Thursday, July 25, 2024

पुण्याला आज रेड अलर्ट ; पुण्यातील शाळांना सुट्टी ; खासदार मुरलीधर मोहोळ यांचे ट्विट ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्यात मागील ५ -६ दिवसांपासून पावसाची तुफान बॅटिंग बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नद्यानाले ओसंडून वाहत आहेत तर अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या सततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. महाराष्ट्रातील एक महत्वाचे शहर आणि शिक्षणाचे माहेरघर मानलं जाणाऱ्या पुण्यात सुद्धा मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने पुण्याला आज रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत म्हंटल की, पुणे शहरातील शाळांना २५ जुलै, २०२४ रोजी सुट्टी ! हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट) या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. असं ट्विट मोहळ यांनी केल आहे.

No comments:

Post a Comment