काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फूट उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. यानंतर कोयना धरणातील पाणी कराड येथील प्रीतिसंगम घाटावरील पायऱ्यांना लागले आणि पायऱ्या पाण्याखाली गेल्या. रात्री उशिरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर पूर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून शहरातील सखल भागात पुराच्या पाण्याचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. तर आतापर्यंत कोयना धरणात एकूण 81.19 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 77.14 टक्के भरले आहे.दरम्यान सद्यस्थितीत कोयना धरणाच्या सांडव्यावरून ३०००० क्यूसेक्स विसर्ग चालू आहे.
No comments:
Post a Comment