अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. अनिल देशमुख हे महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे पिता- पुत्रांना अडकवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणला होता. दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही करा, तसेच १०० कोटी वसुली प्रकरणात उद्धव ठाकरेंचं नाव घ्या तरच तुम्ही इडी चौकशीतून सुटका करतो असं फडणवीस यांनी अनिल देशमुख याना सांगितलं होत मात्र अनिल देशमुखानी प्रतिज्ञा पत्रावर सही करण्यास नकार दिल्याने त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले असा खुलासा श्याम मानव यांनी केला आहे.
याबाबत श्याम मानव यांनी नुकतंच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हंटल कि, अनिल देशमुख यांना ईडीच्या चौकशीपासून वाचवण्यासाठी काही प्रतिज्ञापत्र पाठवण्यात आली होती. त्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार या चार नेत्यांवर खोटे आरोप करण्यात आले होते. एकवेळ अजितदादांच्या आरोपावर सही नाही केली तरी चालेल पण बाकीच्या ३ प्रतिज्ञापत्रावर सही करा असं अनिल देशमुख याना सांगण्यात आलं होते. मात्र अनिल देशमुख यांनी सही करण्यास नकार दिल्याने त्यांना जेलमध्ये जावं लागलं, असा दावा श्याम मानव यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांच्याकडे पाठवण्यात आलेले प्रतिज्ञापत्र
1) उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलवलं आणि दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचा मला आदेश दिला.
2) उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिचा खून केला.
3) अनिल परब यांचे गैरव्यवहार
4) अजित पवारांनी मला गुटका व्यवसायिकांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली करून द्यावी, असं सांगितलं होतं.
या चार प्रतिज्ञापत्रकावर सही करुन दिलात तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही असं फडणवीस यांनी अनिल देशमुख याना सांगितलं. मात्र अनिल देशमुख यांनी खूप विचार केला. त्यांनी म्हंटल, मी जर सही केली तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब हे तिघेही जेलमध्ये जातील. त्यामुळे अनिल देशमुखांनी सही केली नाही आणि स्वत: १३ महिने जेलमध्ये राहिले. त्यामुळेच मी अनिल देशमुखांचे कौतुक करतो. कारण याला खरा मर्दपणा म्हणतात असं श्याम मानव यांनी म्हंटले.
No comments:
Post a Comment