Wednesday, June 8, 2022

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाचा उमेदवार जाहीर ; यावेळीही पंकजा मुंडेंचा पत्ता कट...

वेध माझा ऑनलाइन - आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवार जाहीर केले आहे. यावेळीही पंकजा मुंडेंना हुलकावणी देण्यात आली आहे. भाजपाकडून उमा खापरे तसंच श्रीकांत भारतीय या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर विरोधी पक्षनेतेपदावर असलेले प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रसाद लाड आणि कर्जत जामखेडचे माजी आमदार राम शिंदे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

राज्यसभा तसंच विधान परिषदेसाठीही पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र राज्यसभेतही पंकजांना उमेदवारी डावलण्यात आली. राज्यसभेसाठी भाजपाने पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्यांना उमेदवारी मिळाली, त्यांना शुभेच्छा अशी प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली होती. तर विधान परिषदेवर पाठवायचं की नाही हा निर्णय पक्ष घेईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होतील.

दरम्यान, भाजपाने उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय या नव्या चेहऱ्यांना यंदा विधान परिषदेसाठी संधी दिली आहे. उमा खापरेंच्या रुपाने महिला मोर्चाच्या नेतृत्वाला प्रतिनिधित्व मिळालं आहे. तर प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. पंकजा मुंडेंच्या नावासाठी देवेंद्र फडणवीसांनी खूप प्रयत्न केल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment