वेध माझा ऑनलाइन।
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. येत्या 41 दिवसात आचार संहिता लागणार असून जोमाने कामाला लागा असे थेट आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत. सेनाभवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी गावागावात शाखा स्थापन करण्यापासून ते मतदार नोंदणी करण्यापर्यंतच्या सूचना संपर्कप्रमुखांना देत विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे.
4 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत भगवा सप्ताहाचे आयोजन करा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी या बैठकीत केलं. या भगवा सप्ताहमध्ये विधानसभा क्षेत्राचा आढावा घेऊन त्याची माहिती सेनाभवन येथे सादर करायची आहे. यामध्ये विविध कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी बैठका घेण्याचे आदेशही देण्यात आले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील 4 महिन्यात 15 दिवसातून दोन दिवस विधानसभा क्षेत्रात संपर्कप्रमुखांनी स्वतः उपस्थितीत राहून आढावा घेण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेत. उद्धव ठाकरेंनी या बैठकीत संपर्क प्रमुखांना पाच सूत्री कार्यक्रम दिला आहे.
No comments:
Post a Comment