Sunday, July 14, 2024

कोयनेत मुसळधार सुरू ; धरणातील पाणीसाठा वाढला;

वेध माझा ऑनलाइन
 सकाळपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत सर्वत्रच पावसाने चांगली हजेरी लावली आहे. रविवारी सकाळपर्यंत नवजा येथे 162 मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तर कोयनानगर येथे 147 आणि महाबळेश्वरला 138 मिलीमीटरची नोंद झाली आहे. सध्या धरणात 36.23 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.सकाळपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. उर्वरित जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून  त्याठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment