Monday, July 22, 2024

धनंजय मुंडे म्हणाले ... काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शाह शरद पवार यांच्यावर टिका करणार नाहीत ;

वेध माझा ऑनलाइन।
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात भाजपच्या महाअधिवेशनात राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवारांवर हल्लाबोल केला. शरद पवार हेच भ्रष्टाचाराचे सूत्रधार असल्याचं अमित शाह म्हणाले. सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढवण्याचं काम हे शरद पवारांचं आहे. देशात भ्रष्टाचार करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते फक्त शरद पवारांनी केलं आहे. “मी डंके के चोट पर सांगत आहे”. असा घणाघात अमित शाह यांनी केला.

काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शाह बोलणार नाहीत”
शरद पवार यांच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षण गायब होतं. तसेच 2014 साली भाजप सरकार जसं आलं तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळालं. अमित शाह यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. त्यावर धनंजय मुंडेंनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, “अमित शाह बोलल्यानंतर मी उत्तर देणं योग्य नाही. मात्र काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शाह बोलणार नाहीत”, असं धनंजय मुंडे  म्हणाले.

विशाळगडाच्या प्रकरणानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी एक चकार शब्दही काढला नाही. त्यावरून देखील धनंजय मुंडेंनी वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे धारावी संदर्भात अनेक आरोप करतात. धारावी अडाणींच्या खिशात घालण्याचा प्रयत्न महायुती करतेय, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री असताना शेकलीन नावाच्या कंपनीला तुम्हीच काम दिलं होतं. ते कोणाच्या काळात रद्द झालं आणि अडाणींना दिलं? याचा अभ्यास माध्यमांनी करावा, असं मुंडे म्हणाले.
धारावीच्या टेंडर प्रक्रियेबाबत उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं. फक्त आमचा उपयोग हा केवळ लोकसभेसाठी केला आहे. आम्हाला वाऱ्यावर सोडलं असल्याचे मुस्लिम समाज म्हणत आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

No comments:

Post a Comment