विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. शेकापच्या जयंत पाटलांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र २३ मतांचा कोटा जयंत पाटलांना पूर्ण करत आला नाही. त्यांना अवघी १२ मते मिळाली आणि त्याचा पराभव झाला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे बाकीचे २ उमेदवार काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर मात्र विजयी झाले. या एकूण सर्व प्रकारानंतर रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांनी जयंत पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला, पवारांनी डाव टाकला अन शेकापच्या जयंत पाटलांचा बळी गेला असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला
प्रसारमाध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, जयंत पाटील हे शेकापचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या चळवळी या महाराष्ट्रात उभ्या केल्या. मात्र त्याच जयंत पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम जाणता राजा म्हणवल्या जाणाऱ्या शरद पवारांनी केलं हे आता स्पष्ट झालं आहे. तुम्ही महाविकास आघाडीचं सरकार आणू शकता, मग जयंत पाटलांसारख्या लढाऊ माणसाचा घात का केला? याचेही उत्तर शरद पवार आणि महाविकास आघाडीला द्यावं लागेल असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.
ते पुढे म्हणाले, या राज्यात शेतकरी कामगार पक्ष संपवण्याचे काम खऱ्या अर्थाने शरद पवारांनीच केला आहे. महाविकास आघाडीवेळी मुख्यमंत्री होताना आणि भाजपची साथ सोडताना उद्धव ठाकरे तुमचं ऐकतात आणि मग जयंत पाटलांच्या उमेदवारीवेळी उद्धव ठाकरेंनी तुमचं का ऐकलं नाही? असा सावळा करत हा सगळा शरद पवारांनी टाकलेला डाव होता आणि या डावात जयंत पाटलांचा बळी गेला असा आरोप सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केला.
No comments:
Post a Comment