Saturday, July 13, 2024

ओवेसींचे मोठे वक्तव्य ; म्हणाले...जरांगे यांचा प्रस्ताव आला तर...

वेध माझा ऑनलाइन।
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी हे छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चेसाठी सकारात्मकता दाखवली. मनोज जरांगे पाटील यांचा प्रस्ताव आला. तर पत्रकारांना सोबत घेऊन जाऊन चर्चा करेल. बीडमधून जरांगे यांच्या मुळे पंकजा मुंडे पडल्या. त्यांना विजय मिळत आहे. मग मुस्लिम का जिंकत नाही.. महाराष्ट्र 11 टक्के मुस्लिमसाठी दुःख आहे. त्यांच्याकडून बोलणं होत असेल तर नक्की बोलू, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले. 

मनोज जरांगेंबाबत काय म्हणाले?
मी मनोज जरांगे पाटील यांची इज्जत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो… जरांगेंमुळे 8 खासदार निवडून आले… पण एकही मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही. सर्व समाजाचे उमेदवार जिंकतात. पण मुस्लिम उमेदवार जिंकत नाहीत. इम्तियाज जलील निवडून आले नसल्याने महाराष्ट्रमधील मुस्लिम समाजात राग आहे. आमचा एकमेव उमेदवार जिंकून आला नसल्याचा दुःख आहे. मुस्लिम सर्वांना मतदान केलं. मग आम्हाला का मतदान करत नाही. यावर मुस्लिम समाजाने विचार केला पाहिजे, असंही असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

ओवैसींचा इशारा काय?
मुस्लिम आरक्षणाबाबत न्यायालयाचे आदेश आहे. मोदी म्हणतात मी बँकवर्डचा नेता आहे. मग आरक्षणाच्या टक्क्यांचं बिल आणा. महाराष्ट्रात एकही मुस्लीम उमेदवार निवडून दिला नाही. आमचा एक उमेदवार होता त्याला देखील सर्वांनी मिळून हरवलं आहे. आम्ही सर्वांना मत दिली. पण आमचा उमेदवार पाडला. आम्हाला बहुमत मिळालं. पण प्रत्येक ठिकाणी गद्दार राहतात. त्यांना वाटत आपला माणूस जिंकला नको पाहिजे. गद्दार यांच्याबद्दल निर्णय घेतला जाईल, असा इशाराही ओवैसींनी दिला आहे.

No comments:

Post a Comment