लोकसभा निवडणुकीनंतर आता सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. माण-खटाव विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार जयकुमार गोरे यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेसच्या रणजितसिंह देशमुखांनी दंड थोपटले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी भाजप आमदार गोरे यांना थेट आव्हानच दिलं आहे. “धैर्यशील मोहिते-पाटील यांना खासदार होऊन फक्त दोन महिनेच झालेत. दोन महिन्यांत त्यांना जनतेचं दुःख समजलंय. मात्र, पंधरा वर्षे आमदार असलेल्या माणसाला हे समजलं नाही असा टोला देशमुख यांनी लगावत माण विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीलाच मिळणार आहे आणि मी निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा आहे, असा खुललं आव्हान आमदार गोरे यांना दिले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दहिवडी येथील संपर्क कार्यालयात नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी देशमुख पुढे म्हणाले की, ”माण-खटावला २००९ पूर्वी जेवढे पाणी मिळाले, त्यातील तिसरा हिस्सा पाणी आपण वापरतोय. आपल्या हक्काचे दोन हिस्से पाणी सांगली व सोलापूरला जात आहे. १९९७ मध्ये जिहे-कठापूर योजना मंजूर झाली. पाणी आरक्षित झाले; पण पाणी यायला मात्र २०२४ वर्ष उजडावे लागले. दुष्काळी कालावधीत आंधळी तसेच येरळवाडीत हे पाणी येणे, आंधळीत आलेले पाणी माण नदीत सोडणे आवश्यक होते. दुर्दैवाने हे पाणी माण नदीत सोडले नाही.
No comments:
Post a Comment