आठवड्यापासून सुरु असलेल्या सलग पावसाने जलचित्रच पालटले आहे. आजवरच्या सरासरीपेक्षा हा पाऊस जवळपास १५ टक्क्यांनी ज्यादाचा राहताना, चिंताजनक जलसाठे तुलनेत समाधानकारक स्थितीत आहेत. पावसाने जनजीवन विस्कळले असून, रस्ते, सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. लोकांना नद्यांना पूर येण्याची धास्तीही लागून राहिली आहे. गेल्या २४ तासात कोयनानगरला सर्वाधिक २४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कृष्णा आणि कोयना नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे.
No comments:
Post a Comment