देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज 23 जुलैरोजी सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर मोदी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार समाजघटकांवर आपण लक्ष केंद्रीत करायला हवं. अंतरिम अर्थसंकल्पात आपण तेच केले असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले.
या अर्थसंकल्पात 9 घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यामध्ये शेती क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, उर्जा संरक्षण, पायाभूत संरचना, संशोधन व विकास, नव्या पीढीतील सुधारणा आदींचा समावेश आहे.
कृषी क्षेत्रासाठी कोणत्या घोषणा झाल्या?
नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिले जाणार कृषी उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर असणार आहे.
डाळ आणि तेलबियांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यावर भर
शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार, सहा कोटी शेतकऱ्यांचा रेकॉर्ड डिजिटल होणार
शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाईल. त्यातून शेतीपिकांंचं सर्वेक्षण, मातीची तपासणी अशा सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल.
या वर्षी शेती व संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे
सोयाबीन आणि सुर्यफुल बियांची साठवण वाढवली जाणार आहे.
32 फळ आणि भाज्यांच्या 109 जाती वितरीत करणार आहे.
No comments:
Post a Comment