Wednesday, May 31, 2023

गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात ; आता ग्राहकांना किती रुपये मोजावे लागणार ?

वेध माझा ऑनलाइन । महिन्याच्या पहिल्याच दिवशी अर्थात 1 जूनला एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. ही कपात करत तेल कंपन्यांनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या किमतीनुसार, कमर्शिअल गॅस सिलिंडर तब्बल 83 रुपयांनी स्वस्त झाले आहे. यामुळे आता 19 किलोच्या कमर्शिअल एलपीजी गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना 1773 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी हे सिलिंडर 1856.50 रुपयांना मिळत होते. मात्र, घरगुती गॅस सिलिंडर पूर्वीच्यात दरात मिळणार आहे.

कमर्श‍िअल गॅस स‍िलिंडरच्या नव्या किंमती -
कमर्शिअल गॅस स‍िलेंडर द‍िल्‍लीत 1856.50 रुपयांवरून 1773 रुपयांवर आले आहे. कोलकात्यात ही किंमत 1960.50 रुपयांवरून 1875.50 रुपयांवर आली आहे. याच प्रकारे मुंबईत कमर्शिअल गॅस सिलिंडरसाठी पूर्वीच्या 1808.50 रुपयांऐवजी आता 1725 रुपये मोजावे लगातील. याशिवाय चेन्‍नईमध्ये कमर्शिअल गॅस सिलिंडरची किंमत आता 2021.50 रुपयांवरून  कमी होऊन 1937 रुपयांवर आली आहे.

महाविकास आघाडीत मोठी फूट ; शिंदे गटाच्या मंत्र्यांचा गौप्यस्फोट ;

वेध माझा ऑनलाइन । ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी महाविकास आघाडीमधील अनेक लोक आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. ठाकरे गटाने शिंदे गटात मोठी फूट पडणार असल्याचा दावा केला होता. यावर प्रतिक्रिया देताना शंभूराज देसाईंनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

ठाकरे गटाने केलेल्या दाव्यावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, शिंदे गटात मोठी फूट ही त्यांची शंभरावी खोटी माहिती आहे. त्यांचा पोपट खोट्या चिठ्ठ्या काढतो, आम्ही चांगले काम करत आहोत हे त्यांना बघवत नाही. तसेच महाविकास आघाडीमधील अनेक लोक आमच्या संपर्कात असल्याचा दावा देसाई यांनी केला. 
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे प्रकरणात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना संभाजीनगर पोलिसांकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी अंधारे यांनी केलेल्या तक्ररीची चौकशी करुन शिरसाट यांना क्लीन चीट दिली आहे. यावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, शिरसाट यांच्याबाबतीत योग्य ती चौकशी झाली आणि खरं ते समोर आलं. भाजप आणि आमच्यात चांगल्या पद्धतीनं समन्वय असल्याचंही शंभूराज देसाई यांनी म्हटलं.

यावेळी ठाकरे गटावर हल्लाबोल करताना शंभूराज देसाई म्हणाले, आम्ही चांगले काम करतो हे त्यांना बघवत नाही.‘शासन आपल्या दारी’ या क्रार्यक्रमाला चांगाल प्रतिसाद मिळत आहे. ते हे करु शकले नाहीत लोकांचे लक्ष विचलित करत आहेत. त्यांना राज्याशी काहीही देणं-घेणं नसल्याचे शंभूराज देसाई म्हणाले.

अहमदनगरचे नामांतरण अहिल्यानगर होणार ; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा ;


वेध माझा ऑनलाईन। 
अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर होणार अशी मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी होळकरनगर करण्याचे काम आमच्या सरकारमध्ये होत आहे हे आमचं भाग्य आहे. असेही एकनाथ शिंदे यांनी म्हंटल

आजचा हा ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार मी आणि देवेन्द्रजी झालो याचा आम्हाला आनंद आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कर्तृत्व हिमालया एवढं होत. महाराष्ट्र्राची भूमी रत्नांची खाण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा महाराष्ट्र आहे. या भूमीचा वसा, वारसा वाहणाऱ्यांची मोठी मांदियाळी आहे . यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नावही अग्रक्रमाने घेतलं जाते. अहिल्यादेवी यांचे काम, त्यांचे कर्तृत्त्व आणि त्यांनी केलेला त्याग सर्वश्रुत आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर फडणवीस एकनाथ शिंदेंना भेटायला मध्यरात्री वर्षावर ; युतीच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब?

वेध माझा ऑनलाइन। मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल मध्यरात्री भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही भेट झाली. भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र आगामी मुबंई महापालिकेची निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली होती. त्यानंतर मध्यरात्री फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

पुन्हा मनसेसोबत युतीच्या चर्चेला उधाण
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि भाजप व शिवसेना शिंदे गट यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी जोरदार तयारी सुरू आहे. या निवडणुकीसाठी युतीमध्ये मनसे देखील सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनदा राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. तर राज ठाकरे यांनी देखील शिंदेंची भेट घेतली आहे.
काल फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मध्यरात्री फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा  मनसेसोबतच्या युतीच्या चर्चेला उधाण आलं आहे. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाच्या नेत्याकडून मनसेसोबतच्या युतीबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये.

राजकारणात येणार का...या प्रश्नावर गौतमी पाटीलने केला मोठा खुलासा ; काय म्हणाली?

वेध माझा ऑनलाईन। रील स्टार गौतमी पाटील राजकारणात येणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. मात्र आता याबाबत खुद्द गौतमी पाटीलनेच मोठा खुलासा केला आहे. राजकारणात मला इंटरेस्ट नाही, राजकारणात मी जाणार नाही, मी एक कलाकार आहे, यापुढेही कलाच सादर करणार असल्याचं गौतमी पाटीलने म्हटलं आहे. त्यामुळे आता गौतमी पाटील राजकारणात जाणार असल्याच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.  पुण्यातील खेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमीचा कार्यक्रम मंगळवारी रात्री खेडला आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ती बोलत होती.

 संभाजीराजेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया  
दरम्यान दोन दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी कलाकारांना सुरक्षा द्यायला हवी असं मत व्यक्त केलं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून युटरर्न घेत ट्विट केलं. महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्यांना सुरक्षा देण्याची गरज नसल्याचं राजेंनी म्हटलं. याबाबत गौतमीला विचारलं असता तीने यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे.  याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं तीनं म्हटलं आहे. दरम्यान पाटील आडनाव लावू नकोस अशी काही संघटनांकडून मगणी करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना तीने चांगलंच सुनावलं आहे.

Tuesday, May 30, 2023

माजी नगरसेवक सौरभ पाटील यांनी कराडच्या पालिका अधिकाऱ्याला धरले धारेवर ; म्हणाले...तुम्ही राजीनामा द्या...

वेध माझा ऑनलाइन। कराडच्या कचरा डेपोला 2 दिवसांपूर्वी मोठी आग लागली होती अग्निशामक दलाचे लोक रात्री उशिरापर्यंत ती आग विझवत होते अद्याप या आगीचे कारण अस्पष्टच आहे... दरम्यान याच पार्शवभूमीवर माजी नगरसेवक सौरभ पाटील यांनी आग लागलेल्या रात्री 1 वाजता आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याला आग लागलेल्या स्पॉटवरच बोलावून घेत चांगलेच झापल्याचे समजते 

दोन दिवसांपूर्वी पालिकेच्या कचरा डेपोला अचानकपणे मोठी आग लागली होती... त्या आगीचे कारण अद्याप पालिकेने सांगितले नसले तरी ही आग लागली की लावली गेली... असे अनेक तर्क चर्चेत आहेत... दरम्यान ही आग लागल्याचे वृत्त सोशल मीडियावरून काही क्षणात शहरात पसरले... त्याचवेळी लोकशाही आघाडीचे नेते व माजी नगरसेवक सौरभ पाटील याना ही आग लागल्याची बातमी समजताच त्यांनी पालिकेच्या आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याला फोन केला व या आगीचे कारण विचारले... त्यावेळी आपण घरी असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले ... त्यानंतर सौरभ पाटील यांनी त्या अधिकाऱ्याला आग लागलेल्या स्पॉटवर बोलावून घेत चांगलेच झापले... तुमच्या कामाबद्दल शहरात नाराजी आहे असे सौरभ पाटील या अधिकाऱ्याला म्हणाले... त्यावेळी या अधिकाऱ्यांने लोक नाराज असतील तर मी राजीनामाच देतो असे...आडग्या भाषेत उत्तर दिले... त्या बोलण्याचा राग आल्याने सौरभ तात्या यांनी या  अधिकाऱ्यांला,... आता तुम्ही राजीनामा द्यायचाच... शब्द माघारी घ्यायचा नाही... असे ठणकावत चांगलेच झापले... त्यानंतर हा अधिकारी काही अंशी ताळ्यावर येऊन बोलायला लागला... कुटुंबाशी बोलून याबाबतचा निर्णय घेईन असे म्हणु लागला... तरीही सौरभ तात्या यांनी त्यांच्यासमोर... तुम्ही आता राजीनामा द्यायचा म्हणजे द्यायचा...जबाबदारीने काम करायला जमत नसेल तर तुम्ही राजीनामा द्याच... एवढाच ठेका लावला...

रस्त्यावर अनेक ठिकाणीं कचरा तसाच पडलेला असतो, तो प्रॉपर उचलला जात नाही... तो रस्त्यावर पसरलेला असतो... कचरा वेगळा करण्याची प्रक्रिया प्रॉपर होत नाही... कचरा डेपोतील कचऱ्याचे व्यवस्थापन एकदम कोलमडले आहे... अशा अनेक तक्रारी वाढल्या असल्याचे सौरभ पाटील यांनी या अधिकाऱ्याच्या लक्षात आणून देत आपल्या भाषेत समज दिली...आग लागल्याच्या रात्री 1 वाजता सौरभ तात्यांनी या अधिकाऱ्यांला धारेवर धरल्याची चर्चा कराडात जोरदार सुरू आहे 

नवीन संसद इमारतीच्या उद्घाटनाला शरद पवार यांची पाठ, तर अजितदादांकडून नवीन संसद भवनाचे कौतुक ; राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय?

वेध माझा ऑनलाइन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी सोमवारी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचं कौतुक केलं. त्यांनी सर्व खासदारांना एकत्र येऊन देशातील सर्वसामान्यांसाठी काम करून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा सल्ला दिला. यापूर्वी राष्ट्रवादीने उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास नकार दिला होता. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना उद्घाटन कार्यक्रमाला निमंत्रित न केल्याबद्दल पक्षप्रमुख शरद पवार यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.

शरद पवार म्हणाले होते, मी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पाहिला. मी तिथे नव्हतो याचा मला आनंद आहे. तिथे जे घडलं त्याची मला काळजी वाटते. आपण देशाला मागे नेत आहोत का? मी ज्या सभागृहाचा सदस्य आहे त्या सभागृहाच्या अध्यक्षांनाही बोलावलं नाही. ज्यांच्या भाषणाने संसदेचं अधिवेशन सुरू होतं त्यांना निमंत्रित करण्यात आलं नव्हतं.

तर अजित पवारांनी मात्र याचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, की इंग्रजांनी आपली संसद (जुनी इमारत) बांधली हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आता ज्या नवीन संसद भवनाचं उद्घाटन होत आहे, ते आपण स्वतः बांधलं आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर अनेक राज्यांनी स्वतःच्या विधानसभेच्या इमारती बांधल्या आहेत. महाराष्ट्राने 1980 नंतर विधानसभेची नवीन इमारतही बांधली आहे, परंतु सध्या महाराष्ट्रात नवीन विधानसभेची इमारत असावी, अशी चर्चा सुरू आहे.

जुन्या संसद भवनाच्या बांधकामासोबत देशातील सध्याच्या लोकसंख्येची तुलना करताना पवार म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येबरोबर लोकप्रतिनिधीही वाढणार असून या नवीन इमारतीची गरज असल्याचं त्यांना व्यक्तिश: वाटत होतं. ते म्हणाले, देशाच्या लोकसंख्येचा विचार करता जुनी संसदेची इमारत बांधली गेली तेव्हा भारतात आपण 35 कोटी लोक होतो आणि आता 135 कोटी आहोत. हे पाहता आता लोकप्रतिनिधीही वाढणार आहेत. त्यामुळे या नव्या इमारतीची गरज होती असं मला व्यक्तिश: वाटतं.असंही ते म्हणाले.





दाखल्यांचा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलन ; मनसेच्या विद्यार्थी सेनेचा प्रशासनास इशारा

वेध माझा ऑनलाइन । कराडच्या प्रांत कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून जातीचे तसेच नॉन क्रिमिलियर दाखल्याबाबत विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होईल होऊ लागले आहे एक एक महिना हे दाखले दिले जात नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचा हा प्रश्न प्रशासनाने लवकरात लवकर सोडवावा अन्यथा विद्यार्थ्यांना घेऊन प्रशासनाविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक भोसले यांनी दिला आहे.
येथील नायब तहसीलदार श्री राठोड यांना मनसेने मागण्यांचे निवेदन दिले आहे. यावेळी साहिल नलवडे, ओंकार रंधणे, दत्ता भोसले, वासुदेव पाटील, ओंकार फुके यांची उपस्थिती होती.

मनसे च्या विद्यार्थी सेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शैक्षणिक अथवा नोकरीत आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी जातीचे तसेच नॉन क्रिमीलिअर दाखल्यांची आवश्यकता असते. हे दाखले प्रांताधिकाऱ्यांच्या सहीने संबंधितांना दिले जातात. 
अर्ज केल्यापासून योग्य कागदपत्रे असल्यास चार ते पाच दिवसात हे दाखले अर्जदाराला मिळतात. या दाखल्यांच्या पूर्ततेनंतर संबंधितांना शासकीय नोकरी तसेच शिक्षणाचा पुढील मार्ग सुकर होतो. मात्र कराड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अशा दाखल्यांच्या वितरणाचे प्रमाण कमी झाले असून हे दाखले मिळवण्यासाठी काहीना महिना महिना प्रतीक्षा करावी लागत आहे. एकीकडे पाटण सारख्या डोंगरी भागात शासनाने 'शासन आपल्या दारी' ही योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत तेथील नागरिकांची शासकीय कामे मार्गी लागत आहे. मात्र शेजारच्या कराड तालुक्यात मात्र वेगळी स्थिती पाहायला मिळत आहे. येथे जातीच्या तसेच नॉन क्रिमिलियर दाखल्यासाठी 'शासनाच्या दारात जाऊनही' 'वेट' करावा लागत आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी स्पर्धा परीक्षासह शासकीय नोकरीच्या जाहिराती निघाल्या आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी अन्य कागदपत्रे गोळा केली आहेत. मात्र मागास प्रवर्गासाठी आवश्यक असणारे जातीचे व नॉन क्रिमिलियर दाखले वेळेत मिळत नसल्याने आधीच शासकीय नोकरीची वाणवा, त्यात 'सरकारी काम अन सहा महिने थांब' या म्हणीचा प्रत्यय या दुहेरी संकटात विद्यार्थी अडकले आहेत. दाखल्यास विलंब होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच नोकरी संदर्भात नुकसान होत आहे. यावर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास कराड तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन मनसे स्टाईल आंदोलन उभारले जाईल असा इशाराही निवेदनात दिला आहे.

Sunday, May 28, 2023

नवीन संसद भवनाच्या व्हीडिओला शाहरुख खानने दिला आवाज ; पंतप्रधानांनी काय म्हटलंय? वाचा बातमी ;

वेध माझा ऑनलाइन । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं. तर यापूर्वी २६ मे रोजी पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. यासोबतच त्यांनी लोकांना विनंती केली होती की या व्हिडिओला आवाज द्या आणि सोशल मीडियावर हॅशटॅग 'माय पार्लमेंट माय प्राईड' नावाने पोस्ट करा. यानंतर अनेक सेलिब्रिटी, नेतेमंडळी आणि सामान्य लोकांनी व्हिडिओला आवाज दिला. दरम्यान अभिनेता शाहरुख खाननेही या व्हिडिओला आवाज दिला आहे.

नव्या संसद इमारतीच्या या व्हिडिओला आवाज देताना शाहरुख म्हणाला, "नवीन संसद भवन. आपल्या अपेक्षांचं नवीन घर, आपल्या संविधानाची रक्षा करणाऱ्यांसाठी एक असं घर,  जिथे १४० कोटी हिंदुस्थानी कुटुंब आहे. हे नवीन घर इतकं भव्य असू दे की इथे देशातील प्रत्येक प्रांत, गाव, शहर आणि कानाकोपऱ्यातील सर्वांसाठी जागा असेल. प्रत्येक जाती प्रजाती आणि धर्मावर याचं प्रेम असो. या घराची नजर इतकी तीक्ष्ण असू दे की प्रत्येक नागरिकाला पाहू शकेल, ओळखू शकेल आणि त्यांच्या समस्या समजू शकेल. इथे सत्यमेवचा जयघोष केवळ स्लोगन नाही तर विश्वास असो."
दरम्यान, शाहरुखने याबाबतचा आपला व्हीडिओ ट्वीट केलाय... हा व्हीडिओ पंतप्रधान मोदींनी रिट्वीट करत लिहिले आहे की , "खूप सुंदर मांडणी. संसदेची नवी इमारत लोकशाहीची ताकद आणि विकास दाखवणारी आहे. परंपरा आणि आधुकनिकतेचं मिलन आहे

...म्हणूनच शरद पवार संसद भवनाच्या उदघाटनाला आले नाहीत ,; भाजपचा गौप्यस्फोट ;

वेध माझा ऑनलाईन । आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं. मात्र त्यापूर्वी उद्घाटनावरून चांगलंच नाराजीनाट्य रंगल्याचं पहायला मिळालं होतं. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. नवीन संसद भवन उभारताना विरोधकांना विचारात घेतलं नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होतं. आता त्यांच्या या टीकेला भाजप नेते राम शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले राम शिंदे? 
भाजप आमदार राम शिंदे यांनी शरद पवारांवर जोरदार पलटवार केला आहे. शरद पवार यांना संसदीय कामकाजाचा साठ वर्षांचा अनुभव आहे. या साठ वर्षांमध्ये त्यांनी अनेकदा सत्ता भोगली आहे. सत्तेत असताना विरोधी पक्षाची काय भूमिका असते आणि सत्ताधाऱ्यांची काय भूमिका असते हे पवारसाहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं जाणून आहेत. त्यामुळे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होणं गरजेचं होतं मात्र इतर पक्षाच्या दबावामुळे ते सहभागी झाले नाहीत. अन्यथा पवारसाहेब नक्की या कार्यक्रमात सहभागी झाले असते असा राम शिंदे यांनी गौप्यस्फोट केला आहे.

कराडच्या प्रीतिसंगम घाट परिसरात अश्लील चाळे करणाऱ्यांना आज पोलिसांकडून हलका फुलका चोप ;


वेध माझा ऑनलाइन । 
कराडच्या प्रीतिसंगम घाट परिसरातील स्वामींच्या बागेत अश्लील चाळे करणाऱ्या प्रेम वीरांना आज पोलिसांनी हलका फुलका चोप देवून त्यांची चौकशी करून समज देत त्यांना सोडून दिले पोलिसांनी संपूर्ण बाग परिसरात शंका येईल त्या युगलांची चौकशी केली त्यामुळे आज प्रीतिसंगम घाट येथे अश्लील चाळे करणाऱ्यांची चांगलीच धावपळ झाल्याचे पहायला मिळाले
येथील स्वामींची बाग परिसरात बाहेर गावाहून तसेच कराड तालुक्यातुन अनेक प्रेमी युगल फिरण्यासाठी तसेच गुलुगलु करण्यासाठी रोजच येत असतात... त्यांचे अश्लील चाळे हा नेहमीच चर्चेचा विषय असतो... व्हॅलेंटाईन डे दिवशी या आंबट शौकिनाना न मागता चोप मिळतो... या ठिकाणी अनेक तरुण तरुणी वाढदिवस साजरा करण्यासाठी तसेच फिरण्याचे कारण काढून येत असतात... कॉलेज किंवा शाळा बुडवून येथे येणाऱ्या मुला मुलींची संख्या देखील याठिकाणी जास्त आहे... या मुलांमुलींबद्दल अनेक तक्रारी नेहमीच येत असतात... त्यांपैकी काही प्रेमी युगल धडधडीत सगळ्यांसमोर अश्लील चाळे करत बसतात... बघणारे लाजतील असे हे चाळे बघून अनेकांनी वारंवार  याविषयी तक्रारीही केल्या आहेत...  घाटावर पोलीस स्टेशन झाले आहे... मात्र तिथे कधीतरी पोलीस असतात... असे तिथले लोक सांगतात...आज मात्र घाटावर विथाऊट युनिफॉर्म पोलीस हजर असलेले पहायला मिळाले...दुपारच्या सुमारास  घाट परिसरात बाहेर गावातील प्रेमी युगल अश्लील चाळे करताना तेथे पोलिसांना दिसून आले त्यांनी त्या युगलांची चौकशी केली असता ते  तालुक्याच्या ठिकाणाहून आल्याचे समजले... त्यांना हलका फुलका चोप देऊन त्यांची चौकशी करून त्यांना समज देत सोडून दिले... ते पाहून तेथील इतर बाकीचे आंबट शौकीन "कपल' त्याठिकान्हून हळूच दबक्या पायांनी निघून गेल्याचे दिसले 

Saturday, May 27, 2023

ही मैत्री तुटायची नाय !मित्राच्या चितेत उडी घेऊन संपवलं आयुष्य ;

वेध माझा ऑनलाइन ।  एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. घटना ऐकणाऱ्याच्या डोळ्यात देखील आश्रू तराळावेत अशीच ही घटना आहे. आपल्या मित्राचा मृत्यू झाला आहे, हा धक्का सहन न झाल्यानं दुसऱ्या मित्राने त्याच्या तिचेत उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे. हे दोन्ही मित्र प्राथमिक शाळेपासूनच एकत्र शिकले होते. मात्र शनिवारी त्यांच्यामधील एका मित्राचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. मित्राच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यानं दुसऱ्या मित्राने त्याच्या चितेमध्ये उडी मारत आत्महत्या केली. त्याला जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मित्राची चिता थंड होण्याआधीच त्याचीही प्राणज्योत मालवली.

मित्राच्या निधनाचा धक्का
ही घटना आहे उत्तर प्रदेशातल्या फिरोजाबादमधील. नगला खंगर पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या स्वरूप घाटचा रहिवासी असलेल्या 35 वर्षीय आनंद गौरव याचा मित्र अशोकचं शनिवारी कॅन्सरमुळे निधन झालं. आनंद आणि अशोक तीस वर्षांपासून मित्र होते. मित्राच्या मृत्यूचा मोठा धक्का आनंदला बसला. हा धक्का तो सहन करू शकला नाही. सुरुवातीला तो खूप रडला. चितेजवळ आला, आणि काही कळण्याच्या आतच त्याने चितेत उडी मारली. या घटनेत आनंद 95 टक्के भाजला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला आहे

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार नवीन संसद भवनाचे उद्घाटन : ऐतिहासिक राजदंड सभापतींच्या आसनाजवळ केला जाणार स्थापित : कसा आहे हा राजदण्ड ? काय आहे त्याचा इतिहास ?

वेध माझा ऑनलाइन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (आज) अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. याबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, नवीन संसद भवन प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं आहे. शुक्रवारी त्यांनी नवीन कॅम्पसचा व्हिडिओही शेअर केला होता. आज सकाळी सूर्योदयानंतर नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू होईल.

पंतप्रधान मोदी सकाळी 7:15 वाजता येथे पोहोचतील, त्यानंतर सकाळी 7:30 वाजता हवन पूजन सुरू होईल, जे सुमारे एक तास चालेल. त्यानंतर सर्व मान्यवर लोकसभेच्या चेंबरकडे जातील, जिथे ऐतिहासिक राजदंड सेंगोल सभापतींच्या आसनाजवळ स्थापित केला जाईल. 

तामिळनाडूशी संबंधित चांदी आणि सोन्याचा मुलामा असलेला हा औपचारिक राजदंड ऑगस्ट 1947 मध्ये पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून देण्यात आला होता. जो नंतर अलाहाबाद संग्रहालयाच्या नेहरू गॅलरीत ठेवण्यात आला होता.

"आपले- कराड' ग्रुपच्या माध्यमातून झटपट सुटू लागले कराडातील सामाजिक प्रश्न ; "आपले - कराड' चे सर्वत्र होऊ लागलंय कौतुक ;

वेध माझा ऑनलाइन । सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांनी "आपले कराड' हा कराड शहर व परिसरात सामाजिक कार्य करणारा अग्रेसर व्हाट्स अप ग्रुप तयार केला आहे या ग्रुपमध्ये सामाजिक कार्याची जाण आणि भान असणारे जागृत लोक सामील आहेत या ग्रुपच्या माध्यमातून शहर व परिसरातील अनेक प्रश्न आजपर्यंत सुटले आहेत केवळ काही महिन्यांपूर्वी फॉर्म झालेला हा ग्रुप अल्पावधीतच कराडकरांसाठी आता जणू गरजेचा बनला आहे 

आज सायंकाळच्या दरम्यान येथील घाटावरील स्वछतागृहमध्ये स्वछता नसते असा मेसेज या ग्रुपवर एका सुज्ञ नागरिकाने फोटोसाहित  टाकला त्याचवेळी... कळवले आहे... असा मेसेज एडमीन चव्हाण यांनी ग्रुपवर टाकला... आणि मोजून तासाभराच्या अंतराने त्या स्वछतागृहमध्ये असणारी सर्व घाण स्वच्छ करून त्यामधील चोक-अप काढले गेल्याचे नगरपालिका मुकादम श्री मारुती काटरे व त्यांच्या सर्व टीमने लग्गेच कळविले... एडमिन चव्हाण यांनी त्यांचे आभारही मानले...

थोडक्यात , कोणतेही काम असो... इतक्या पटकन लोकांच्या कोणत्याही तक्रारीला या ग्रुपच्या माध्यमातून रिझल्ट आता मिळू लागला आहे... हे या ग्रुपचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल... वीज पाणी रस्ते यासह शहर व परिसरातील कोणतेही आणि कसलेही सामाजिक प्रश्न सुटण्यासाठी शहरातील लोकांसाठी "मसीहा' म्हणून काम करणारा हा सामाजिक ग्रुप बनला आहे... अशी नागरिकांची भावना आहे...या ग्रुपच्या मार्फत असे अनेक प्रश्न यापूर्वी सुटले आहेत यापुढे देखील नक्कीच सुटतील...आणि कराडकर नागरिकांना याची खात्रीही आहे... यामुळेच  आपले कराड ग्रुपचे सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे...

लोकसभेसाठी शिंदे गटाला हव्यात 22 जागा ; इतक्या जागा कशा द्यायच्या ? भाजप मध्ये कुजबुज ! जागा वाटपावरून शिंदे गट व भाजपमध्ये पडली ठिणगी ?

वेध माझा ऑनलाइन ।  आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने राज्यातील ४८ पैकी २२ जागांवर दावा सांगितला आहे. लोकसभेच्या २२ जागा या आमच्याच आहेत, त्यामुळे या जागांवर वेगळा दावा करायचा प्रश्नच येत नाही, असे शिंदे गटाच्या खासदारांचे म्हणणे आहे.    
२०१९ साली शिवसेना आणि भाजप एकत्र असताना जागावाटप  झाले तेव्हा आम्ही २३ तर भाजपने २५ जागा लढवल्या. यापैकी २३ जागांवर भाजपचे आणि १८ जागांवर आमचे खासदार निवडून आले. आगामी लोकसभा निवडणुकीत हेच सूत्र राहील, असा दावाही खासदार कीर्तिकर यांनी केला आहे. तर गटाचे दुसरे खासदार राहुल शेवाळे यांनीही तसे संकेत दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच शिंदे गटाच्या खासदारांची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतरच शिंदे गटाला २२ जागा हव्या आहेत, हा मुद्दा समोर आला. दरम्यान इतक्या जागा शिंदे गटाला कशा द्यायच्या... या मुद्यावरून भाजपमध्ये कुजबुज सुरू असल्याचे वृत्त आहे

कीर्तिकर यांची नाराजी.  
भाजपकडून शिंदे गटाच्या १३ खासदारांना सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप खा. कीर्तिकर यांनी केला. आमचा शिवसेना पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक आहे. त्यामुळे एनडीएचा घटकपक्ष असल्याप्रमाणेच आमची कामे झाली पाहिजेत. पण भाजपकडून खासदारांना सापत्न वागणूक मिळते, असा आरोप कीर्तिकर यांनी केला आहे. हा मुद्दा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मांडल्याचेही ते म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले...
युतीत कोणतीही अडचण नाही. आम्ही समन्वयाने काम करत आहोत. शिवसेना-भाजप युतीत समन्वयाने संपूर्ण काम होईल, सर्व बाबी ठरल्यानंतर सांगितल्या जातील. 

Friday, May 26, 2023

कराडचे आजी माजी डिवायएसपी पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीला ;

वेध माझा ऑनलाइन । कराड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी नियुक्त झालेले श्री. अमोल ठाकूर यांनी व आधीचे डि.वाय.एस.पीं. डॉ रणजित पाटील या दोघांनीही आज कराड दक्षिणचे आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी नवनियुक्त डि.वाय.एस.पीं.चे स्वागत केले. तसेच मावळते डि.वाय.एस.पीं. डॉ रणजित पाटील यांनी कराड विभागात आजपर्यंत केलेल्या कामाचे कौतुक करीत त्यांना धन्यवाद दिले
आजी माजी डि.वाय.एस.पीं.यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन कराड तालुक्यातील परिस्थिती बाबत चर्चा केली. यावेळी नवीन डि.वाय.एस.पीं.ना सहकार्य कायमच राहील असे आ. चव्हाण यांनी आश्वासित केले.

नाना पटोले यांना पदावरुन हटवा ; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाची हायकमांडकडे मागणी ; महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर;

वेध माझा ऑनलाइन । महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात अजूनही पक्षातील नेत्यांमध्ये खदखद कायम आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने पुन्हा एकदा दिल्लीत जाऊन हायकमांडची भेट घेतली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस  वाचवायची असेल तर नाना पटोले यांना पदावरुन हटवा अशी मागणी या नेत्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे. तर काँग्रेस कार्यसमितीची येत्या 8-10 दिवसांत रचना करण्यात येणार आहे. यानंतर महाराष्ट्रात ‘ऑपरेशन’ करण्याचे संकेत दिल्लीतील बड्या नेत्याने दिल्याचे समजते.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवर सुनील केदार शिवाजीराव मोघे आणि संजय निरुपम या नेत्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. मात्र सोनिया गांधी यांची भेट झाली नसल्याचे समजते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधिमंडळातील पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यासारखे बरेच नेते अलिप्त असल्यासारखे आहेत. या नेत्यांनाही सक्रिय केल्यास पक्षाला त्याचा लाभ होईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, नाना पटोले यांच्यासंदर्भात हायकमांडकडे तक्रार करण्याची काँग्रेस नेत्यांची ही पहिलीच वेळ नाही. तर या आधीही महाराष्ट्रातील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी नाना पटोले यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आहे. त्यांनी पटोले यांना हटवण्याची मागणी केली आहे.

आशिष देशमुख यांनी देखील नाना पटोले यांच्यावर आरोप केले होते.त्यानंतर देशमुख यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली. पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्यात यावं
अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसमधून जोर धरु लागली आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

रविवारी पाटण तालुक्यात अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा ;

वेध माझा ऑनलाइन।  राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पाटण मतदारसंघातील गुढे- तळमावले येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रविवार दि. २८ मे रोजी सकाळी १० वाजता हा मेळावा पार पडणार आहे. यावेळी विधानपरिषद माजी सभापती आ. रामराजे नाईक- निंबाळकर, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे . प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, या मेळाव्याला खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, सातारा जिल्हा मध्य. सह. बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, आ. दिपक चव्हाण, दिपक पवार, प्रभाकर देशमुख, सारंग पाटील, राजेश पाटील आदी मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते कुंभारगाव- ढेबेवाडी विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन समारंभ आयोजित केला आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी, सर्व आजी – माजी जि. प. व पं. स. सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व संस्थाचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही राजाभाऊ शेलार यांनी या पत्रकाद्वारे केले आहे

शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी ; शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचा भाजपवर थेट आरोप ; काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन। नुकतीच शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक दिली जात आहे असा थेट आरोप शिंदे गटाचे खासदार आणि जेष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. .

प्रसामाध्यमांशी बोलताना गजानन कीर्तिकर म्हणाले , आम्ही सर्व खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. आम्ही जे 13 खासदार आहोत ते आम्ही एनडीएचे घटक आहोत. यापूर्वी आम्ही एनडीएचा घटक पक्ष नव्हतो. पण आता आम्ही एनडीएचे घटक आहोत. त्यामुळे त्या पद्धतीने आमची कामे झाली पाहिजे. घटक पक्षाला दर्जा दिला पाहिजे. पण भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळते असं आमचं म्हणणं आहे, असा आरोप गजानन कीर्तिकर यांनी केला आहे.
2019 ला आम्ही शिवसेना भाजप एकत्र लढलो. तेव्हा भाजपने 26 जागा घेतल्या होत्या. त्यावेळी भाजपचे तीन उमेदवार पडले. शिवसेनेच्या 22 जागा होत्या. त्यावेळी आमचे 18 खासदार निवडून आले होते. त्यातील चार उमेदवार पडले. त्यामुळे आम्ही 22 जागा लढवणार आहोत. असंही कीर्तिकर म्हणाले

राहुल गांधींना दिलासा ; न्यायालयाने नवीन पासपोर्टसाठी दिली परवानगी ; काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन। खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधी यांनी आपला राजकीय कारणासाठी असलेला पासपोर्ट जमा केला होता. नवा पासपोर्ट मिळावा, यासाठी त्यांनी न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्यावर दिल्लीच्या न्यायालयाने त्यांना नवीन पासपोर्ट देण्याची परवानगी दिली आहे, याबाबतचा आदेश न्यायालयाने दिला आहे.हा पासपोर्ट तीन वर्षांसाठी असेल, असे न्यायालयानं म्हटलं आहे. दहा वर्षासाठी पासपोर्ट मिळाला अशी मागणी राहुल गांधींनी न्यायालयाकडे केली होती.

राज्यसभेचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधी यांच्या अर्जाला विरोध केला. दहा वर्षांसाठी पासपोर्ट देणे कुठल्याही कारणासाठी योग्य नसल्याने सुब्रमण्यम यांनी म्हटले होते.राहुल गांधी हे नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात आरोपी आहेत. त्यामुळे त्यांना फक्त एका वर्षासाठी पासपोर्ट देण्यात यावा, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात सांगितले. त्याला राहुल गांधी यांच्या वकिलाने विरोध केला. या प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी यांना २६ मे पर्यंत बाजू मांडण्यास सांगितले होते. त्यानंतर यावर आज सुनावणी झाली

Thursday, May 25, 2023

पुस्तकांच्या बागेत सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेचे आयोजन ; माजी नगरसेवक सौरभ पाटील यांची माहिती ;


वेध माझा ऑनलाइन । मुलांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी कराडच्या यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये पुस्तकांची बाग हा उपक्रम स्वर्गीय यशवंतराव चव्हाण वाचन चळवळीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून येत्या शनिवार 27 व रविवार 28 रोजी सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती माजी नगरसेवक सौरभ पाटील यांनी दिली आहे

उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत मुलांसाठी यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनच्या एका कोपऱयात पुस्तकांची बाग सुरू करण्यात आली आहे. मुलामुलींनी सकाळी 8 ते 10 यावेळेत येऊन ग्रंथालयात ओळखपत्र जमा करावे. तेथून पुस्तक घ्यावे आणि बागेत वाचावे, अशी या उपक्रमाची संकल्पना आहे. या उपक्रमास मुलामुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत शनिवार 27 व रविवार 28 मे रोजी सकाळी 8.30 ते 10 यावेळेत मोफत सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. अक्षरगुरू राहुल पुरोहित हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेसाठी येताना रायटींग पॅड, जेल पेन, चार रेघी वही, एक रेघी वही आणावी, असे आवाहन सौरभ पाटील यांनी केले आहे.

सातारा जिल्हा म. न. वि. से.च्या वतीने कराडच्या एस टी आगार प्रमुखांना विविध मागण्यांचे निवेदन ; वेळेत मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईलने करणार आंदोलन ; जिल्हाध्यक्ष विनायक भोसले यांचा इशारा ;

वेध माझा ऑनलाइन। सातारा जिल्हा मनवीसेच्या वतीने कराडच्या एस टी आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे त्यामध्ये  महिलांना एस टी स्वछता गृह वापरासाठी होत असलेली 5 रुपये आकारणी रद्द व्हावी तसेच विद्यार्थ्यांसाठी एस टी बसेसच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल कराड एस टी आगाराने संबंधित तालुक्यातील विभागासाठी बसेसची त्वरित सुविधा सुरू करावी आणि नागरिकांना व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था त्याठिकाणी त्वरित करावी या प्रमुख मागण्या जिल्हाध्यक्ष विनायक भोसले यांनी निवेदनातून केल्या आहेत
निवेदनात म्हटले आहे की, कराड पाटण तालुक्यातील विद्यार्थ्यांना एस टी बसेसच्या होणाऱ्या गैर सोयीमुळे येण्या जाण्यासाठी बराच वेळ वाट पाहत बसावे लागते रविवारी तालुक्यातील अनेक ठिकाणचे विदयार्थी क्लासच्या निमित्ताने कराड येथे येत असतात त्यांना देखिल तासन्तास बसची वाट पाहत ताटकळत थांबावे लागते तालुक्यातील मसूर भागातील अनेक विद्यार्थी कराडात शिक्षणासाठी येत असतात त्याठिकाणी देखील बसेस फेऱ्यांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून आलेली बस मिळवण्यासाठी पळापळ करावी लागते या एकूणच परिस्थितीचा विचार करून संबंधित आगर प्रमुखांनी याबाबतीत त्वरित उपाययोजना कराव्यात प्रवासी नागरिक व विद्यार्थी याना त्याठिकाणी बसण्यासाठी  बाकडी उपलब्ध करून द्यावीत 
कराडच्या एस टी आगार मध्ये महिलांसाठी असणाऱ्या स्वच्छता गृहाच्या वापरासाठी 5 रुपये आकारणी केली जात आहे ती त्वरित बंद झाली पाहिजे या सर्व मागण्यांचे निवेदन मनविसेचे सातारा जिल्हाध्यक्ष विनायक भोसले यांनी नुकतेच कराड आगर प्रमुखांना दिले आहे वेळेत कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा देखील या निवेदनातून देण्यात आला आहे

शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांचा अचानक साताऱ्यात रास्ता रोको ; पोलिसांची धावपळ; ; कराडात पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते... साताऱ्यातून वाहनाने मुंबईला जाताना वाहनांच्या प्रचंड ताफ्याने भर रस्त्यात होणार कोंडी ; सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खोतांचे प्रयत्न सुरू ?

वेध माझा ऑनलाइन। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली निघालेली कऱ्हाड ते सातारा ‘वारी शेतकऱ्यांची’ पदयात्राचे आज साताऱ्यात आगमन झाले. तत्पूर्वी शिवराज चौकात या पद यात्रेच्या वतीने यावेळी रास्ता रोको करण्यात आले.

त्यानंतर पदयात्रा बॉम्बे चौकातून शहरातील पोवई नाका येथे आली. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. आज ही यात्रा साताऱ्यात दाखल झाली. तत्पूर्वी खिंडवाडी ते शिवराज पेट्रोलपंपाच्या दरम्यान, यात्रा आल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी महामार्गावरच ठिय्या मारला. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडली. 
दरम्यान या पदयात्रेविषयी माहिती देताना खोत कराडात पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की आम्ही सुरुवातीला सातारला चालत जाऊ... तोपर्यंत आमची दखल घेतली तर ठीक... नाहीतर... वाहनाने पुढे मुंबईला आम्ही जाणार आहोत... व सरकारचे लक्ष वेधणार आहोत... याचाच अर्थ या आंदोलकांच्या वाहनांच्या ताफ्याने इतर वाहतूक व नियमित रस्त्यावरील दळणवळण याला यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो... त्यानिमित्ताने आमच्याकडे सरकारचे लक्ष जाईल असा त्यांच्या बोलण्याचा आशय होता... आणि त्याच मार्गाची सुरुवात करताना आता ते दिसत आहेत... त्याचाच भाग म्हणून त्यांनी अचानक रस्त्यातच आपला ठिया मांडून पोलीसांची तारांबळ उडवली?... दरम्यान, यावेळी खोत म्हणाले, या तीन दिवसात सरकार आमच्या मागण्याकडे लक्ष देईल अशी आशा आहे. नाही तर आम्ही वाहनांने मुंबईला मंत्रालयावर धडक मारणार आहोत.

बारावीचा निकाल जाहीर ; गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा निकालात २.९७ टक्के झाली घट ; काय आहे कारण?

वेध माझा ऑनलाइन। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. राज्य मंडळाने जाहीर केलेल्या निकालानुसार यंदा बारावीचा ९१. २५ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा निकालात २.९७ टक्के घट झाली आहे. म्हणजेच,यंदा निकालात घट झाली आहेत. मात्र त्यामागचं कारणही मंडळाने दिलं आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले की, यंदा निकाल २.९७ टक्क्यांनी घटला आहे. कारण, मागील परीक्षा वेगळ्या वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांना ७०, ८० आणि १०० गुणांसाठी वाढीव वेळ देण्यात आला होता. ७५ टक्के अभ्यासक्रमांवर परीक्षा घेण्यात आली होती. परंतु, यंदा १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात आली. कोणताही वाढीव वेळ देण्यात आला नाही.

२०२३ मध्ये ज्याप्रमाणे नियमित परीक्षा झाली तशी परिक्षा २०२० मध्ये घेण्यात आली होती. २०२० मध्ये ९०.६६ टक्के निकाल लागला होता. तर, २०२३ मध्ये ९१.२५ टक्के निकाल लागला आहे. म्हणजेच ०.६९ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असंही ते पुढे म्हणाले.

 यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली. ३ हजार १९५ मुख्य केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी १४ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली होती. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.१ टक्के, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी ८८.१३ टक्के लागला. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४.५९ टक्क्यांन अधिक आहे.


Wednesday, May 24, 2023

...तर गंभीर परिणाम होतील ; रशियाने दिली भारताला धमकी ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन। युक्रेन युद्धामुळे जगात टीकेचा धनी बनलेला रशिया आता भारतावर एफएटीएफला सहकार्यसाठी दबाव बनवत आहे. जर भारतानेरशियाला FATF च्या ब्लॅक लिस्ट अथवा ग्रे लिस्टमध्ये समावेश करण्यापासून वाचवले नाही तर तो भारतासोबत संरक्षण आणि ऊर्जा करार संपुष्टात आणेल असा इशारा दिला आहे. ब्लूमबर्ग रिपोर्टने हा दावा केला आहे. 


FATF (फायनान्शियल एक्शन टास्क फोर्स) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी आंतरराष्ट्रीय आर्थिक गुन्हे रोखण्याचा प्रयत्न करते. FATF च्या काळ्या किंवा ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या देशावर देखरेख वाढवली जाते आणि त्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत बंद केली जाते. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार पडद्यामागे रशिया भारतासह ग्लोबल साउथच्या अनेक देशांना FATF यादीतून वाचवण्यासाठी दबाव आणत आहे. फायनान्शिअल एक्शन टास्क फोर्सने युक्रेनसोबतच्या युद्धामुळे जूनमध्ये रशियाचा काळ्या यादीत समावेश करण्याची शक्यता आहे. रशिया स्वत:ला आर्थिकदृष्ट्या वाचवण्यासाठी भारतासोबतचा संरक्षण आणि ऊर्जा करार रद्द करण्याची धमकी देत आहे. 

FATF ने फेब्रुवारी २०२३ ला रशियाची सदस्यता रद्द केली आहे. एफएटीएफने सांगितले की, यूक्रेनसोबत रशियाचे जे युद्ध सुरू आहे ते FATF च्या मूलभूत सिद्धांताविरोधात आहे. रशियाची कारवाई यूक्रेनला उकसवण्याची आहे. त्यामुळे सदस्यता रद्द केल्यानंतर आता FATF रशियाला ब्लॅक अथवा ग्रे यादीत समावेश करण्याची शक्यता आहे. 

रशियाचा इशारा
रिपोर्टनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला एका रशिया स्टेट एजेन्सीने भारताला इशारा दिला की, एफएटीएफने रशियाला ब्लॅक अथवा ग्रे लिस्टमध्ये टाकलं तर ऊर्जा, संरक्षण आणि ट्रान्सपोर्टेशन क्षेत्रावर त्याचे गंभीर परिणाम होतील. हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील मुद्दा आहे. रशियाने या प्रस्तावाला भारताने विरोध करावा असा आग्रह धरला आहे. रशियाचा या यादीत समावेश झाला तर भारतालाही अडचणींचा सामना करावा लागेल. अद्याप या प्रकरणी कुठल्याही देशाने अधिकृत विधान केले नाही. 

भारतावर काय होईल परिणाम?
यूक्रेन युद्धामुळे अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी रशियावर प्रतिबंध लावले आहेत. त्यामुळे रशियाला अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी चीन, भारत, तैवानसारख्या देशांशी संबंध चांगले ठेवण्याची आवश्यकता आहे. जर रशियाला एफएटीएफने ब्लॅक लिस्ट केले तर या देशांशी रशियाला व्यापार करणे कठीण होईल आणि त्याचा फटका अर्थव्यवस्थेवर होईल. तेल कंपनी रोजनेफ्ट आणि नायरा एनर्जी लि. यांच्यातील द्विपक्षीय करारावर परिणाम होईल. रशियन शस्त्रे, सैन्य उपकरणे निर्यातीसह संरक्षण खात्यातील तंत्रज्ञान सहकार्यावर परिणाम होऊ शकतो. 



आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी ;

वेध माझा ऑनलाइन । महाराष्ट्र काँग्रेस मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसने विदर्भातील माजी आमदार आशिष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसने त्यांना ६ वर्षांसाठी निलंबन केलं आहे. पक्षाची शिस्त मोडल्याचा ठपका ठेवून आशिष देशमुख यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

आशिष देशमुख यांनी यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधातील विधाने केली होती. त्याच पार्श्वभूमीवर ५ एप्रिल रोजी काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने त्यांना एक नोटीस पाठवली होती. यानंतर देशमुख यांनी ९ एप्रिल रोजी उत्तर दिलं. पण हे उत्तर समाधानकारक नसल्याने त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांचे याबाबतचे पत्र समोर आलं आहे.

उद्याच लागणार बारावीचा निकाल ! ; आत्ताची मोठी बातमी...

वेध माझा ऑनलाइन । देशातील CBSE आणि ICSE बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य बोर्डाचा निकाल कधी जाहीर होतो याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं होतं. आपली मुलं चांगल्या मार्कांनी पास होतील का? याचं टेन्शन पालकांना आलं आहे. मात्र आता स्टेट बोर्डाचा निकाल नक्की कधी लागणार याबाबत सर्वत मोठी अपडेट समोर आली आहे. उद्या म्हणजेच 25 मे 2023 रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.

राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावीचा 25 मेला जाहीर होणार आहे. यंदा 13 लाखांहून अधिक विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या HSC ला बसले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावीचा निकाल अधिकृत संकेतस्थळ mahresults.nic.in वर जाहीर करणार असल्याची माहिती मिळाली आहे.



Tuesday, May 23, 2023

कोल्हापुरात अग्नितांडव ; दुकाने जळून खाक ;


वेध माझा ऑनलाइन। 
कोल्हापूरमध्ये आगीची मोठी घटना घडली आहे. शहरातील शिवाजी रोड परिसरातील दुकानाला भीषण आग लागली आहे. एका दुकानाला आग लागल्यानंतर शेजारी असलेले आणखी दुकानं आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरातील शिवाजी रोड परिसरातील आज दुपारी दुकानांना आग लागली. एका दुकानाला आग लागली आणि बघता बघता शेजारी असलेल्या इतर दुकानांमध्येही आग पसरत गेली.

शिंदे-फडणवीस' सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला ; शिंदे गटाच्या मंत्र्यांची यादी तयार ; याच महिन्यात होणार विस्तार ; वाचा बातमी....


वेध माझा ऑनलाइन। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार याच महिन्याच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार याच महिन्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यांची यादी तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपकडून हिरवा कंदील येताच मंत्रिमंडळ विस्तार या महिन्यात होण्याची शक्यता आहे. या महिन्यामध्ये दोन अलर्ट प्रोटोकॉल विभागाला देण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारातील अडचणी दूर झाल्या आहेत, जे मंत्रिपद मिळेल त्याला पूर्ण न्याय देऊ, असं शिवसेना नेते भरत गोगावले म्हणाले आहेत. तर मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत, म्हणजे होईल. माझं नाव दरवेळी चर्चेत असतं, असं सूचक विधान संजय शिरसाठ यांनी केलं आहे.


कृष्णा कारखान्यात ऊसतोडणी वाहतूक करारास प्रारंभ...

वेध माझा ऑनलाइन । यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 या गळीत हंगामाकरिता ऊसतोडणी वाहतूक करारांचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी संचालक जितेंद्र पाटील, बाजीराव निकम, दीपक पाटील, जे.डी. मोरे, बाबासो शिंदे, वसंतराव शिंदे, विलास भंडारे, अविनाश खरात, एझिक्युटिव्ह डायरेक्टर सी.एन देशपांडे,  कार्यकारी संचालक राम पाटील, वैभव जाखले, सेक्रेटरी मुकेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी चेअरमन डॉ.सुरेश भोसले म्हणाले, गेल्या सात ते आठ गळीत हंगामात सर्व ऊसतोडणी वाहतूकदार, कंत्राटदार यांच्या सहकार्यामुळे हंगाम यशस्वी पार पाडू शकलो. तसेच ऊसतोडणी वाहतूक यंत्रणेची येणेबाकी शून्य रुपये आहे.  कृष्णा कारखान्याने साखर कारखानदारीत हा एक आदर्श निर्माण केला आहे. ऊस वाहतुकदारांना चांगली दरवाढ देण्यात येणार आहे.

कारखान्याच्या शेती आणि उसविकास विभागांचे काम उत्कृष्टपणे सुरू आहे. साखर कारखान्याच्या कामकाजात ऊस उत्पादक, ऊस पुरवठा करणारे वाहतूकदार व कामगार हे तीन महत्वाचे घटक असतात. हे घटक चांगले चालले तरच साखर कारखाना चांगला चालतो. ऊस वाहतूकदारांनी चांगला व्यवसाय करून कारखान्याच्या कामकाजात मदत करावी असे आवाहन डॉ.भोसले यांनी केले. यावेळी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी.एन देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.


प्रारंभी कार्यकारी संचालक राम पाटील यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सेक्रेटरी मुकेश पवार यांनी केले. यावेळी मुख्य शेती अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, कार्यालयीन अधिक्षक निलेश देशमुख, लेबर अँड वेल्फेअर ऑफिसर अरुण पाटील, सहाय्यक शेती अधिकारी अजय दुपटे, सहाय्यक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर, केनयार्ड सुपरवायझर विजय मोहिते आदीसह ऊसतोडणी वाहतूकदार व कंत्राटदार, गट अधिकारी, शेतकी कर्मचारी उपस्थित होते. संचालक जितेंद्र पाटील यांनी आभार मानले.

महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून टक्केवारी घेऊन मोठा भ्रष्टाचार ; संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा ;...अन्यथा 5 जूनपासून आमरण उपोषण; सामाजिक कार्यकर्ते रुपेश मुळे, हिंदुराव पिसाळ यांचा पत्रकार परिषदेत इशारा


वेध माझा ऑनलाईन । महावितरणचे विद्यमान अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांनी त्यांच्या कार्यकाळात 54 कोटी रुपयांपेक्षा जास्त बिल काढली आहेत. तसेच त्यांच्या संगनमताने सर्व विभागीय अधिकाऱ्यांनीही मोठी टक्केवारी घेऊन जास्तीची बिले काढून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलेला आहे. संबंधित सर्व दोषी अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा, येत्या ५ जूनपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते हिंदुराव पिसाळ व रुपेश मुळे यांनी दिला.

कराडच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी महेश डांगे, ऋषिकेश पिसाळ यांची उपस्थिती होती. ते म्हणाले, सातारा महावितरणचे विद्यमान अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांनी त्यांच्या कार्यकाळात 54 कोटी पेक्षा जास्त बिले काढली आहेत. या बिलामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. तसेच त्यांच्या संगनमताने जिल्ह्यातील सर्व विभागीय अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेऊन जास्तीची बिले काढून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे.या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवांनी बारामती उच्चदाब वितरण प्रणाली विभागाचे मुख्य अभियंता प्रकाशगड यांना सदर प्रकरण तपासून चौकशी करून सत्यता पडताळावी व त्या अनुषंगाने अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत. परंतु, प्रकाशगड यांनी कोणतीही चौकशी केली नाही व कोणताही अहवाल पाठवला नाही.
मे. विक्रान इंजीनियरिंग अँड एक्झिम प्रा.लि.ठाणे या कंपनीला १८० कोटी रुपयांचे सातारा जिल्ह्यातील शेतीपंपाची नवीन विज जोडणी कनेक्शनचे टेंडर मंजूर केले आहे. या टेंडरची मूळ किंमत १८० कोटी रुपये असले तरी त्याचे अंतिम टेंडर किंमत 130 कोटी इतकी आहे. या कंपनीला 2018 सालामध्ये टेंडर मिळाले होते. आत्तापर्यंत या कंपनीला या कामाच्या बिलापोटी ११० कोटी रुपयांचा परतावा मिळाला आहे. या कंपनीने जिल्ह्यात केलेल्या कामांची माहिती व बिले महावितरणकडून मिळवली असता जिल्ह्यातील विविध विभागात वेगवेगळ्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार झाला असून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही न्यायालयीन व रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज झालो आहोत. जिल्ह्यात झालेल्या या कामांची पाहणी केली असता कोण-कोणत्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. याचा लेखाजोखा यावेळी हिंदुराव पिसाळ व रुपेश मुळे यांनी मांडला.
ते म्हणाले, डीपीला एक लाख रुपये खर्च येतो. प्रत्यक्षात साइटवर तेवढे मटेरियल नाही. तसेच कमी मटेरियल वापरून प्रत्येक पोलमागे संबंधित अधिकाऱ्यांनी हजारो रुपये खाल्ले आहेत. मीटर बॉक्सला लागणारी केबल ही पाच हजार कनेक्शन नुसार 50 हजार मीटर केबल वापरणे आवश्यक आहे.प्रत्यक्षात ३०हजार मीटर सुद्धा केबल साइटवर दिसत नाही. जिल्ह्यातील काही भागात मेन लाईन व डीपी बसवला आहे आणि त्याची बिले काढून नंतर ती पूर्ण लाईन व पोल काढून नेण्यात आले आहेत. काही ठिकाणी सिमेंट पोल उभे करून बिलामध्ये लोखंडी पोलची बिले काढली आहेत. जिल्ह्यात पाच हजार कनेक्शन मागे दोन हजार एबी स्विच लावणे बंधनकारक आहे त्यानुसार प्रत्यक्ष पाहणी केली असता 1 हजार एबी स्वीट पण साइटवर नाहीत त्याची अंदाजे दीड कोटी रुपयांची बोगस बिले महावितरण ने संबंधित ठेकेदाराला टक्केवारी घेऊन दिली आहेत. साइटवर मीटर बॉक्स निकृष्ट दर्जाचे वापरले आहेत. या सर्व बाबी माहिती अधिकारातून व प्रत्यक्ष साइटवर भेट दिल्यानंतर कोट्यावधी रुपयांचा यामागे भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहेत. मे विक्रान इंजीनियरिंग अँड एक्झिम प्रा. लि. ठाणे या कंपनीने सातारा जिल्ह्यात केलेल्या कामात मोठ्या प्रमाणावर घोटाळा केला आहे. या कंपनीला काळ्या यादीमध्ये टाकावे तसेच जिल्ह्यातील सर्व कनेक्शनची सखोल चौकशी करून संबंधित सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा येत्या ५ जून रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा हिंदुराव पिसाळ व रुपेश मुळे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिला.

कराडात 24 तास पाणी योजनेच्या नावाखाली सुरू असलेली पाणीपट्टी बिलाची वसुली ताबडतोब थांबवा ; कराडच्या पाणीप्रश्नी मनसे आक्रमक ; जिल्हाधिकारी जयवंशी यांना दिले निवेदन ;

वेध माझा ऑनलाइन । कराड शहर मनसेच्या वतीने आज सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना कराडात सुरू असलेल्या अन्यायकारक पाणीपट्टी बिलाच्या वसूली विरोधात निवेदन देण्यात आले सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी कराडातील 24 तास पाणी योजनेच्या नावाखाली होणाऱ्या या बिलाच्या वसूलीसाठी स्थगिती देऊन देखील कराड पालिका या बिलाची वसुली करत असल्याने कराड शहर मनसे आक्रमक झाली असून ताबडतोब या पाणीबिलाची वसुली बंद करावी अन्यथा कराडात मनसेच्या वतीने आंदोलन केले जाईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे

निवेदनात म्हटले आहे की, कराडात दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो तरीही मीटर बसवून 24 तास पाणी देण्याच्या नावाखाली कराड पालिकेची लोकांकडून पैसे वसुली सुरू आहे हे मीटर हवेमुळे आपोआप फिरत आहेत त्यामुळे बिले भरमसाठ येत आहेत या 24 तास पाणी योजनेसाठी पालिकेने पैशाची भरमसाठ उधळण केली आहे तरीही ही योजना शहरात सुरू नाही असे असताना देखील ही बिल वसुली अन्यायकारक आहे या पाणीबिलाच्या विरोधात काही महिन्यांपूर्वी मनसेने कराडात आवाज उठवला होता अनेक राजकीय सामाजिक संघटनांनी देखील या विषयाला विरोध केला होता  सातारा जिल्हाधिकारी यांनी त्यावेळी कराडातील या पाणीबिलाच्या वसुलीला स्थगिती दिली हाती तरीही सध्या पालिकेकडून ही अवाजवी व अन्यायकारक वसुली होताना दिसत आहे  जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा हा अपमान आहे लवकरात लवकर ही वसुली थांबवण्यात यावी अन्यथा कराड शहरात मनसेच्या वतीने आंदोलन छेडेले जाईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे 
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष ऍड विकास पवार शहर अध्यक्ष सागर बर्गे तसेच पैलवान सतीश यादव नितीन महाडिक आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली ; रुग्णालयात दाखल ;

वेध माझा ऑनलाइन । राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह रुग्णालयात पोहोचले आहेत.

मनोहर जोशी यांना सोमवारी रात्री अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत.
मनोहर जोशी यांचं वय 86 वर्षे इतकं असून शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मुंबईचे महापौरपदही त्यांनी 1976 ते 1977 या काळात भूषवलं होतं. तर शिवसेना भाजप युतीच्या सरकारमध्ये ते मुख्यमंत्री बनले होते.


५८ वर्षीय सासूने दिला बाळाला जन्म; विधवा सुनेची यायालयात धाव ; वेगळी बातमी...

वेध माझा ऑनलाइन । आग्रा येथील कुटुंब न्यायालयात रविवारी वेगळच प्रकरण समोर आलं. ५८ वर्षांच्या सासूबाईने मुलाला जन्म दिला. त्यामुळे, त्यांच्या विधवा सुनेनं गोंधळ घातला. सासू-सासऱ्यांकडून आपणास संपत्तीत वाटा न देण्यासाठीच मुलाला जन्म घालण्यात आल्याचा आरोप विधवा सुनेनं केला आहे. काऊंसलिंगद्वारे हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न येथील न्यायालयात करण्यात आला. मात्र, सुनेनं घेतलेल्या भूमिकेमुळं हा तिढा कायम राहिला. न्यायालयाने पुढील तारीख देऊ केली आहे.

सैंया निवासी तरुणीने सांगितले की, ४ वर्षांपूर्वी तिचं लग्न कमला नगर ठाणे परिक्षेत्रातील जीम संचालकासोबत झाले होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी तिच्या पतीचे हर्ट अॅटकने निधन झाले. त्यांना मुल-बाळही नव्हते, त्यामुळे पतीच्या निधनानंतर युवती माहेर जाऊन राहू लागली. मृत महिलेचा पती त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे, महिलेने सासू-सासऱ्याच्या संपत्ती हिस्सा मागितला. त्यावर, सासू-सासऱ्यांना संपत्तीतील वाटा देण्यास नकार दिला. त्यामुळे, हे प्रकरण कुटुंब न्यायालयात पोहोचले. रविवारी दोन्ही पक्षांना न्यायालयाने काऊंसलिंगसाठी बोलावले होते. मात्र, अद्याप मार्ग निघाला नाही. 

दरम्यान, विधवा युवतीने आरोप लावला आहे की, मी सासू-सासऱ्यांकडे पतीच्या संपत्तीचा हिस्सा मागितला होता. मात्र, त्यांनी देण्यास नकार दिला. शिवाय, ५ महिन्यांपूर्वी माझ्या ५८ वर्षीय सासूबाईंनी बाळाला जन्म दिला. सासू-सासऱ्यांनी या वयातही नवीन वारस जन्माला घातला. कारण, त्यांना सगळी संपत्ती ही त्यांच्या या मुलाच्या नावे करायची आहे, असा आरोप विधवा सुनेनं केला आहे. तर, मुलीच्या सासऱ्याने आपली बाजू मांडताना सांगितले की, आम्ही सुनेला गावात राहण्याचे सूचवले. पण, ती गावात राहत नसून माहेरी गेली. तर, गावाकडे घर बांधलेलं नाही, जेव्हा घर बांधतील तेव्हा मी तेथे राहायला जाईन, असे विधवा सुनेचं म्हणणं आहे. अद्याप याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. 
 



Monday, May 22, 2023

मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांना आलेल्या मेसेजनं खळबळ


वेध माझा ऑनलाइन। मी बॉम्बस्फोट करणार आहे... मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा निनावी धमकी मिळाली आहे. पण यंदा फोन किंवा ईमेलवरुन  नाहीतर थेट ट्विटरवरुन धमकी मिळाली आहे. पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी तपास सुरू केला आहे. तसेच, अधिक चौकशीही सुरू करण्यात आली आहे. 

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पुन्हा एकदा दहशत माजवण्याची धमकी पोलिसांना मिळाली आहे. आतापर्यंत जिथे पोलिसांना फोन आणि ई-मेलच्या माध्यमातून धमक्या मिळत होत्या, तिथे आता एका व्यक्तीनं ट्विटरच्या माध्यमातून मुंबईत दहशत माजवण्याची धमकी दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी (22 मे) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवर "मी लवकरच मुंबईत स्फोट घडवणार आहे" असा मेसेज पाठवला होता. हा मेसेज इंग्रजी भाषेत पाठवण्यात आला होता.  मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीनं मेसेजमध्ये लिहिलं होतं की,  "I M Gonna Blast The Mumbai Very Soon." हा मेसेज गांभीर्यानं घेत मुंबई पोलिसांनी संबंधित खात्याची चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.



ईडी चौकशीनंतर मला अजित पवारांचा फोन आला नाही”, जयंत पाटलांची सूचक प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणायचय जयंत पाटलांना? तर्क-वितर्कांना उधाण

वेध माझा ऑनलाइन । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात नाराजी असल्याच्या चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळतात. त्यावर या दोन्ही नेत्यांकडून नेहमीच प्रतिक्रिया देताना या चर्चा फेटाळण्यात येतात. मात्र, वेळोवेळी त्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे या तर्क-वितर्कांना पुन्हा बळ मिळतं आणि नाराजीच्या चर्चा पुन्हा सुरू होतात. शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केल्यानंतरही या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीच्या निमित्ताने या चर्चांना उधाण आलं आहे.

नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी ईडीकडून तब्बल साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. यावेळी चौकशीच्या नावाखाली त्यांना फक्त बसवून ठेवण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, रात्री बाहेर आल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना जयंत पाटलांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याची प्रतिक्रिया दिली. “ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यांचं पूर्ण समाधान मी केलं असून, त्यांच्याकडं काही प्रश्न राहिले असतील, असं मला वाटत नाही. मी माझं कर्तव्य पार पाडलं”, असं जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटलांची ईडी चौकशी हा राजकीय वर्तुळात चर्चेचा मुद्दा ठरला आहे. त्यांच्या चौकशीबाबत राज्यातील वरीष्ठ नेते मौन असल्याचंही बोललं जात असताना जयंत पाटील यांनी मात्र सर्व नेत्यांचे आपल्याला फोन आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. “कुणाचं एकाचं नाव राहिलं, तर चूक होईल. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख नेत्यांचे फोन आले असं मी सांगितलं. आमच्या वेगवेगळ्या पक्षातील सर्वच मित्रांचे फोन आले. आज सकाळीही फोन आले”, असं जयंत पाटील म्हणाले.

आणि पाटलांनी अजित पवारांचं नाव घेतलं!
एकीकडे जयंत पाटील यांनी “कुणा एका नेत्याचं नाव घेतलं नाही तर चूक होईल, म्हणून सगळ्यांनी फोन केले असं मी सांगतोय” असं म्हणाले. पण दुसरीकडे त्यांनी अजित पवारांचा मात्र स्वतंत्र उल्लेख केला. माध्यमांनी अजित पवारांचा फोन आला होता का? असा प्रश्न केला असता “त्यांचा फोन आलेला नाही”, असं जयंत पाटील यांनी स्पष्टपणे अजित पवारांचं नाव घेत सांगून टाकलं....त्यांना यातून नेमकं काय सुचवायच आहे ? याविषयीच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत.




कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांची बदली ;

वेध माझा ऑनलाईन । कराडचे वरिष्ट पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांची बदली झाली आहे ते कोल्हापुर येथे पोलीस उप- अधीक्षक म्हणून कार्यरत राहणार आहेत 
त्यांना पदोन्नती मिळाली आहे त्यांच्या एकूणच आत्तापर्यंतच्या उठावदार व परिणामकारक कामाची पावती म्हणून त्यांची पदोन्नती झाली आहे त्यांना बढती मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे त्यांच्या जागी कराडला कोण नवीन पोलीस अधिकारी येणार हे अद्याप समजले नाही

Sunday, May 21, 2023

समीर वानखेडेची सीबीआय कडून 5 तास कसून चौकशी ; बाहेर पडताच वानखेडेने उच्चारले दोन शब्द ; वाचा सविस्तर ;

वेध माझा ऑनलाइन । कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला पकडल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले होते. याच प्रकरणात आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडेंनी २५ कोटींची खंडणी शाहरुख खानकडे मागितली होती असा आरोप आहे. त्याच संदर्भात त्यांची सीबीआय चौकशी सुरु झाली आहे. सीबीआय चौकशीचा आजचा दुसरा दिवस होता. शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस पाच तास त्यांची चौकशी करण्यात आली.

समीर वानखेडेंनी उच्चारले फक्त दोन शब्द
सीबीआयची आजची चौकशी संपल्यानंतर समीर वानखेडे प्रतिक्रिया देतील अशी आशा माध्यमांना होती. मात्र समीर वानखेडे बाहेर आले. मीडियाने त्यांना प्रश्न विचारले त्यावर सत्यमेव जयते! एवढेच दोन शब्द उच्चारत समीर वानखेडे तिथून निघून गेले.

Saturday, May 20, 2023

2000 रुपयांच्या नोटांबद्दल माजी प्रधान सचिवांचा मोठा गौप्यस्फोट; काय म्हणाले ? ;

वेध माझा ऑनलाइन ; पंतप्रधान नरेंद्र मोदी 2000 रुपयांची नोट चलनात आणण्याच्या बाजूने नव्हते, परंतु ते त्यांच्या टीमच्या सल्ल्यानुसार गेले', असा गौप्यस्फोट पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी केला आहे. मिश्रा यांनी 2016 मध्ये नोटाबंदीचे निरीक्षण केले होते. 

नृपेंद्र मिश्रा यांनी एका चॅनेल शी बोलताना सांगितले की, 'ही नोटाबंदी नाही तर 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेणे आहे. नोटाबंदीच्या वेळी 2000 रुपयांची नोट चलनात आणण्याची सूचना करण्यात आली होती, जी पंतप्रधानांना आवडली नाही. मात्र, कर्णधार म्हणून आपल्या टीमच्या सल्ल्याने त्यांनी या नोटांना परवानगी दिली. तेव्हा ते अगदी स्पष्ट होते आणि आम्हीही होतो की ही एक अल्पकालीन व्यवस्था असेल.'
यासोबतच ते म्हणाले, 'गरीब आणि मध्यमवर्गीय लोक 2000 रुपयांच्या नोटा वापरत नाहीत, ते 500 आणि 100 रुपयांच्या छोट्या नोटा वापरतात आणि पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, गरीबांना याचा फटका बसू नये अशी त्यांची इच्छा आहे. '

एका माजी नगरसेवकाने फोडला पेपर ; शिक्षण क्षेत्रातील ढिसाळ कारभार चव्हाट्यावर ; शिक्षण क्षेत्रात खळबळ ;

वेध माझा ऑनलाइन। बातमी शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी आहे. राज्यातील पेपर फुटीचं सत्र काही थांबायचं नाव घेताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत चक्क 300 ते 500 रुपयात मासकॉपी करून दिली जात असल्याचा प्रकार समोर आला होता. अशातच आता आणखी एका प्रकरणाने शिक्षण क्षेत्रातील ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत उन्हाळी 2023 परीक्षेत विधी अभ्यासक्रमाच्या लॉ ट्रस्ट विषयाच्या चौथ्या सत्राचा मोबाईलद्वारे व्हाट्‌सअपवर पेपर लीक करण्यात आला. धक्कादायक म्हणजे यात एका भाजपच्या माजी नगरसेवकाचा हात आहे.

याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक प्रणीत सोनी, भूषण किसन हरकुट, किशोर पिंपळकर या तिघांना गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर भाजपचे माजी नगरसेवक प्रणित सोनी यांनीच हा पेपर फोडल्याची धक्कादायक बाब पुढ आली आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत शनिवारी सकाळी 9 ते 12 या दरम्यान विधी अभ्यासक्रमाच्या लॉ ट्रस्ट विषयाचा फोर्थ सेमिस्टरचा पेपर होता. मात्र, पेपर सुरू होण्यापूर्वीच तो मोबाईलवर पोहोचला. तसेच या विषयाच्या झेरॉक्स सुद्धा या तिघांकडे आढळल्याचे बोलले जात आहे. पोलीस याप्रकरणी तपास करीत असून लॉ ट्रस्टचा पेपर लीक झाल्याची माहिती मिळताच अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालक मोनाली तोटे व अमरावती विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य भैय्यासाहेब मेटकर यांनी घटनास्थळी धाव घेत झालेल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली.

Friday, May 19, 2023

शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांचे मोबाईल चॅटिंग आले समोर ; मोठी अपडेट ;

वेध माझा ऑनलाइन । अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या कॉर्डेलिया ड्रग्ज क्रूज प्रकरणी  नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची चौकशी सुरू आहे.  आर्यन खानला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरूख खान आणि त्याच्या कुटुंबियांकडून 25 कोटी रुपये खंडणीची मागमी करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. या संबंधी तपास सुरू असताना समीर वानखेडे यांनी महत्त्वाची दिली आहे. समीर वानखेडे आणि शाहरूख खान यांच्यात अनेकदा बोलणं झाल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे त्यांचे व्हॉट्स अँप चॅट्सचे त्यांनी शेअर केलेत. 

शाहरूख  खाननं समीर वानखेडे यांच्याकडे मुलगा आर्यन खानला सोडवण्यासाठी विनंती केल्याचं चॅटमधून समोर आलं आहे. या चॅटमध्ये शाहरूख खानने समीर वानखेडेंना म्हटलं आहे की, "मी एक बाप आहे आणि तुम्ही देखील बाप आहात. माझा मुलगा चुकला असेल पण त्याला सांभाळून घ्या. याबाबत आपल्याला काय करता येईल ते सगळं आपण करू", अशी विनंती शाहरूखनं केली आहे. एकदा नाही तर शाहरूखनं अनेकदा अशाप्रकारची विनंती समीर वानखेडे यांना केली आहे.
अभिनेता शाहरूख खान हा प्रसिद्ध अभिनेता असला तरी तो एक बाप आहे आणि हाच बाप या चॅटमधून दिसत आहे. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी बापाची धडपड दिसून येत आहे. मुंबई उच्च न्यायालयात शाहरूख आणि समीर वानखेडे याचे चॅट समोर आल्यानंतर  मोठी घडामोड घडली आहे.




















2000 रुपयाच्या नोटा चलनातून बंद होणार, 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार


वेध माझा ऑनलाइन । 2000 रुपयांची नोट आता चलनातून बाद होणार आहे. आरबीआयने याबाबत निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत या नोटांची वैधता असणार आहे.भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने (RBI) बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले असल्याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. 

भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, सध्या बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार आहेत. तोपर्यंत ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी बँकेकडून नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत.

नोटा कधीपासून बदलता येणार?

आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा असलेल्या नागरिकांना बँकांमधून नोटा बदलण्याची सूचना केली आहे. बँकांमध्ये 23 मे पासून ही 2000 रुपयांची नोट बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.

पुतण्याला वाटतय ,की हे म्हातारं आपल्या हातात कारभार देत न्हाई, म्हणून पुतण्या खळखळ करतोया... शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांची अजितदादा पवारांवर टीका ;

वेध माझा ऑनलाइन । अजितदादा पवार व शरद पवार यांचा राजकारणाचा फंडा राज्याला काही नवीन नाही... पुतण्याला वाटलं असावं की आपल्या हातात हे म्हतारं काय कारभार देत न्हाई...म्हणून पुतण्या खळखळ कर्तुया... मग म्हातारं...हातात घुंगराची काठी घेऊन वाजवत... वाजवत येतया...मग त्या काठीच्या घुंगराचा आवाज ऐकून बाकी काही जण म्हणत्यात... म्हाताऱ्याच सगळं ह्यो पुतण्या एकटाच हाणील ...अस सगळं त्यांचं राजकारण चाललया...  अस म्हणत रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी ग्रामीण बाजमध्ये पवार काका-पुतण्यावर टीका केली... त्यावेळी त्याठिकाणी एकच हशा पिकला...

राज्यातील शेतकरी ऊस वाहतूकदार तसेच सरपंच परिषद यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्या 22 मे ला कराड ते सातारा पदयात्रा काढण्यात येणार आहे त्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ... त्यावेळी विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि शरद पवार यांच्या भाजप बद्दलच्या मधल्या काळातल्या भिन्न- भिन्न दिसणाऱ्या भूमिकेविषयी पत्रकारांनी सदाभाऊंना विचारले असता सदभाऊनी आपल्या खास शैलीत काका- पुतण्यावर खरमरीत टीका करत उत्तर दिले...

दरम्यान, काढण्यात येणाऱ्या पडयात्रेविषयी माहिती देताना सदाभाऊ म्हणाले... शेतकरी सध्या खूप अडचणीत आहे त्याच्या व्यथा सरकारने समजून घेतल्या पाहिजेत यासाठी आमचा हा प्रयत्न आहे या पदयात्रेमध्ये ऊस उत्पादक काजू उत्पादक द्राक्ष उत्पादक तसेच प्रत्येक वंचीत घटक सामील होणार आहे...कराड येथील यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन व कृष्णामाईचा आशीर्वाद घेऊन या पदयात्रेची सुरुवात होणार आहे... साताऱ्यात ही पदयात्रा पोचल्यानन्तर वाहनांने आम्ही पुढे मुंबईत सरकार दरबारी शेतकरीवर्गाच्या व्यथा मांडण्यासाठी पोचणार आहोत... हजारोंच्या संख्येने शतकरी वर्ग पोराबाळांसहित या यात्रेत भर उन्हातून सहभागी होणार आहे... असेही त्यांनी सांगितले...

कराड प्रांत कार्यालयातील दोघेजण लाच घेताना रंगेहात सापडले ;

वेध माझा ऑनलाइन । कराड तालुक्यातुन एक महत्वाची बातमी समोर येत आहे.येथील प्रांत कार्यालयातील भूसंपादन विभागातील दोघांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. आज केलेल्या कारवाईत रामचंद्र श्रीरंग पाटील (वय 70 वर्षे, नोकरी –  लिपीक, भूसंपादन शाखा, प्रांत फीस कराड) व दिनकर रामचंद्र ठोंबरे (वय- 70 वर्षे, नोकरी- लिपीक, भूसंपादन शाखा प्र फीस कराड) या दोन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाच स्विकारताना ताब्यात घेण्यात आले. दोघाकरिता प्रत्येकी 10 हजार रूपयांची मागणी करून असे 20 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात सापडले.

येरवळे (ता. कराड) गावच्या नऊ शेतकरी यांचेकडून भूसंपादनाच्या प्रक्रियेत विविध कार्यालयात पाठपुरावा प्रतिज्ञापत्र घेतलेले होते. त्या प्रतिज्ञापत्रात मूल्यांकन प्रक्रिये बाबत पाठपुरावा करण्याकरीता तक्रारदार हे उपविभागीय अधिकारी कराड कार्यालय येथे गेले असता, त्यांना आरोपी लोकसेवक एक व दोन यांनी मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारताना आज रोजी रंगेहात पकडण्यात आले.

यंदाचा वर्षापासून राज्यातील सर्व सरकारी शाळांसाठी एक रंग एक गणवेश धोरण आखण्याचा शासनाचा विचार ; मात्र अद्यापही निर्णय नाही ; जून महिन्यात होणार शाळा सुरू ; शाळा व्यवस्थापन संभ्रमात ;

वेध माझा ऑनलाइन ।  नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू होत आहे. यंदा शासनाकडून राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये शाळांसाठी एक रंग एक गणवेश  धोरण आखण्याचा विचार सुरू आहे. शाळा सुरू होण्यास एक महिना शिल्लक असताना शासनाकडून गणवेशाचा रंग कोणता असेल? याबद्दल निर्णय झालेला नाही. कोणत्या रंगाच्या गणवेशाची ऑर्डर द्यायची असा प्रश्न शाळांना पडला आहे.

राज्यात 'एक रंग एक गणवेश' धोरण यावर्षी राबवले जाणार की पुढल्या वर्षी ? यासंदर्भात शिक्षण विभागाने स्पष्टता आणावी अशी मागणी शाळा व्यवस्थापनाने केली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू होत आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यास अवघा एक महिना बाकी असताना अद्याप शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व सरकारी शाळांबाबत 'एक रंग एक गणवेश' धोरणाबाबत अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळा व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांसोबत 11 मे रोजी बैठक घेतल्यानंतर सुद्धा हे धोरण नेमकं कधी राबवले जाणार? याबाबत स्पष्टता दिलेली नाही. 

 गणवेशाचा रंगच माहित नसल्याने कोणत्या गणवेशाची ऑर्डर द्यायची? असा प्रश्न शाळा प्रशासनाला पडला आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात जिल्हास्तरावर गणवेशासाठी निधी मिळतो आणि विद्यार्थी संख्येनुसार तो शाळांना दिला जातो.  त्यानंतर शाळा व्यवस्थापन कापड खरेदी करून विद्यार्थ्यांच्या कपड्यांचे माप घेऊन गणवेश शिवून घेण्याची ऑर्डर देते. मात्र नव्या शैक्षणिक वर्षात सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये एकच गणवेश करण्याचा विचार शिक्षण विभागाचा आहे. अद्याप अधिकृत निर्णय न झाल्याने शाळा व्यवस्थापन समोर गणवेश कापड खरेदीची ऑर्डर कधी द्यायची? गणवेश कधी शिवून घ्यायचे ? असा प्रश्न उभा राहिला आहे 
 गणवेश बदल करायचा असल्यास आणि सर्व राज्यातील सरकारी शाळांमध्ये एकच गणवेश करायचा असल्यास त्या संदर्भात अधिकृत निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी शाळा व्यवस्थापनांकडून केली जात आहे. जर यावर्षी हा निर्णय लागू होणार नसेल त्या प्रकारे अधिकृतरित्या परिपत्रकानुसार माहिती द्यावी जेणेकरून शाळांमध्ये गणवेशासंदर्भात संभ्रम राहणार नाही असं शाळा व्यवस्थापनाचे म्हणणं आहे.

महाविकास आघाडीचा फोर्म्युला 16;16; 16; असा ठरला ? मात्र संजय राऊत वेगळंच बोलतायत!

वेध माझा ऑनलाइन । महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्याची चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्ष आपापल्या ताकदीची चाचपणी सुरु केली आहे. असे असताना मविआचा लोकसभेसाठी १६-१६-१६ जागा वाटून घेण्याचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर ठाकरे गट शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

बाहेर सुरु असलेली बातमी चुकीची आहे. मविआमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. मविआमध्ये सध्या जागा वाटपाची चर्चा प्राथमिक स्तरावर आहे. पवारांच्या घरी जी बैठक झाली ती एकत्र लढविण्याच्या चर्चेसाठी होती. कोणी काही म्हणूदेत आघाडी एकत्रच लढणार आहे.  आमचे १९ खासदार लोकसभेत राहतील, असे राऊत यांनी सांगितले. 
गेल्यावेळी लोकसभेला राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने जरी एक जागा जिंकली असेल तरी ती त्यांच्याकडेच राहिल. यामुळे जिंकल्यानंतर कोण कुठे गेला यावर जागावाटप ठरणार नाही. दादरा नगर हवेलीचा एक खासदार आमचा आहे, महाराष्ट्रात १८ जागा जिंकल्या होत्या. मी एवढेच सांगेन की लोकसभेत आमचे १९ खासदार असतील, असे राऊत म्हणाले. 


Thursday, May 18, 2023

आर्यन खानसाठी २७ लाखांची फुकट तिकिटं, रेव्ह पार्टीचं प्रमोशन…आणखी बरच काही...!समीर वानखेडेंच्या व्हाट्स अप चॅटमधून धक्कादायक खुलासे!


वेध माझा ऑनलाइन  । गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने चर्चेत असणारं आर्यन खान प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. मुंबई क्रूज प्रकरणाची चौकशी करणारे तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयनं छापे टाकले आहेत. समीर नावखेडे यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याल आला आहे. आता समीर वानखेडेंनी या प्रकरणासंदर्भात तेव्हा त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्याची केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. ‘फ्री प्रेस जर्नल’नं यासंदर्भातलं वृत्त दिलं असून या चॅटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत.

या वृत्तामध्ये देण्यात आलेले व्हॉट्सअॅप चॅट्स हे समीर वानखेडे आणि तत्कालीन एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्याबरोबर झाल्याचं दिसत आहे. यामध्ये कॉर्डेलिया क्रूजवर समीर वानखेडेंच्या टीमनं छापा टाकल्यानंतरच्या घडामोडींदरम्यानचं या दोघांमधलं संभाषण दिसत आहे. यानुसार, आर्यन खानला या क्रूज पार्टीसाठी तब्बल २७ लाखांची व्हीव्हीआयपी तिकीटं देण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. या क्रूज पार्टीचं प्रमोशन करण्यासाठी आर्यन खान आणि त्याच्या आठ मित्रांसाठी ही तिकिटं देण्यात आल्याचा दावा या चॅटच्या हवाल्याने वृत्तात करण्यात आला आहे.

वानखेडेने केलेले चाट.....
“या सगळ्यामध्ये बॉलिवूड महत्त्वाची भूमिका बजावतं. कारण ड्रग्जचं व्यसन पसरवण्यासाठी आणि अधिकाधिक ग्राहक जमवण्यासाठी, ड्रग्जची विक्री करण्यासाठी बॉलिवूडमधील लोकांचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून किंवा मध्यस्थ म्हणून वापर केला जातो. त्यामुळेच आर्यन खानला मोफत तिकिटं, मुली आणि ड्रग्ज मिळालं. कुणीही तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या नावाचा रेव्ह पार्टीची तिकिटं विकण्यासाठी वापर करू शकत नाही”, असं या चॅटमध्ये समीर वानखेडे ज्ञानेश्वर सिंह यांना सांगत असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, बॉलिवुडमधील सेलिब्रिटी मंडळींचा कशा प्रकारे वापर केला जातो, यासंदर्भात या चॅटमध्ये दावे करण्यात आले आहेत. “अनेक बॉलिवुड स्टार्स या व्यवहाराचा हिस्सा आहेत. ते शहराच्या बाहेर किंवा रिसॉर्ट्समध्ये रेव्ह पार्टीचं आयोजन करतात. तिथे फुकट ड्रग्ज पुरवतात. त्यात बॉलिवुड स्टार्सला आमंत्रित करतात. म्हणजे या पार्टीचं आणखीन प्रमोशन होतं. त्यानंतर एकदा का ड्रग्जचं व्यसन लागलं, की यांचे ग्राहक उत्तरोत्तर वाढतच जातात. सेक्स हा घटक असं व्यसन लावण्यात महत्त्वाचा ठरतो. त्याामुळे ते या पार्ट्यांमध्ये एमडीएमए आणि काही मुलींनाही बोलवतात”, असंही या चॅटमधून समोर आल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे.



बीडमध्ये ठाकरे गटामधील सुषमा अंधारे व जिल्हाप्रमुख यांच्यात वाद ; जिल्हाप्रमुखांचे अंधारेवर गंभिर आरोप ...वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन । शिवसेना ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेमध्ये खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांची जाहीर सभा बीडमध्ये होणार आहे. या सभेआधीच ठाकरे गटातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. गुरुवारी  शहरातील महाप्रबोधन सभेच्या स्थळाची पाहणी करण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे बीडमध्ये आल्या होत्या. यावेळी सुषमा अंधारे आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यामध्ये वाद झाला. आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले, आप्पासाहेब जाधव यांनी केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
सुषमा अंधारे या पैसे घेऊन पद विकत असल्याचा गंभीर आरोप अप्पासाहेब जाधव यांनी केला होता. तसेच सुषमा अंधारे यांना दोन चापटा लगावल्याचा दावाही जाधव यांनी केला होता. मात्र दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मारहाणीच्या बातमीत तथ्य नसल्याचं अंधारे यांनी म्हटलं आहे. तसेच जाधव हे शिंदे गटाला जावून मिळाले असून, ते शिंदे गटाच्या स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोपही अंधारे यांनी केला होता.
दरम्यान आता या वादाची गंभीर दखल ठाकरे गटाकडून घेण्यात आली आहे. महाप्रबोधन यात्रेच्या पूर्वसंध्येलाच शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुख या दोघांची हाकालपट्टी करण्यात आली आहे. तशी घोषणा 'सामना'मधून करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यासोबत बीड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं सामनामध्ये म्हटलं आहे. दरम्यान या वादामुळे आता ठाकरे गटाची महाप्रबोधन सभा चांगलीच चर्चेत आली आहे.
 

उन्हाचा तडाखा वाढला ; आणखी वाढण्याचा हवामान खात्याचा इशारा ; तापमान गेले 45 अंशावर ; अनेक ठिकाणी आणखी वाढणार ; काळजी घ्या...बातमी;

वेध माझा ऑनलाइन । राज्यासह देशामध्ये वाढत असलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच पुढील दोन दिवस  तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  देशातील अनेक राज्यात तापमान 45 अंशावर गेले  आहे. आज देशातील अनेक राज्यात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे.  

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिल्लीत कमाल तापमान 42 अंश सेल्सिअल आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअर राहण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये देखील तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. तसेच जोधपूर, बिकानेरमध्ये तापमान 43 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा, पंजाब, छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये तापमान 42 अंशापार जाण्याची शक्यता आहे. तसेच  अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आण त्रिपुरामधील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अंदमान आणि निकोबार, पश्चिम बंगाल, केरळमध्ये हलका पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मिर आणि लडाखमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तराखंडच्या उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, चमेली, बागशेर आणि पिठोरगडसारख्या डोंगराळ भागात पावसचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत तापमान 40 अंश सेल्सियसपेक्षा जास्त
विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत तापमान 40 अंश सेल्सियसपेक्षा जास्त आहे. मराठवाडा, विदर्भाच्या तुलनेत कमाल तापमान कमी असले तरी आर्द्रतेमुळे कोकण किनारपट्टीवर अधिक उकाडा जाणवतोय. राज्यातील  अनेक जिल्ह्यांमध्ये गुरूवारी 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक कमाल तापमान नोंदवण्यात आले. अकोल्यात 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.


खिशातच मोबाईलचा झाला ब्लास्ट ,अन घडलं भयानक... ; कुठे घडली घटना?

वेध माझा ऑनलाइन । आजकाल मोबाईल ही जणू प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अनिवार्य गोष्ट बनून गेली आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईल वापरताना अगदी दंग होऊन गेल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. खरं तर या फोनने माणसाची अनेक कामं सोपी आणि सोयीस्कर केली. मात्र, फायद्यासोबतच याचे काही तोटेही आहेत, हे नक्की. याचाच प्रत्यय देणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे.

ही घटना नुकतीच घडली आहे त्यामुळे तुम्हीही खिशात मोबाईल ठेवण्याआधी दहावेळा विचार कराल या घटनेचा व्हिडीओ देखील व्हयरल झाला आहे त्यामध्ये एक व्यक्ती चहाच्या दुकानात बसलेला आहे. तो अगदी निवांत बसलेला असतानाच अचानक त्याच्या खिशात असलेल्या मोबाईलचा ब्लास्ट होतो. यानंतर मोबाईल आग पकडतो आणि या व्यक्तीच्या कपड्यांनाही आग लागते.
सुदैवाने हा व्यक्ती अजिबातही वेळ न घालवता लगेचच उठतो आणि आपल्या खिशातील मोबाईल काढू लागतो. मात्र आग लगेचच पसरल्याने त्याला हे शक्य होत नाही. इतक्यात तिथे उपस्थित असलेला दुसरा व्यक्ती लगेचच धावत मदतीसाठी येतो. शेवटी आग लागलेला हा फोन खिशातून बाहेर काढण्यात यश येतं. सुदैवाने या भयानक घटनेत वृद्धाला गंभीर दुखापत झालेली दिसत नाही. मात्र ही घटना अतिशय भयानक होती.ही घटना केरळच्या त्रिसूर जिल्ह्यातील मारोट्टीचलमध्ये घडली.मात्र, सुदैवाने आग तातडीने आटोक्यात आणण्यात यश आले.  


दंगल घडवणारा हिंदू असो वा मुस्लीम त्यांचे हात छाटले पाहिजेत ; राज्यातील वाढत्या दंगलीवरुन आमदार बच्चू कडू यांचे विधान ;

वेध माझा ऑनलाइन ।  गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात दंगली घडल्या आहेत. औरंगाबाद, अकोला, बुलढाणा, नगर या ठिकाणी दंगील घडल्या आहेत. दोन गटात झालेल्या दंगलीमध्ये काही जणांचा जीव गेला आहे तर काहीं जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच नागरिकांच्या मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अलीकडेच अकोला येथे झालेल्या दंगलीत एका युवकाचा मृत्यू झाला तर दोन पोलिसांसह आठजण जखमी झाले. राज्यातील वाढत्या दंगलीवरुन आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. दंगल घडवणारा हिंदू असो वा मुस्लीम त्यांचे हात छाटले पाहिजेत असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

अकोला येथे झालेल्या दंगलीवरुन राज्यातील राजकीय वातावरण  चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी हे विधान केले आहे.ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.महाराष्ट्रात घडत असलेल्या दंगलीबाबत बच्चू कडू यांना विचारले असता ते म्हणाले, दंगल करणारा कुणीही असो…मग तो हिंदू असो वा मुस्लिम असो किंवा इतर कुठल्याही जातीचा असो… जे-जे दंगल पेटवण्यासाठी पुढे आले असतील, त्यांचे हात छाटले पाहिजेत. दंगलीच्या माध्यमातून शहरात अशांतता निर्माण करुन विकासात बाधा आणण्याचे काम करण्यात येत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

बच्चू कडू पुढे म्हणाले, महाराष्ट्रात बेरोजगारी प्रचंड आहे. दररोज कुणी ना कुणी आत्महत्या  करत आहे.औषधं मिळत नाहीत, म्हणून लोक मरत आहेत. असं असताना एकमेकांच्या विरोधात कुणी तलवारी काढत असेल आणि शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात असले तर हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे.त्यांच्याविरोधात कारवाई होणं फार महत्त्वाचं आहे. मग तो कोणत्याही धर्माचा असला तरी कारवाई झालीच पाहिजे,
अशी मागणी बच्चू कडू यांनी यावेळी केली