Monday, June 6, 2022

कराड पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले उपनगराध्यक्ष जयवन्त पाटील यांचे अभिनंदन ; माझी वसुंधरा स्पर्धेत मिळालेल्या यशात कोंट्रिब्युशन दिल्याबद्दल मानले आभार...

वेध माझा ऑनलाइन - माझी वसुंधरा अभियान २.० मध्ये नगरपालिका गटात कराड नगरपालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला यानिमित्ताने पालिकेचे मुख्याधिकारी व कर्मचारी यांनी कराड नगरीचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील (दादा) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना लाडू भरविला  नगरपरिषदेच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन      
नेहमीच मोलाचे सहकार्य केल्याबद्दल व नुकत्याच माझी वसुंधरा स्पर्धेत मिळालेल्या यशासाठी आपले कोंट्रिब्युशन दिल्याबद्दल पालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले व त्यांचे अभिनंदनही केले

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियान पुरस्कार वितरण सोहळा माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकताच मुंबई येथे पार पडला. नगरपरिषदेमध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने लाडू वाटप करून ,गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला... यानिमित्ताने मुख्याधिकारी व कर्मचारी यांनी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले

No comments:

Post a Comment