Tuesday, July 30, 2024

लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर होण्यास शासनाकडून सुरुवात !

वेध माझा ऑनलाइन।
लाडकी बहीण योजना अर्ज भरला असेल, तर त्यात पेंडिंग टू सबमिट असे येत होते. परंतु आता हे अर्ज मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला घरबसल्या तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की, नाही हे कळणार आहे. 

तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला, तेव्हा तो अर्ज भरताना सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर इन पेंडिंग टू सबमिट असा पर्याय येत असेल. परंतु याचा नेमका अर्थ काय होतो असे अनेकांना प्रश्न पडला होता.याचा अर्थ असा आहे की तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे आणि आता सरकारी अधिकारी तुमच्या अर्जाची पडताळणी करत आहे. तुमचा हा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती देखील मिळणार आहे.
तुमचा अर्ज सबमिट केल्यानंतर तिथे आणखी एक पर्याय दिसेल. त्यात एसएमएस व्हेरिफिकेशन असा पर्याय असेल. याचा अर्थ की तुमचा अर्जाची पडताळणी झालेली आहे. आणि दुसरा पर्याय येतो तो म्हणजे एडिट त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जात देखील दुरुस्ती करू शकता. यात तुम्हाला आणखी एक पर्याय दिसेल यात तुम्हाला इंग्रजीमधील i हे चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती पाहायला मिळेल.लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे. पण या योजनेचा अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी 1 ऑगस्टला प्रसिद्ध केली. जाणार आहे 

No comments:

Post a Comment