कराडमधील बैठकीत शहराच्या पाणी प्रश्नाचा आढावा घेतल्यानंतर सातारा येथे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ व अधिकार्यासह जिल्हाधिकारी जितेंद्रसिंग डुडी यांची भेट घेतली. या बैठकीत शहराचा पाणी पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करण्यासाठी विविध प्रश्न मार्गी लागले असल्याची माहिती यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष व शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
खासदार उदयनराजे भोसले यांनी कराडच्या पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध पर्यायांची माहिती जिल्हाधिकारी डुडी यांना दिली. कराडच्या नवीन जलशुद्धीकरण केंद्राची कोयना नदीतील नवीन पाईप लाईन टाकण्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीतून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
नवीन कोयना पुलावरून वारूंजीची पर्यायी पाईप लाईन जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यासाठी ७१ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. यासाठी प्रथम महामार्ग ठेकेदार कंपनी डी. पी. जैन कंपनी सुमारे ५० लाख रुपये खर्च करेल. त्यानंतर एकूण ७१ लाख रुपये निधी जिल्हाधिकारी नियोजन समितीतून देणार आहेत.
जुन्या जॅकवेलला १२० एचपीने सुरू आहे. त्यांची क्षमता वाढविण्यासाठी नवीन मोटर व स्टार्टर व अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकारयांनी जिल्हा नियोजनमधून तातडीने निधी देण्यास मंजुरी दिली आहे. मलकापूरचे सांडपाणी संगम हाँटेलसमोरून हायवे क्रासिंग करून वळणे आदी कामे मार्गी लागली आहेत.
ही सर्व कामे दहा दिवसांत पूर्ण करायची आहेत. कराडची पाणी योजना पूर्ण करणारे एमजीपीचे निवृत्त अभियंता बागडे यांना तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्त करण्याचे ठरले आहे. याशिवाय साडे सहा कोटी रुपयांचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून तो लवकरच मंजूर होईल, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितल्याची माहिती राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.
माजी नगरसेवक विनायक पावसकर, स्मिता हुलवान, हणमंतराव पवार, विजय वाटेगावकर, बाळासाहेब यादव,गजेंद्र कांबळे, प्रितम यादव, निशांत ढेकळे, विनोद भोसले, संदीप मुंढेकर, ओमकार मुळे, उपअभियंता ए. डी. भोपळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे एस. के. भोपळे, निवृत्त उपअभियंता यु. पी. बागडे उपस्थित होते.
कराडचा पाणी प्रश्न निर्माण झाल्यानंतर जिल्हा नियोजन बैठकीवेळी मी स्वतः खासदार उदयनराजे यांना पाणी प्रश्नाची माहिती दिली होती. त्यांनी जिल्हाधिकारयांना सूचना दिल्या होत्या. ते याबाबत त्यांच्याकडून माहिती घेत होते. पाणी प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हाधिकारी जितेंद्र सिंग डुडी यांचे कराड करांच्या वतीने आभार मानत असल्याचे यादव यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment