राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पिपाणी चिन्हाचा फटका बसला होता, त्यामुळे चिन्हाच्या यादीतून हे चिन्ह वगळावे अशी विनंती शरद पवारांनी निवडणूक आयोगाला केली होती. पवारांची हि विनंती मान्य करत आता केंद्रीय निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह गोठवलं आहे तर शरद पवारांचे तुतारी वाजवणार माणूस हे चिन्ह कायम ठेवण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत पिपाणी’ या चिन्हामुळे आपलं नुकसान झाल्याचं शरद पवार गटाने म्हटलं होते. लोकसभेची निवडणूक पक्षाने ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हावर लढवली. मात्र या निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ चिन्ह देण्यात आलं होतं. यामुळे मतदारांना तुतारी आणि पिपाणी यातील फरक न समजल्यामुळे साताऱ्यात पराभव झाल्याचे पवार गटाने म्हंटल होते, अखेर आज पिपाणी हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
No comments:
Post a Comment