Tuesday, July 30, 2024

कोयनेतून 40 हजार कयुसेकचा विसर्ग ; किती आहे पाणीसाठा ?

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्ह्यात मागील आठवड्यात धुवाधार पाऊस झाला. पश्चिमेकडील कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी आदी प्रमुख धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. कोयना धरणात एकूण ८५.३७ टीएमसी पाणीसाठा झाला असून पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सांडव्यावरील विसर्गात वाढ करून ४० हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment