कराड च्या पाणीपुरवठा प्रश्नाबाबतीत झालेल्या नुकसानीस डी पी जैन कम्पनी कारणीभूत असल्याचे कराडमधील स्थानिकांनी मला सांगितले आहे त्यांना सम्बन्धित खात्याकड़ूंन नोटिस देण्यात येईल तरीही त्या कंपनीने दखल न घेतल्यास डी पी जैन कंपनीवर फौजदारी दाख़ल करू असे आश्वासन साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिले
येथील नवीन शासकीय विश्राम गृह येथे कराड मधील संभाव्य पुरपरिस्थितिचा आढावा घेण्यासाठी आले असता त्यानी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते
संभाव्य पुरपरिस्थितीशी दोन हात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे सांगत आवश्यकतेप्रमाणे कोयनेतून पाण्याचा विसर्ग होत असल्याचे ते म्हणाले पुन्हा शाळा सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत शिक्षकानी शाळा सुटली तरी विद्यार्थी घरी जाईपर्यत शाळेतच थांबायचे आहे असेही आदेश पारित करण्यात आलेत सध्या जिल्ह्यात पुरपरिस्थिति नाही असे आढावा बैठकीनतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले
No comments:
Post a Comment