Tuesday, June 7, 2022

माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून कराड नगर पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार...

वेध माझा ऑनलाइन - राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आयोजित स्पर्धेत कराड नगरपरिषदेने राज्यातील नगरपरिषद गटात पहिला क्रमांक पटकावला व सुमारे 5 कोटी रुपयांचे बक्षीस पटकावले. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हे बक्षीस वितरण करण्यात आले. या पुरस्कार बद्दल कराड दक्षिण चे आमदार तथा माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके व पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी इंद्रजीत चव्हाण, जावेद शेख आदी यावेळी उपस्थित होते.

 यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नि व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत गतवर्षी नगरपालिकेने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला होता. यावर्षी आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा करत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली.  यासाठी कराड नगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे प्रामाणिक प्रयत्नांना यश आले असून त्यांना साथ देणाऱ्या कराड नगरीच्या सर्व नागरिकांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. यामुळेच पालिकेला पहिला क्रमांक पटकविता आला. यापुढेही पालिकेने आपली कामगिरी अधिक कार्यक्षम ठेवावी यासाठी अधिकाधिक विकास निधी देण्यास मी प्रयत्नशील राहीन.

 

No comments:

Post a Comment