कराडच्या पाणी प्रश्नासंबंधी जिल्हा नियोजच्या माध्यमातून कराड नगरपालिकेला निधी द्यावा असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिले आहेत. कराडचा पाणी प्रश्न युवानेते विजयसिंह यादव आणि माजी नगरसेवक सादिक इनामदार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कानावर घातल्यानंतर अजितदादांनी हा निर्णय घेतला.
कराडचा पाणी प्रश्नासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत युवानेते विजयसिंह यादव सातारा जिल्हा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष माजी नगरसेवक सादिकभाई इनामदार, माजी जिल्हापरिषद सदस्य श्री राजाभाऊ पाटील उंडाळकर यांनी चर्चा केली असता अजितदादा पवार यांनी जागेवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी संपर्क करून जिल्हा नियोजन मंडळातून साडे तीन कोटी रुपयाची तरतूद ताबडतोब करण्याचे आदेश दिले
No comments:
Post a Comment