत ज्या वेळी बहुमत चाचणी होईल त्यावेळी समजेल हे सरकार बहुमतात आहे. अशी स्थिती मी महाराष्ट्रात याआधी अनेकदा पाहिली आहे. आताच्या परिस्थितीवर मात करुन हे सरकार कायम राहिल असा विश्वास आहे. जे लोक बाहेर गेले, त्यांच्या नेत्याचं म्हणणं आहे की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत असल्याने ते नाराज आहेत. मग ही नाराजी या आधी का काढली नाही? हिंदुत्वाचा मुद्दा या आधी का काढला नाही? संजय राऊत यांनी त्यांना इकडे येऊन भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं. त्यामुळे त्यांना इकडे यावंच लागेल."

राज्यातील महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, "या अडीच वर्षाच्या कारकीर्दीमध्ये महाविकास आघाडीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोना काळात उत्तम काम केलं. हे असं असताना राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग फसला हे म्हणणं राजकीय अज्ञान आहे."

भाजपकडून शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदासह 12 मंत्रिपदांची ऑफर

वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेला मोठं खिंडार पाडलं. राज्यातील महाविकास आघाडी सरकार यामुळे अस्थिर बनलं आहे. मात्र एवढं सगळं केल्यानंतर पुढे काय असा प्रश्न सर्वांना पडत आहे. या परिस्थितीत सत्ता स्थापनेसाठी भाजप महत्त्वाची भूमिका बजावेल. मात्र राज्यात वेगाने राजकीय हालचाली होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  नेमके कुठेत असा प्रश्न पडतो. काही वेगळी समीकरणं राज्यातील राजकारणात दिसतील अशी दाट शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडल्याने अनेक गोष्टी स्पष्ट होऊ लागल्या आहेत. महाविकास आघाडीकडे सरकार टीकवण्यासाठी पुरेसं संख्याबळ नाही. त्यात आता एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेतात याकडे सर्वाचं आहे. झी 24 तासच्या वृत्तानुसार, भाजपकडून शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय 12 मंत्रिपदांची ऑफरही त्यांच्या गटाला आहे. त्यामुळे सध्या सहा मंत्रिपदं असलेल्या शिंदे गटाल एकूण मंत्रिमंडळाच्या 25 टक्के हिस्सा देण्याची ऑफर भाजपकडून असल्याचं बोललं जात आहे.

Wednesday, June 22, 2022

आमदारांबरोबर शिवसेनेचे खासदारही उद्धव ठाकरेंची साथ सोडू लागले...खासदारांचा शिंदेंना पाठिंबा;

वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे  यांच्यासोबत सध्या 37 पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. हे सर्व आमदार गुवाहाटीमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार असल्याचं समोर येत आहे. शिवसेनेचे अनेक बडे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का बसला आहे. अशात आता आमदारांपाठोपाठ खासदारही उद्धव ठाकरेंची साथ सोडत असल्याने शिवसेनेच्या चिंतेत आणखीच वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे लोकसभेत 18 खासदार असून त्यातील अनेक खासदार आपला नवा गट स्थापन करणार आहेत. ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे आणि कल्याण लोकसभा खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे सध्या एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात आहेत. वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती आहे.

उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव शिंदेंनी फेटाळला, 4 मुद्द्यात आपली भूमिका केली स्पष्ट; शिंदेंना भाजपकडून उपमुख्यमंत्री पदाची ऑफर...

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वेगवेगळे वळण लागत आहे. आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. भाजपच्या प्रस्तावावर आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, हे लवकरच स्पष्ट होईल. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वेळ आल्यास बहुमत सिद्ध करु, असा दावा केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. दरम्यान,उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव शिंदेंनी फेटाळला असून 4 मुद्द्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. शिवसेना आमदार आणि भाजपची याबाबत चर्चा सुरु आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मते , महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांची ग्रामीण भागातील ताकद झपाट्याने वाढत आहे. शिवसेनाचा विस्तार होत नाही.  
शिवसेनेच्या नेत्यांची कामे होत नाहीत. अन् झाली तर त्याचं श्रेय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस घेतात, असा दावाही बंडखोर शिवसेना आमदारांनी केलाय. आज सकाळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. मात्र, त्यामधून काहीही निष्कर्ष निघाला नाही.  शिवसेनाबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी उद्धव ठाकरे यांना अनेकदा सांगितले. पण त्यांच्याकडून कोणताही कठोर निर्णय घेण्यात आला नाही. उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा निर्णय येथे असणारे सर्व आमदार घेतील, फक्त एकनाथ शिंदे हा निर्णय घेऊ शकत नाहीत, अशी भूमिका तेथील आमदारांची असल्याचं सूत्रांनी सांगितले. 

उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव शिंदेंनी फेटाळला, 4 मुद्द्यात भूमिका केली स्पष्ट
उद्धव ठाकरे यांच्या संबोधनानंतर बंडखोर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना आपल्या शैलीत सुनावले होते. त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच आघाडीतून बाहेर पडणे का गरेजचं आहे? हे ट्विटमधून एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेय. एकप्रकारे एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांचा प्रस्थाव धुडकावत परत येणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेय. 

ट्विटमध्ये एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलेय?
१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
२. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. 
३. पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
४. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला.उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील इमोशनल मुद्दे...वाचा सविस्तर...

वेध माझा ऑनलाइन - शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिंदे हे शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांना सोबत घेऊन राज्याच्या बाहेर आहेत. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 55 पैकी 34 आमदार असल्यानं ठाकरे सरकार अल्पमतामध्ये आल्याचं मानलं जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी या लाईव्हमधून अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.  या लाईव्हमध्ये त्यांनी भावनिक आावाहनावर भर दिला.


वाचा उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील इमोशनल मुद्दे...
हिंदुत्व हा शिवसेना श्वास. शिवसेना आणि हिंदुत्व हे एकमेकांमध्ये गुंफलेलं आहे. हिंदुत्वाबद्दल विधानसभेत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री. असं काय केलं की हिंदुत्वापासून दूर गेलो असं वाटलं? आधीही शिवसेना हिंदुत्त्ववादी आताही हिंदुत्ववादीच आहे.

सत्तेच्या अडीच वर्षात जे मिळालं ते बाळासाहेबांनीच दिलं. मला सत्तेचा मोह नाही.

आपल्या माणसांना शोधावं लागणं ही कसली लोकशाही?

शरद पवारांनी सांगितलं म्हणून मुख्यमंत्रीपद स्वीकारलं. शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी विश्वास टाकला. प्रशासननंही मला सांभाळले

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा माझ्यावर अजूनही विश्वास आहे. आजच कमलनाथ यांच्यासोबत माझं बोलणं झालं.

माझ्याच लोकांना मी मुख्यमंंत्रीपदी नको असेल तर काय करायचं? गुजरातला जाऊन बोलायची काय गरज आहे. मुख्यमंत्री नको असं मला सांगावं मी राजीनामा देण्यास तयार आहे. ज्यांना मी नकोय त्यांनी समोर येऊन सांगावे, मी पद  सोडायला तयार आहे. मी आजच वर्षा बंगल्यातून मातोश्रीवर जाण्यास तयार आहे.

आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करत आहे. गायब आमदारांनी समोर येऊन माझ्या राजीनाम्याचं पत्र राज्यपालांना द्यावं. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर राजीनामा देण्यास तयार आहे. कोरोना नसता तर मीच राजीनामा घेऊन गेलो असतो.

शिवसैनिकांनी सांगावं मी शिवसेना पक्षप्रमुख पदासाठी योग्य नाही, मी शिवसेना प्रमुखपद सोडण्यास तयार आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असल्यास आनंदच आहे.

मला कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीवर बसणार नाही. मुख्यमंत्रिपद हे अनपेक्षितपणानं आलं. तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको हे माझ्यासमोर येऊन सांगा. मी पद सोडून देईन. हे माझं नाटक नाही. संख्याबळ हा माझ्यासाठी गौण आहे.

उद्धव ठाकरेंना अजूनही नेता मानता का?असा पत्रकारांनी प्रश्न विचारताच शिंदेंनी फोन कट केला!!

वेध माझा ऑनलाइन - पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर पुढे जाणार असल्याची भूमिका ना शिंदेंनी मांडली. याच वेळी त्यांना माध्यमांकडून एक प्रश्न विचारण्यात आला. "बाळासाहेब हे तुमचे नेते आहेतच, पण उद्धव ठाकरे यांना तुम्ही अजूनही तुमचे नेते मानता का?", यावेळी ते काय उत्तर देतात याकडे साऱ्यांचे लक्ष होते, पण त्याच वेळी संपर्क तुटला. त्यानंतर फोन कट झाला की केला, याबाबत चर्चा सुरू झाली.
दरम्यान उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा का नाही, हा निर्णय त्यांचा आहे असे ते म्हणाले आहेत

राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकावर विरोधात बंडाचं निशाण फडकावणारे एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा केला. दरम्यान, आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेसोबतच राहणार का किंवा ते वेगळा गट स्थापन करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर आता एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

“संध्याकाळी आमदारांची एक बैठक पार पडणार आहे आणि त्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल. तो तुम्हाला संध्याकाळी कळेल,” असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी पुढील भूमिकेवर बोलताना दिलं. याशिवाय आपलं संख्याबळ आवश्यकतेपेक्षा जास्त असल्याचंही त्यांनी सांगितलं. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि विश्वास ठेवणारे आहोत. तिच भूमिका महाराष्ट्राच्या जनतेचीही आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा का नाही, हा निर्णय त्यांचा असल्याचंही ते म्हणाले. याच वेळी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. "बाळासाहेब हे तुमचे नेते आहेतच, पण उद्धव ठाकरे यांना तुम्ही अजूनही तुमचे नेते मानता का?", यावेळी ते काय उत्तर देतात याकडे साऱ्यांचे लक्ष होते, पण त्याच वेळी संपर्क तुटला. त्यानंतर फोन कट झाला की केला हे कळू शकले नाही


नामदार शंभूराज देसाई याना नोटीस ; ... ना. देसाई यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार ?

वेध माझा ऑनलाइन - राज्याचे गृहराज्यमंत्री ना शंभूराज देसाई याना शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयातून नोटीस बजावण्यात आली आहे 
या नोटीस नुसार आज बुधवारी वर्षा बंगल्यावर होणाऱ्या बैठकीस ना देसाई याना उपस्थित रहायचे आहे तसे न झाल्यास ना देसाई यांच्यावर आपात्रतेची कारवाई होणार असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह ; व्हीडिओ कॉन्फरन्स ने घेणार बैठक ; काँग्रेस नेते नाना पटोले यांची माहिती...

वेध माझा ऑनलाइन - राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झालेली असताना आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होत असताना कोरोनाच्या एन्ट्रीनं आता वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. 

महाराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या कमलनाथ यांनी राज्यातील काँग्रेस आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसचे राज्यातील सर्व नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे सर्व आमदार आमच्याशी संपर्कात असून ४४ पैकी ४१ आमदार बैठकीला उपस्थित होते. तर तीन आमदार मुंबईच्या दिशेनं येत आहेत, अशी माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याच्या वृ्त्तालाही नाना पटोले यांनी पुष्टी दिली. उद्धव ठाकरेंची अँटिजन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, पण आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याची अधिकृत पुष्टी अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेली नाही.

उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

उद्धव ठाकरेंसमोरचे सगळे पर्याय आता संपले ; राज्यपाल अंतिम निर्णय घेणार

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे  यांनी पुकारलेले बंड अखेर यशस्वी झाल्यात जमा आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे तब्बल ४६ आमदारांचा गट तयार झाल्याचा दावा केला आहे. आता महाविकास आघाडी सरकारकडे एकच पर्याय उरला आहे. महाविकास आघाडी सरकार विधानसभा बरखास्त देण्याचा प्रस्ताव मांडू शकते. पण, याचा निर्णय हा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हातात असणार आहे. राज्यपालाचं अंतिम निर्णय घेऊ शकतात. 

हे आघाडी सरकार आता शेवटच्या घटका मोजत आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये विधानसभा बरखास्त करण्याची चर्चा केली जाणार आहे. सरकारने जर बरखास्तीचा प्रस्ताव ठेवला तर निवडणूक लागण्याची शक्यता आहे. पण विधानसभा बरखास्त करायची की नाही याचा संपूर्ण अधिकार हा राज्यपालांना असणार आहे. सरकार जर अल्पमतात आलं तर राज्यपाल हे विरोधी पक्षाला संख्याबळ सिद्ध करण्यासाठी निमंत्रण देेऊ शकते. जर निवडणूक लागली तर सेनेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे आणि शिंदे गटालाही फटका बसण्याची शक्यता आहे.

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. हीच बैठक आज अखेरची बैठक असल्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार अशी माहिती देणार आहे. त्यानंतर ते आपला राजीनामा देणार आहे, असल्याची माहिती समोर आली आहे 

Tuesday, June 21, 2022

आदित्य ठाकरेंनी स्वतःच्या नावाच्या मागे असलेला मंत्रिपदाचा उल्लेख काढला...

वेध माझा ऑनलाइन - शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून एक मोठी बातमी आली आहे. महाराष्ट्रात राजकीय भूकंप  घडवणाऱ्या एकनाथ शिंदेंची मनधरणी सुरू असतानाच हे वृत्त आलं आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर आमदारांबरोबर असलेले एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आणि याच सगळ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रोफाइवरून मंत्रिपदाचा उल्लेख काढला आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत? संजय राऊतांच्या ट्वीटनं खळबळ

वेध माझा ऑनलाइन - संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट केलंय की, "महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने.."
संजय राऊतांच्या ट्वीटनं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. संजय राऊतांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत दिले असल्याचं बोललं जात आहे. 

विधानसभा बरखास्तीची दोन कारणं आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, किंवा सत्ताधारी पक्षावर अविश्वासाचा ठराव आणवा आणि सत्ताधारी तो अविश्वासाचा ठराव जिंकू शकले नाही, तर विधानसभा बरखास्त होऊ शकते. त्यामुळे संजय राऊत यांनी केलेलं ट्वीट अत्यंत बोलकं आहे. त्यांच्या ट्वीटमुळं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. त्यांच्या ट्वीटमुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 
काही वेळापूर्वीच माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना संघर्ष करणारा पक्ष आहे. जास्तीत जास्त सत्ता जाईल. सत्ता पुन्हा मिळू शकते, पण पक्षाची प्रतिष्ठा सर्वात वरती आहे, असं भाष्य केलं होतं. त्यानंतर काही वेळातच संजय राऊत यांनी विधान बरखास्तीचं ट्वीट केलं आहे. 
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "राज्यपालांना करोना झाला असल्याने काम थोडं धीम्या गतीने सुरु आहे. राज्यपालांना थोडं बरं वाटू द्या त्यानंतर कोणाकडे किती आमदार आहेत पाहूयात. उगाच जास्त उतावीळपणा नको. एकनाथ शिंदे आणि आमचे सर्व लोक पुन्हा स्वगृही परततील याची आम्हाला खात्री आहे." आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होणार असल्याचंही संजय राऊतांनी यावेळी सांगितलं. पुढे बोलताना "शिवसेना संघर्ष करणारा पक्ष आहे. जास्तीत जास्त सत्ता जाईल. सत्ता पुन्हा मिळू शकते, पण पक्षाची प्रतिष्ठा सर्वात वरती आहे." असं संजय राऊत यावेळी म्हणाले.  


एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर संतापले ; काय म्हणाले...? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे  यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारीच एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवलं आहे.पण, उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयावर एकनाथ शिंदे संतापले आहेत. त्यांनी हा निर्णय बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे.   शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन गुवाहाटीला पोहोचले आहेत. त्यानंतर त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलत असताना आपली भूमिका स्पष्ट केली. 'जो गटनेता निवडला गेला आहे, तो बेकायदेशीर आहे. सर्व आमदारांना एकत्र बैठक घेऊन एकमताने गटनेता निवडायचा असतो ही पद्धत आहे. बहुमताचा आकडा जो आहे, तो आमच्यासोबत आहे. त्यामुळे त्यांची निवड ही अवैध ठरू शकते, हा तांत्रिक मुद्दा आहे' असं म्हणत शिंदेंनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

'आम्ही 40 आमदार सोबत आहे. आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. आम्ही फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवलं आहे, ते पुढे घेऊन जाणार आहोत. सत्तेसाठी कोणतीही तडजोड करणार नाही. सर्वसामान्य जनतेची जी भावना आहे, ती घेऊन पुढे जात आहोत' असं एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही सर्व सामान्य शिवसैनिक आहोत. आम्ही कुणावरही टिका करणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांचे आमदार सोबत आले आहे. कुणाबद्दलही काही बोललो नाही. विकासाचं राजकारण केलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
 'उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही. मिलिंद नार्वेकर आले होते, त्यांना मी भेटलो. तुम्ही एकीकडे माणसं बोलण्यासाठी पाठवली आहे आणि दुसरीकडे मला गटनेतेपदावरून हटवलं. माझे पुतळे जाळले जात आहे. मी याआधी सुद्धा उद्धव ठाकरे यांना आमदारांची भूमिका समजावून सांगितली होती. पण बोलणी सुरु असताना मला गटनेतेपदावरून हटवलं. त्यामुळे मी आमदारांशी बोलून पुढील निर्णय घेईल असं सांगितलं, असंही शिंदेंनी स्पष्ट केलं मी आजही बाळासाहेबाचा कट्टर शिवसैनिक आहे, शिवसैनिक राहणार आहे. आनंद दिघे यांचे विचार आणि प्रेरणा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. काल आज आणि उद्या आम्ही शिवसैनिकच असणार आहोत. आमची सुरुवात ही हिंदुत्वाची होती. यात कोणतीही तडजोड करणार नाही., आम्ही कोणत्याही आमदारांना जोरजबरदस्तीने आले नाही. स्वखुशीने हे आमदार आले आहे. 40 पेक्षा जास्तीचे आमदार आज माझ्यासोबत आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आली आहे,असं एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण ; एकनाथ शिंदे आणि कोश्यारी यांची भेट लांबणीवर...?

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंद यांनी शिवसेनेचे आमदार फोडून शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. 33 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी मोठ्या बंदोबस्तात मध्यरात्री गुवाहाटीला दाखल झाले.आता एकनाथ शिंदे हे मुंबईकडे रवाना होणार असल्याचे बोलले जात आहे. राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे.  परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने पुन्हा भेट होणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने राज्यातील शिवसेनेविरोधातील आणखी तीन दिवस बंड कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे पुढचे तीन दिवस महत्वाचे असल्याचे बोलले जात असल्याने राज्यात पुढे काय होणार हे पुढच्या तीन दिवसांत समजणार आहे. एकनाथ शिंदे आज मुंबईला राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीसाठी येणार असल्याचे सांगण्यात आले होते. 

ठाकरे सरकार धोक्यात; एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांचा फोटो व्हायरल, स्वतंत्र गट स्थापन होणार!राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात जाणार !

वेध माझा ऑनलाइन -  शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आता स्वतंत्र गट स्थापन करण्याची आता दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा फोटो व्हायरल झाला आहे. शिंदे यांनी स्वतंत्र गटासाठी आवश्यक असलेली 37 ही संख्या पूर्ण केली असल्याचे सध्या चित्र आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुंबईत दाखल झाले आहेत. आज भाजप आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडणार आहेत.

सूरतमध्ये मंगळवारी दिवसभरानंतर रात्री उशिराही राजकीय घडामोडी घडल्या आहेत. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू हेदेखील शिवसेनेच्या आमदारांसोबत आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाला आहे. व्हिडिओत आमदार एका निवेदनावर स्वाक्षरी करत असल्याचे दिसत आहे. हे निवेदन विधानसभेत स्वतंत्र गटासाठी मान्यता द्यावी यासाठी होते असल्याचे म्हटले जात आहे. 
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचे पत्र आज राजभवनात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर सरकार अल्पमतात असल्याचे सांगून लवकरच विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल देण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या 37 आमदारांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाल्यास सरकार थेट अल्पमतात जाण्याची शक्यता आहे.